व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अश्रुंचे परमानंदात रुपांतर

अश्रुंचे परमानंदात रुपांतर

अध्याय ४७

अश्रुंचे परमानंदात रुपांतर

रक्‍तस्त्राव होणारी स्त्री बरी झाल्याचे पाहून येशूच्या चमत्कार करण्याच्या सामर्थ्यावरचा याइरचा विश्‍वास वाढतो यात शंका नाही. थोड्याच वेळेच्या आधी येशूने येऊन त्याच्या १२ वर्षांच्या मरणोन्मुख मुलीला मदत करावी अशी याइराने विनंती केली होती. पण आता, याइरला ज्याची सर्वात जास्त भीती वाटत असते तेच घडते. येशू अजून त्या स्त्रीशी बोलत असताना काही लोक येऊन खालच्या आवाजात याइरला सांगतातः “आपली मुलगी मरण पावली. आता गुरुजींना त्रास कशाला देता?”

ही बातमी किती धक्कादायक आहे! जरा विचार कराः समाजामध्ये मोठा मान असलेला हा माणूस आपल्या मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकून अगदी हतबल झाला आहे. परंतु येशू त्यांचे संभाषण ऐकतो. तो याइरकडे वळतो व त्याला धीर देत म्हणतोः “भिऊ नको, विश्‍वास धर.”

येशू त्या शोकाकुल माणसाबरोबर त्याच्या घरी येण्यास निघतो. तेथे पोचल्यावर त्यांना रडण्याचा व आकांताचा गलबला दिसून येतो. लोकांचा जमाव जमला असून ते शोकावेगाने स्वतःला बडवून घेत आहेत. आत पाऊल टाकल्यावर येशू विचारतोः “तुम्ही का गोंधळ करता व रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे.”

हे ऐकून, ती मुलगी खरोखरच मेलेली असल्याचे माहीत असल्याने ते लोक येशूचा उपहास करू लागतात. परंतु येशू म्हणतो की, ती फक्‍त झोपलेली आहे. तो आपणाठायीचे देवाने दिलेले सामर्थ्य वापरुन गाढ झोपेतून जागे करण्याइतक्या सहजतेने मृत्युतून लोक परत आणता येतात, हे तो दाखवील.

पेत्र, याकोब व योहान आणि मृत मुलीच्या आई-वडीलांव्यतिरिक्‍त इतर सर्वांना येशू बाहेर पाठवतो. मग, या पाच जणांना तो आपल्यासोबत ती लहान मुलगी असते तेथे नेतो. तिचा हात धरून येशू म्हणतोः “तलीथा कूम्‌, ह्‍याचा अर्थ, मुली, मी तुला सांगतो, उठ.” आणि तात्काळ ती मुलगी उठते व चालू लागते! त्या दृश्‍याने तिचे आई-वडील आनंदातिरेकाने वेडे होतात.

मुलीला काहीतरी खायला देण्याबद्दल सूचना दिल्यानंतर, झालेल्या घटनेबद्दल कोणालाही न सांगण्याबद्दल याइर व त्याच्या बायकोला येशू बजावतो. परंतु येशूने काही म्हटले तरी त्याच्याबद्दलची चर्चा त्या सर्व प्रांतात पसरते. हे येशूने केलेले दुसरे पुनरुत्थान होय. मत्तय ९:१८-२६; मार्क ५:३५-४३; लूक ८:४१-५६.

▪ याईरला कोणती बातमी कळते व येशू त्यांना कसा धीर देतो?

▪ ते याईरच्या घरी येतात तेव्ही तेथील परिस्थिती कशी असते?

▪ मृत मुलगी नुसती झोपलेली आहे असे येशू का म्हणतो?

▪ पुनरुत्थान पाहणारे, येशूबरोबर असलेले पाच जण कोण होते?