व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

द्राक्षमळ्यातील कामकरी

द्राक्षमळ्यातील कामकरी

अध्याय ९७

द्राक्षमळ्यातील कामकरी

येशूने नुकतेच म्हटलेः “जे पहिले ते शेवटले व शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल.” आता एक गोष्ट सांगून हे तो उदाहरणाने स्पष्ट करतो. तो सुरवात करतोः “स्वर्गाचे राज्य कोणाएका घरधन्यासारखे आहे. तो आपल्या द्राक्षमळ्यात मोलाने कामकरी लावावयास मोठ्या पहाटेस बाहेर गेला.”

येशू पुढे सांगतोः “[घरधन्याने] कामकऱ्‍यांना रोजचा एक दिनार ठरवून, त्यांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठविले. मग, तो तिसऱ्‍या तासाच्या सुमारास बाहेर गेला आणि त्याने बाजारपेठेत कित्येकांना रिकामे उभे राहिलेले पाहिले. तो त्यांना म्हणालाः ‘तुम्हीही द्राक्षमळ्यात जा, जे योग्य ते मी तुम्हाला देईन.’ आणि ते गेले. पुन्हा सहाव्या व नवव्या तासाच्या सुमारास त्याने बाहेर जाऊन तसेच केले. मग, अकराव्या तासाच्या सुमारास तो बाहेर गेला तेव्हा, आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले. त्यांना त्याने म्हटले, ‘तुम्ही सारा दिवस येथे रिकामे का उभे राहिला आहा?’ ते त्याला म्हणाले, ‘आम्हास कोणी कामावर घेतले नाही म्हणून.’ त्याने त्यांस म्हटलेः ‘तुम्हीही द्राक्षमळ्यात जा.’

तो घरधनी अथवा द्राक्षमळ्याचा मालक यहोवा देव आहे आणि इस्राएलाचे राष्ट्र द्राक्षमळा आहे. द्राक्षमळ्यातील कामकरी, नियमशास्त्राच्या करारात घेतलेले लोक आहेत. ते, निःसंदिग्धपणे, प्रेषितांच्या काळात हयात असलेले यहुदी आहेत. केवळ संपूर्ण दिवसाच्या कामकऱ्‍यांसोबतच मजुरीचा वायदा झालेला आहे. एका दिवसाच्या कामाची मजुरी एक दिनार आहे. सकाळच्या ९ वाजता तिसरा तास असल्याने ३ऱ्‍या, ६व्या, ९व्या व ११ व्या तासाला बोलावलेले लोक अनुक्रमे ९, ६, ३, व १ तास काम करतात.

१२ तास वा संपूर्ण दिवसाचे कामकरी सतत आध्यात्मिक सेवेत गढलेल्या यहुदी नेत्यांचे प्रतिनिधित्व करतात. मासेमारी वा इतर लौकिक धंद्यात बरेचसे आयुष्य घालवलेल्या येशूच्या शिष्यांपेक्षा ते अगदी वेगळे आहेत. आपले शिष्य म्हणून त्यांना एकत्रित करण्यासाठी “घरधन्याने” इ. स. २९ पर्यंत येशूला पाठवले नाही. अशा रितीने ते शिष्य, “शेवटले” वा ११ व्या तासाला बोलावलेले द्राक्षमळ्यातील कामकरी बनले.

शेवटी येशूच्या मृत्युच्या वेळी ती लाक्षणिक कामाची वेळ संपते व कामकऱ्‍यांना मजूरी देण्याची वेळ येते. खुलासा केल्याप्रमाणे शेवटल्यांना प्रथम मजूरी देण्याचा असाधारण नियम पाळला जातोः “मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळ्याचा धनी आपल्या कारभाऱ्‍याला म्हणालाः ‘कामकऱ्‍यांना बोलाव आणि शेवटल्यांपासून आरंभ करून पहिल्यापर्यंत त्यांना मजूरी दे.’ तेव्हा जे अकराव्या तासाच्या सुमारास लाविले होते ते आल्यावर त्यांना प्रत्येकी एक दिनार मिळाला. मग, जे पहिले आले त्यांना, आपल्याला अधिक मिळेल असे वाटले. तरी त्यांना एक दिनारच्या दरानेच मजूरी मिळाली. ती त्यांनी घेतल्यावर घरधन्याविरुद्ध कुरकुर करीत ते म्हणालेः ‘ह्‍या शेवटल्यांनी एकच तास काम केले. आम्ही दिवसभर उन्हातान्हात कष्ट केले. आणि आम्हास व त्यांस आपण सारखे लेखिले.’ तेव्हा त्याने त्यातील एकाला उत्तर दिलेः ‘गड्या, मी तुझ्यावर अन्याय करीत नाही. तू माझ्याबरोबर दिनाराचा ठराव केला की नाही? तू आपला दिनार घेऊन चालायला लाग. जसे तुला तसे ह्‍या शेवटल्यालाही द्यावे अशी माझी इच्छा आहे. जे माझे आहे त्याचे मी आपल्या मर्जीप्रमाणे करण्यास मुखत्यार नाही काय? अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यात सलते काय?” शेवटी, समारोपात पूर्वी सांगितलेल्या मुद्याची पुनरावृत्ती करीत येशू म्हणतोः “ह्‍याप्रमाणे शेवटले ते पहिले व पहिले ते शेवटले होतील.”

दिनार मिळणे, येशूच्या मृत्युच्या वेळी होत नसून, “कारभारी” इ. स. ३३च्या पेंटेकॉस्टला त्याच्या शिष्यांवर पवित्र आत्मा ओततो, तेव्हा सुरवात होते. येशूचे हे शिष्य “शेवटल्या” किंवा ११व्या तासाला लावलेल्या कामकऱ्‍यांसारखे आहेत. दिनार, पवित्र आत्म्याच्याच भेटीचे प्रतिनिधित्व करीत नाही. ही दिनार शिष्यांनी या पृथ्वीवर वापरण्याची चीज आहे. तिचा अर्थ, त्यांची उपजिविका, त्यांचे सार्वकालिक जीवन असा आहे. देवाच्या राज्याबद्दल प्रचार करण्यासाठी, अभिषेक झालेला, आध्यात्मिक इस्राएल बनण्याचा तो विशेषाधिकार आहे.

लवकरच, प्रथम कामावर घेतलेल्यांना दिसून येते की येशूच्या शिष्यांना मजूरी दिली गेली आहे, आणि ते त्यांना लाक्षणिक दिनार वापरताना पाहतात. पण त्यांना पवित्र आत्मा व त्यासोबतच्या राज्याच्या विशेषाधिकारापेक्षा अधिक हवे आहे. त्यांची कुरकुर व आक्षेप, ख्रिस्ताच्या शिष्यांच्या, द्राक्षमळ्यातील ‘शेवटच्या’ कामकऱ्‍यांच्या, छळाचे स्वरुप घेतात.

ती पहिल्या शतकातील पूर्णता, येशूच्या दाखल्यातील एकमेव पूर्णता आहे का? नाही. या २०व्या शतकात ख्रिस्ती धर्मजगतातील पाळक, त्यांचे स्थान व जबाबदाऱ्‍या लक्षात घेता, देवाच्या लाक्षणिक मळ्यात कामावर घेतले जाण्यात “पहिले” आहेत. वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीशी संलग्न असलेल्या समर्पित प्रचारकांना, देवाच्या सेवेत कोणतेही हक्काचे काम करण्यात, ते “शेवटले” समजत. पण वस्तुतः देवाच्या स्वर्गीय राज्याचे अभिषिक्‍त प्रतिनिधी म्हणून सेवा करण्याचा मान म्हणजेच दिनार, पाळकांनी तुच्छ लेखलेल्या याच लोकांना मिळाला. मत्तय १९:३०–२०:१६.

▪ द्राक्षमळा कशाचे प्रतिनिधित्व करतो? द्राक्षमळ्याचा मालक आणि १२ तास व १ तासाच्या कामकऱ्‍यांनी कोणाचे प्रतिनिधित्व केले आहे?

▪ कामाची लाक्षणिक वेळ कधी संपली व मजूरी कधी दिली गेली?

▪ दिनार देणे कशाचे प्रतिनिधित्व करते?