व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चार शिष्यांना पाचारण

चार शिष्यांना पाचारण

अध्याय २२

चार शिष्यांना पाचारण

नासरेथ या त्याच्या गावी येशूवर तो प्राणघातक हल्ला झाल्यानंतर, तो गालील समुद्राजवळच्या कफर्णहूम शहरात येतो. यामुळे यशयाचा आणखी एक भविष्यवाद पूर्ण होतो. त्याला सांगितले होते की समुद्राजवळ राहणाऱ्‍या गालीलच्या लोकांना मोठा प्रकाश दिसेल.

राज्याची सुवार्ता सांगण्याचे आपले दिपकासारखे कार्य करत असताना तो आपल्या चार शिष्यांना शोधून काढतो. आधी त्यांनी त्याच्याबरोबर प्रवास केला होता; परंतु येशूसह यहूदीयातून परतल्यावर मासेमारीच्या आपल्या व्यवसायाकडे ते परत फिरले होते. स्वतः निघून गेल्यावर सेवाकार्य पुढे चालू ठेवण्यासाठी त्याला प्रशिक्षण देता येईल असे अचल व नियमित मदतनीस ठेवण्याची वेळ झालेली असल्याने, बहुधा येशू त्यांना हुडकून काढतो.

आता, येशू समुद्रकाठाने चालत असताना त्याला शिमोन पेत्र व त्यांचे सोबती जाळी धूत असताना दिसतात तेव्हा तो त्यांच्याकडे जातो. तो पेत्राच्या होडीत चढतो व ती काठापासून दूर न्यायला सांगतो. थोडे अंतर गेल्यावर येशू होडीत खाली बसतो व किनाऱ्‍यावरील जनसमूहाला शिकवू लागतो.

यानंतर तो पेत्राला म्हणतोः “खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा.”

पेत्र म्हणतोः “गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही. तरी आपल्या सांगण्यावरुन मी जाळी सोडतो.”

जाळी खाली सोडल्यावर त्यात इतके मासे सापडतात की जाळी फाटू लागतात. तेव्हा होडीतील माणसे तातडीने शेजारच्या होडीतील आपल्या सहकाऱ्‍यांना येऊन मदत करण्यासाठी इशारे करतात. लवकरच दोन्ही होड्या माशांनी इतक्या भरतात की त्या बुडू लागतात. ते पाहून पेत्र येशूच्या पाया पडतो व म्हणतोः “प्रभुजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे.”

येशू उत्तर देतोः “भिऊ नको. येथून पुढे तू माणसे धरणारा होशील.”

येशू पेत्राचा भाऊ आंद्रिया यालाही बोलावतो. तो त्यांना उत्तेजन देतोः “माझ्या मागे चला, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन.” मासेमारीतील त्यांचे सोबती, जब्दीचे मुलगे, याकोब व योहान यांनाही तेच आमंत्रण मिळते. आणि तेही का कू न करता त्याच्यामागे जातात. अशाप्रकारे हे चौघे मासेमारीचा आपला व्यवसाय सोडतात व येशूच्या अचल व नियमित शिष्यांपैकी पहिले चार बनतात. लूक ५:१-११; मत्तय ४:१३-२२; मार्क १:१६-२०; यशया ९:१, २.

▪ येशू त्याच्या शिष्यांना आपल्या मागे येण्यास का सांगतो व ते कोण आहेत?

▪ कोणत्या चमत्कारामुळे पेत्र भयभीत होतो?

▪ आपल्या शिष्यांना येशू कशा प्रकारच्या मासेमारीचे काम करण्याचे आमंत्रण देतो?