व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्याच्या प्रेषितांची निवड

त्याच्या प्रेषितांची निवड

अध्याय ३४

त्याच्या प्रेषितांची निवड

बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाने येशूची, देवाचा कोकरा म्हणून ओळख करून देण्याला व येशूचे जाहीर सेवाकार्य सुरु होऊन जवळपास दीड वर्ष लोटले आहे. त्यावेळी आंद्रिया, शिमोन पेत्र, योहान व बहुधा याकोब (योहानाचा भाऊ) तसेच फिलिप्प व नथनेल (ज्याला बर्थलमय असेही म्हणत) हे त्याचे शिष्य बनले होते. कालांतराने येशूला अनुसरण्यात इतर अनेक लोक येऊन मिळाले.

आता येशू आपल्या प्रेषितांना निवडण्यास तयार आहे. ते त्याचे जवळचे सोबती होतील व त्यांना विशेष प्रसंगी प्रशिक्षण देण्यात येईल. परंतु त्यांची निवड करण्यापूर्वी येशू एका डोंगरावर जातो व बहुधा सूज्ञान व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करण्यात सबंध रात्र घालवतो. सकाळ झाल्यावर तो आपल्या शिष्यांना बोलावतो व त्यांच्यातून १२ जणांची निवड करतो. परंतु ते येशूचे विद्यार्थी असल्याने त्यांना शिष्यही म्हटले जाते.

वर उल्लेख केलेले, येशूने निवडलेले सहाजण त्याचे पहिले शिष्य होत. येशूने जकात नाक्यावरुन बोलावलेला मत्तय, याचीही निवड झाली आहे. निवडलेल्यांपैकी इतर पाचजण म्हणजे यहूदा (ज्याला तद्दय म्हणत), यहूदा इस्कर्योत, शिमोन कनानी, थोमा आणि अल्फिचा पुत्र याकोब. दुसऱ्‍या प्रेषित याकोबापेक्षा कदाचित शरीरयष्टीने वा वयाने लहान असल्याने या याकोबाला धाकटा याकोब असेही म्हटले जाते.

हे १२ जण आता काही काळापासून येशूसोबत आहेत आणि तो त्यांना चांगले ओळखतो. वस्तुतः त्यांच्यातील अनेक जण येशूचे स्वतःचे नातलग आहेत. याकोब व त्याचा भाऊ योहान हे येशूचे मावसभाऊ असल्याचे उघड आहे; आणि अल्फी बहुधा येशूचा दत्तक पिता योसेफ याचा भाऊ असावा. यामुळे अल्फीचा मुलगा प्रेषित याकोब देखील येशूचा चुलत भाऊ बनतो.

येशूला अर्थातच आपल्या प्रेषितांची नावे लक्षात ठेवण्यात काही अडचण नाही. पण ती तुम्हाला आठवतात का? बरे, फक्‍त एवढेच लक्षात ठेवा की, यांच्यापैकी दोघे शिमोन नावाचे, दोन याकोब नावाचे व दोन यहूदा नावाचे असून शिमोनाला आंद्रिया नावाचा व याकोबाला योहान नावाचा भाऊ आहे. आठ प्रेषितांची नावे लक्षात ठेवण्याची ही गुरुकिल्ली. उरलेल्या चारांमध्ये, एक जकातदार (मत्तय), एक, ज्याला नंतर शंका आली तो (थोमा), एकाला झाडाखालून बोलावले होते तो (नथनेल) आणि त्याचा मित्र फिलिप्प यांचा समावेश होतो.

प्रेषितांपैकी अकरा येशूच्या घरच्या प्रदेशातले, म्हणजे गालीलमधील आहेत. नथनेल काना येथला आहे. फिलिप्प, पेत्र व आंद्रिया मुळचे बेथेसदाचे असून जेथे मत्तय राहात असावा असे वाटते त्या कफर्णहूमाला पेत्र व आंद्रिया हे नंतर राहायला गेले. याकोब व योहान मासेमारीच्या धंद्यात होते व तेही बहुधा कफर्णहूमात वा जवळपास राहात असावे. पुढे येशूचा विश्‍वासघात करणारा यहूदा इस्कर्योत हा एकच प्रेषित यहूदीयातला असावा असे दिसते. मार्क ३:१३-१९; लूक ६:१२-१६.

▪ कोणते प्रेषित येशूचे नातलग असावेत?

▪ येशूचे प्रेषित कोण व त्यांची नावे तुम्ही कशी लक्षात ठेवू शकाल?

▪ कोणकोणत्या परिसरातून हे प्रेषित आले होते?