व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उपवासाविषयी प्रश्‍न

उपवासाविषयी प्रश्‍न

अध्याय २८

उपवासाविषयी प्रश्‍न

येशू इ. स. ३० च्या वल्हांडणाच्या सणाला हजर राहिल्याला सुमारे एक वर्ष निघून गेले आहे. बाप्तिस्मा करणारा योहान आतापर्यंत अनेक महिने कैदेत आहे. आपल्या शिष्यांनी येशूचे अनुयायी व्हावे असे त्याला वाटत असले तरी अनेक तसे बनलेले नाहीत.

आता बंदिवान योहानाचे असे काही शिष्य येशूकडे येऊन विचारतातः “आम्ही व परुशी पुष्कळ उपवास करतो, पण आपले शिष्य उपवास करत नाहीत ह्‍याचे कारण काय?” परुशी त्यांच्या धर्माच्या विधीप्रमाणे आठवड्यातून दोनदा उपास करत. आणि कदाचित योहानाचे शिष्य असाच रिवाज पाळत असत. किंवा असेही असेल की योहानाच्या बंदिवासाच्या शोकामुळे ते उपास करत आहेत, व या शोक-प्रदर्शनात येशूचे शिष्य का सहभागी होत नाहीत याचे त्यांना आश्‍चर्य वाटत असावे.

उत्तरादाखल येशू स्पष्टीकरण देतोः “वऱ्‍हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत ते शोक करणे शक्य आहे का? तरी, असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल. तेव्हा ते उपास करतील.”

योहानाच्या शिष्यांनी आठवावे की, स्वतः योहानाने येशूचा, वर म्हणून उल्लेख केला होता. त्यामुळे येशू असेपर्यंत योहान उपास करणे उचित समजणार नाही व येशूचे शिष्यही समजणार नाहीत. नंतर येशू मरतो तेव्हा त्याचे शिष्य शोक व उपास करतील. परंतु त्याचे पुनरुत्थान होऊन तो स्वर्गाला गेल्यावर शोकमग्न उपासाचे त्यांना काही कारण नसणार.

त्यानंतर येशू हे दाखले देतोः “कोणी कोऱ्‍या कापडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाहीत. कारण धड करण्याकरता लावलेले ठिगळ त्या वस्त्राला फाडते व छिद्र मोठे होते. तसेच कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यात घालत नाहीत. घातला तर बुधले फुटून द्राक्षारस सांडतो, आणि बुधले बिघडतात. तर नवा द्राक्षारस नव्या बुधल्यात घालतात म्हणजे दोन्ही नीट राहतात.” या दाखल्यांचा उपासाशी काय संबंध?

त्याच्या शिष्यांनी, विधीपूर्वक उपासासारख्या, यहुदी धर्माच्या जुन्या चालीरिती अनुसराव्या अशी अपेक्षा कोणी करू नये हे जाणण्यास येशू, योहानाच्या शिष्यांना मदत करत होता. टाकाऊ झालेल्या जीर्ण उपासना पद्धतींची डागडूजी करून त्या लांबवण्यासाठी तो आला नव्हता. मानवनिर्मित रुढींनी युक्‍त अशा त्या काळच्या यहुदी धर्माला अनुसरण्यास ख्रिस्ती धर्माला भाग पाडले जाणार नाही. तो जुन्या वस्त्रावरील नवीन ठिगळासारखा वा जुन्या बुधल्यातील नव्या द्राक्षारसासारखा होणार नाही. मत्तय ९:१४-१७; मार्क २:१८-२२; लूक ५:३३-३९; योहान ३:२७-२९.

▪ कोण उपास पाळतात व कोणत्या हेतूने?

▪ येशू आपल्या शिष्यांसोबत असेपर्यंत ते उपास का करत नाहीत व नंतर उपास करण्याचे कारण लवकरच कसे नाहीसे होईल?

▪ येशू कोणते दाखले देतो व त्यांचा अर्थ काय?