व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

छळाला तोंड देण्याची तयारी

छळाला तोंड देण्याची तयारी

अध्याय ५०

छळाला तोंड देण्याची तयारी

प्रचाराचे काम करण्याच्या पद्धतीबद्दल आपल्या प्रेषितांना सूचना दिल्यानंतर येशू त्यांना विरोधकांबद्दल इशारा देतो. तो म्हणतोः “पाहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवतो. . . . माणसांच्या बाबतीत जपून राहा. कारण ते तुम्हाला न्यायसभांच्या स्वाधीन करतील. आपल्या सभास्थानात तुम्हाला फटके मारतील, आणि तुम्हाला माझ्यामुळे देशाधिकारी व राजे ह्‍यांच्यापुढे नेण्यात येईल.”

आपल्या अनुयायांना तीव्र छळाला तोंड द्यावे लागणार असले तरी येशू खात्रीपूर्वक हे आश्‍वासन देतोः “जेव्हा तुम्हाला त्यांच्या स्वाधीन करतील तेव्हा कसे अथवा काय बोलावे ह्‍याची काळजी करू नका. कारण तुम्ही काय बोलावे हे त्याच घटकेस तुम्हाला सुचवण्यात येईल. कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायी बोलणारा आहे.”

येशू पुढे म्हणतोः “भाऊ भावाला व बाप मुलाला जिवे मारण्यासाठी धरून देईल. मुले आई-बापावर उठून त्यांस ठार करतील; आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील. तथापि, जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल.”

प्रचाराला अग्रगण्य महत्त्व आहे. याच कारणासाठी ते काम करण्यास मोकळे राहण्यासाठी जरुर असलेल्या दक्षतेच्या गरजेवर येशू आता जोर देतोः “जेव्हा एका गावात तुमचा छळ करतील तेव्हा दुसऱ्‍यात पळून जा. मी तुम्हास खचित सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलांची सगळी गावे तुमच्याने फिरुन होणार नाही.”

येशूने त्याच्या १२ प्रेषितांना ही सूचना, हा इशारा व हे उत्तेजन दिले हे खरे असले तरी त्याच्या मृत्यु व पुनरुत्थानानंतर होणाऱ्‍या जगव्याप्त प्रचारात सहभाग घेणाऱ्‍यांनाही उद्देशून ते आहे. ज्यांना शिकवण देण्यासाठी प्रेषितांना पाठवण्यात आले ते फक्‍त इस्राएली लोकच त्याच्या शिष्यांचा द्वेष करणार नसून सर्व लोक त्यांचा द्वेष करतील असे त्याने म्हटल्यामुळे वरील गोष्ट दिसून येते. तसेच येशूने त्यांना पाठवलेल्या प्रचाराच्या लहानशा मोहिमेत प्रेषितांना देशाधिकारी व राजांपुढे नेण्यात आले नाही हे उघड आहे. याशिवाय विश्‍वासू लोकांना त्यावेळी कुटुंबातील मंडळींनी ठार करण्यासाठी धरून दिलेले नाही.

तेव्हा “मनुष्याचा पुत्र येईपर्यंत” त्याच्या शिष्यांमागे प्रचाराचे क्षेत्र फिरुन होणार नाही, असे म्हणताना हर्मगिदोनाच्या वेळी यहोवाचा दंडाधिकारी या नात्याने गौरवी राजा येशू ख्रिस्त येण्यापूर्वी देवाच्या स्थान झालेल्या राज्याबद्दलचा प्रचार, त्याचे शिष्य संपूर्ण पृथ्वीभर करू शकणार नाहीत असे भाकित तो करीत होता.

प्रचारासंबंधीची सूचना देताना तो पुढे म्हणतोः “गुरुपेक्षा शिष्य थोर नाही. आणि धन्यापेक्षा दास थोर नाही.” तेव्हा, देवाच्या राज्याचा प्रचार केल्याबद्दल येशूला मिळालेल्या वाईट वागणूकीची व छळाची अपेक्षा त्याच्या अनुयायांनी करावी. तरीही तो बजावतोः “जे शरीराचा घात करतात, पण जिवाचा घात करावयास समर्थ नाहीत त्यांना भिऊ नका. तर जीव व शरीर या दोहोंचा नरकात नाश करावयास जो समर्थ आहे त्याला भ्या.”

या बाबतीत येशूने धडा घालून द्यायचा होता. सर्वसमर्थ यहोवा देवाशी असलेल्या त्याच्या निष्ठेबाबत तडजोड करण्यापेक्षा तो निडरपणे मृत्यु सहन करील. होय, एखाद्याचा (येथे, एक जिवंत जीव या नात्याने असलेली एखाद्याची भावी आशा या अर्थी) नाश करू शकतो वा त्याऐवजी अनंत जीवनाचा उपभोग घेण्यासाठी एखाद्याला पुनरुत्थान देऊ शकतो तो केवळ यहोवा होय. यहोवा किती प्रेमळ व दयाळू स्वर्गीय पिता आहे!

यहोवाला त्यांच्याबद्दल वाटणाऱ्‍या प्रेमळ आस्थेवर प्रकाश टाकणाऱ्‍या एका दाखल्याने येशू मग त्यांना उत्तेजन देतो. तो विचारतोः “दोन चिमण्या दमडीला विकतात की नाही? तथापि तुमच्या पित्यावाचून (किंवा पित्याला माहीत झाल्यावाचून) त्यातून एकही भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यावरील सर्व केस देखील मोजलेले आहेत. यास्तव, भिऊ नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे.”

ज्या राज्याच्या संदेशाची घोषणा करण्यासाठी येशूने आपल्या शिष्यांची नेमणूक केली आहे त्याचा कुटुंबातील काहींनी स्वीकार व इतरांनी अव्हेर केल्याने घरे विभागली जातील. तो खुलासा करतोः “मी पृथ्वीवर शांतता आणावयास आलो असे समजू नका. मी शांतता आणावयास नव्हे तर तरवार चालवावयास आलो आहे.” या कारणासाठी पवित्र शास्त्रातील सत्याचा स्वीकार कुटुंबातील एखाद्या सदस्याने करण्यासाठी धैर्याची गरज असते. येशू म्हणतोः “जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर प्रेम करतो तो मला योग्य नाही. व जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर प्रेम करतो तो मला योग्य नाही.”

सूचनांचा समारोप करताना येशू खुलासा करतो की, त्याच्या शिष्यांचा स्वीकार करणारे त्याचाही स्वीकार करतात. “आणि ह्‍या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही असे मी तुम्हाला खचित सांगतो.” मत्तय १०:१६-४२.

▪ येशू त्याच्या शिष्यांना कोणते इशारे देतो?

▪ तो त्यांना कोणते उत्तेजन व सांत्वन देतो?

▪ येशूच्या सूचना आधुनिक काळातील ख्रिश्‍चनांनाही लागू का होतात?

▪ येशूचा शिष्य त्याच्या गुरुहून मोठा कसा नाही?