व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

घटस्फोटाबद्दल व मुलांविषयी प्रेम दाखवण्याबद्दल धडे

घटस्फोटाबद्दल व मुलांविषयी प्रेम दाखवण्याबद्दल धडे

अध्याय ९५

घटस्फोटाबद्दल व मुलांविषयी प्रेम दाखवण्याबद्दल धडे

इ.स. ३३च्या वल्हांडण सणाला उपस्थित राहण्यासाठी येशू व त्याचे शिष्य यरुशलेमाच्या मार्गावर आहेत. यार्देन नदी पार करून पेरिया प्रांतातून जाणारा मार्ग ते धरतात. काही आठवड्यांपूर्वी येशू पेरियात होता. पण तेव्हा त्याचा मित्र लाजर आजारी असल्याने त्याला यहूदीयामधून बोलवणे आले होते. तेव्हा पेरियात असताना येशू घटस्फोटासंबंधी परुश्‍यांसोबत बोलला होता; व आता ते परत तोच विषय काढतात.

परुशांमध्ये घटस्फोटाबद्दल वेगवेगळ्या विचारधारा आहेत. एखाद्या स्त्रीची “वागणूक अनुचित” असल्यास तिला घटस्फोट देता येतो असे मोशे म्हणाला. येथे व्यभिचाराचा संदर्भ आहे असा काहींचा विश्‍वास आहे. तर “अनुचित”मध्ये अगदी क्षुल्लक अपराधांचा समावेश होतो असे इतर समजतात. या कारणाने येशूची परीक्षा घेण्यासाठी परुशी विचारतातः “कोणत्याही कारणावरुन बायको टाकणे सशास्त्र आहे काय?” येशूने कोणतेही उत्तर दिले तरीही त्याविरुद्ध मत असलेल्या परुशांशी मतभेदात तो गोवला जाईल अशी त्यांना खात्री आहे.

कोणत्याही मानवी मताचा आधार न घेता विवाहाच्या मूळ हेतुचा उल्लेख करून येशू तो प्रश्‍न मोठ्या कौशल्याने हाताळतो. तो विचारतोः “तुम्ही वाचले नाही काय की, उत्पन्‍नकर्त्याने सुरवातीलाच नरनारी अशी ती निर्माण केली व म्हटले, ‘ह्‍याकरिता पुरुष आईबापांस सोडून आपल्या बायकोशी जडून राहील, आणि ती दोघे एकदेह होतील’? ह्‍यामुळे ती पुढे दोन नव्हत, तर एकदेह अशी आहेत; म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.”

विवाहीत जोडप्याने एकत्र राहावे व घटस्फोट घेऊ नये असा देवाचा मूळ उद्देश आहे असे येशू दाखवतो. तसे आहे, “तर सुटपत्र देऊन तिला टाकावे अशी आज्ञा मोशाने का दिली?” असे परुशी विचारतात.

येशू उत्तर देतोः “तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशाने तुम्हास आपल्या बायका टाकू दिल्या. तरी सुरवातीपासून असे नव्हते.” एदेन बागेत देवाने विवाहाचे खरे मानक स्थापन केले तेव्हा त्याने घटस्फोटाची तरतूद केली नाही.

येशू परुशांना पुढे सांगतोः “मी तुम्हास सांगतो की, जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या [ग्रीक, पोर․निʹआ] कारणाशिवाय टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो.” यावरुन तो दाखवतो की, जारकर्म, [ग्रीक, पोर․निʹआ] म्हणजे अतिनिंद्य लैंगिक अनैतिकता हेच घटस्फोटासाठी देवाने मान्यता दिलेले एकमेव कारण आहे.

घटस्फोटासाठी या एकाच कारणाशिवाय विवाह ही कायमची गाठ असावी हे समजून, “बायकोच्या बाबतीत पुरुषाची गोष्ट अशी असली तर लग्न न केलेले बरे,” असे म्हणण्यास शिष्य प्रवृत्त होतात. विवाहाचा विचार करत असल्यामुळे विवाह-बंधनाच्या शाश्‍वतपणाचा विचार गंभीरतेने केला पाहिजे यात प्रश्‍नच नाही!

येशू पुढे सडेपणाबद्दल बोलतो. तो खुलासा करतो की काही मुले जन्मतः नपुंसक असतात. लैंगिक वाढ न झाल्यामुळे ती लग्न करण्यास असमर्थ असतात. क्रूरपणे लैंगिकदृष्ट्या अपंग करून इतरांना माणसांनी नपूंसक केले आहे. शेवटी, स्वर्गाच्या राज्यासंबंधीच्या गोष्टींना स्वतःला पूर्णपणे वाहून घेता यावे म्हणून लग्न करण्याची व शरीर संबंध उपभोगण्याची इच्छा काहींनी दाबून टाकली आहे. येशू समारोप करताना म्हणतोः “ज्याला [सडेपण] स्वीकारता येते त्याने स्वीकारावे.”

आता, लोक आपली लहान मुले येशूकडे आणू लागतात. परंतु शिष्य मुलांना दटावून घालवून देण्याचा प्रयत्न करतात. येशूला विनाकारण दबावापासून वाचवण्याची त्यांची इच्छा असावी यात संशय नाही. पण येशू म्हणतोः “बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका. कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बालकांप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याचा त्यात प्रवेश होणारच नाही.”

येथे येशू किती उत्तम धडा देतो! देवाचे राज्य मिळण्यासाठी लहान मुलांची नम्रता व शिकण्याच्या वृत्तीचे आपण अनुकरण केले पाहिजे. पण येशूचे उद्‌गार हेही दाखवतात की, विशेषतः आईवडीलांनी मुलांबरोबर वेळ घालवणे किती महत्त्वाचे आहे. आता त्यांना कवटाळून व आशीर्वाद देऊन येशू त्या लहान मुलांबद्दलचे आपले प्रेम व्यक्‍त करतो. मत्तय १९:१-१५; अनुवाद २४:१; लूक १६:१८; मार्क १०:१-१६; लूक १८:१५-१७.

▪ घटस्फोटाबद्दल परुशांच्या कोणत्या वेगवेगळ्या विचारधारा आहेत व म्हणून ते येशूची कशी परिक्षा घेतात?

▪ येशू, परिक्षा घेण्याच्या परुशांच्या प्रयत्नाला कसे हाताळतो व घटस्फोटाला तो कोणते एकमेव कारण देतो?

▪ लग्न न केलेले बरे असे येशूचे शिष्य का म्हणतात व येशू कशाची शिफारस करतो?

▪ लहान मुलांशी त्याच्या व्यवहारावरुन येशू आपल्याला काय शिकवतो?