व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाचा आवाज तिसऱ्‍यांदा ऐकू येतो

देवाचा आवाज तिसऱ्‍यांदा ऐकू येतो

अध्याय १०४

देवाचा आवाज तिसऱ्‍यांदा ऐकू येतो

मंदिरात असताना, आपल्याला लवकरच तोंड द्याव्या लागणाऱ्‍या मृत्युच्या विचाराने येशूला यातना होत आहेत. आपल्या पित्याच्या प्रतिष्ठेवर होणाऱ्‍या परिणामाची त्याला सर्वात जास्त काळजी आहे. यासाठीच तो प्रार्थना करतोः “हे बापा, तू आपल्या नावाचे गौरव कर.”

तेव्हा, “मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवीन,” अशी घोषणा करीत स्वर्गातून एक सामर्थ्यशाली आवाज येतो.

सभोवती उभा असलेला जनसमुदाय गोंधळात पडतो. काही म्हणू लागतातः “ह्‍याच्याबरोबर देवदूत बोलला.” इतर काही, मेघगर्जना झाल्याचा दावा करतात. पण खरेपणाने यहोवा देवच बोलला आहे! तथापि, येशूच्या संदर्भात देवाचा आवाज काही प्रथमच ऐकला गेलेला नाही.

साडेतीन वर्षांपूर्वी, येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी, “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्‍याच्याविषयी मी संतुष्ट आहे,” असे येशूबद्दल देवाने म्हटलेले बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाने ऐकले. मग, मागील वल्हांडण सणानंतर कधीतरी शिष्यांसमोर येशूचे रुपांतर झाले असताना, “हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्‍याविषयी मी संतुष्ट आहे. ह्‍याचे तुम्ही ऐका,” अशी देवाने केलेली घोषणा याकोब, योहान व पेत्र यांनी ऐकली होती. आणि आता, निसान १० ला, येशूच्या मृत्युच्या चार दिवस आधी, तिसऱ्‍यांदा माणसांनी देवाचा आवाज ऐकला आहे. पण यावेळी मोठा लोकसमुदाय ऐकू शकेल असे यहोवा बोलतो!

येशू स्पष्टता करतोः “ही वाणी माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी झाली.” येशू खरोखरच देवाचा पुत्र, वचनयुक्‍त मशीहा असल्याचा पुरावा तो आवाज देतो. येशू पुढे म्हणतोः “आता ह्‍या जगाचा न्याय होतो. आता ह्‍या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल.” येशूचा निष्ठावंत जीवनमार्ग या जगाचा अधिकारी, दियाबल सैतान ‘बाहेर टाकण्याच्या’ म्हणजे देहदंडाला पात्र आहे, या गोष्टीची पुष्टी करतो.

त्याच्या, जवळ येणाऱ्‍या मृत्युच्या परिणामांकडे लक्ष वेधत येशू म्हणतोः “मला पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन.” त्याचा मृत्यु हा पराभव नाही कारण इतरांनी सार्वकालिक जीवन उपभोगावे म्हणून त्याच्यायोगेच [मृत्यु] तो त्यांना स्वतःकडे आकर्षून घेईल.

परंतु, लोक आक्षेप घेतातः “ख्रिस्त सर्वकाळ राहील असे आम्ही नियमशास्त्रातून ऐकले आहे. तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे असे आपण कसे म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण?”

देवाचा आवाज ऐकण्यासह सर्व पुरावा असताही येशूच तो खरा मनुष्याचा पुत्र, वचनयुक्‍त मशीहा आहे यावर बहुतेक लोक विश्‍वास ठेवत नाहीत. तरीही सहा महिन्यापूर्वी मंडपाच्या सणात तो बोलला त्याप्रमाणे पुन्हा येशू स्वतःला “प्रकाश” म्हणतो व आपल्या श्रोत्यांना उत्तेजन देतो की, “तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून तुम्हाजवळ प्रकाश असतानाच प्रकाशावर विश्‍वास ठेवा.” हे बोलल्यानंतर जाऊन येशू लपतो. कारण त्याचे जीवन धोक्यात आहे हे उघड आहे.

यहुद्यांच्या येशूवरील विश्‍वासाची उणीव, ‘ह्‍यांनी बरे होण्यासाठी वळू नये म्हणून लोकांचे डोळे अंधळे व अंतःकरणे कठीण’ होण्याबद्दल यशयाच्या शब्दांची पूर्णता करते. यशयाने दृष्टांतात यहोवाचा स्वर्गीय दरबार पाहिला. त्यात येशूला त्याच्या मानवीप्रकृतीपूर्वीच्या गौरवात यहोवासह पाहिले. तरीही यशयाच्या भविष्यवादाच्या पूर्णतेमध्ये येशूच त्यांचा वचनयुक्‍त विमोचक असल्याचा पुरावा ते आडमुठेपणाने अव्हेरतात.

याउलट, अधिकाऱ्‍यांमधील अनेक जण (नक्कीच न्यायसभेचे, यहूदी उच्च न्यायालयाचे सभासद) खरोखरी येशूवर विश्‍वास ठेवतात. निकदेम व अरिमथाईकर योसेफ हे त्या अधिकाऱ्‍यांतील दोघे. पण हे अधिकारी, सभास्थानालगतच्या त्यांच्या हुद्यावरुन काढून टाकले जाण्याच्या भीतीने, निदान सध्या तरी, आपला विश्‍वास प्रदर्शित करीत नाहीत. असे लोक किती गोष्टींना मुकतात!

येशू पुढे नमूद करतोः “जो माझ्यावर विश्‍वास ठेवतो तो माझ्यावर विश्‍वास ठेवीत नाही तर ज्याने मला पाठविले त्याच्यावर ठेवतो. . . . आणि जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती पाळीत नाही त्याचा न्याय मी करीत नाही. कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे तर जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे. . . . जे वचन मी सांगितले तेच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करील.”

यहोवाच्या मानवजातीच्या जगावरील प्रेमाने येशूला पाठवण्यास त्याला प्रवृत्त केले ते अशासाठी की त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांचे तारण व्हावे. देवाने येशूला बोलावयास सांगितलेल्या गोष्टीनुसार ते आज्ञाधारक असतील किंवा नसतील यावरून त्यांचे तारण होईल किंवा नाही ते ठरेल. ख्रिस्ताच्या हजार वर्षाच्या कारकिर्दीत म्हणजेच “शेवटल्या दिवशी” हा न्याय होईल.

“मी आपल्या मनाचे बोललो नाही, तर मी काय सांगावे व काय बोलावे ह्‍याविषयी ज्या पित्याने मला पाठविले त्यानेच मला आज्ञा दिली आहे. त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे हे मला ठाऊक आहे. म्हणून जे काही मी बोलतो ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो.” असे सांगून येशू समारोप करतो. योहान १२:२८-५०; १९:३८, ३९; मत्तय ३:१७; १७:५; यशया ६:१, ८-१०.

▪ येशूच्या संबंधात कोणत्या तीन प्रसंगी देवाचा आवाज ऐकला गेला होता?

▪ यशया संदेष्ट्याने येशूचे गौरव कसे पाहिले?

▪ येशूवर विश्‍वास ठेवणारे अधिकारी कोण व ते जाहीरपणे त्याचा अंगीकार का करत नाहीत?

▪ ‘शेवटला दिवस’ म्हणजे काय व तेव्हा कशाच्या आधारावर लोकांचा न्याय होईल?