व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यरुशलेमचा प्रवास

यरुशलेमचा प्रवास

अध्याय १०

यरुशलेमचा प्रवास

वसंत ऋतु आला आहे. मित्रमंडळी व नातेवाईकांसह योसेफाच्या कुटुंबाची, यरुशलेममध्ये वल्हांडणाचा सण साजरा करण्यासाठी, सालाबादाचा वासंतिक प्रवास करण्याची वेळ झाली आहे. जवळपास १०० किलोमीटर्सच्या प्रवासाला निघताना उत्साहाचे वातावरण आहे. येशू आता १२ वर्षांचा आहे. या सणाची तो विशेष आस्थेने वाट पाहात आहे.

येशू आणि त्याच्या कुटुंबासाठी वल्हांडणाचा सण एका दिवसापुरताच आहे असे नाही. त्याच्या पाठोपाठ येणाऱ्‍या सात दिवसांच्या बेखमीर भाकरीच्या सणासाठीही ते थांबतात. कारण हाही वल्हांडणाच्या सणाचा एक भाग आहे असे ते मानतात. परिणामी, यरूशलेममधील वास्तव्य धरून, नासरेथमधील त्यांच्या घरापासूनच्या एकूण प्रवासाला दोन आठवडे लागतात. परंतु यंदा ज्यात येशूही गोवला गेला आहे अशा एका कारणामुळे अधिक वेळ लागतो.

यरुशलेमाहून परत येत असताना समस्या उघडकीस येते. योसेफ व मरीया गृहीत धरतात की एकत्र प्रवास करणाऱ्‍या मित्र व नातेवाईकांच्या जमावामध्ये येशू आहे. परंतु रात्री मुक्काम पडतो तेव्हा तो दिसत नाही. आणि ते सहप्रवाशांमध्ये त्याला शोधू लागतात. तो कोठेच सापडत नाही. तेव्हा योसेफ व मरीया त्याला शोधण्यासाठी पुन्हा यरूशलेमला परततात.

संपूर्ण दिवसभर ते त्याला शोधतात, पण त्यांना यश मिळत नाही. दुसऱ्‍याही दिवशी त्यांना तो सापडत नाही. शेवटी तिसऱ्‍या दिवशी ते मंदिरात जातात. तेथे एका दालनात, यहुदी गुरुजनांमध्ये बसलेला, त्यांचे भाषण ऐकताना व त्यांना प्रश्‍न विचारताना, येशू त्यांना दिसतो.

मरीया विचारतेः “बाळा, तू आमच्याशी असा का वागलास? तुझे वडील व मी कष्टी होऊन तुला शोधत आहोत.”

त्याला कोठे पाहावे हे त्यांना माहीत नसलेले पाहून येशूला आश्‍चर्य वाटते. तो विचारतोः “तुम्हाला मला शोधावे का लागले? मी माझ्या पित्याच्या घरातच असेन हे तुम्हाला ठाऊक नाही का?”

त्याच्या आईवडीलाला हे का माहीत नसावे ते येशूला समजत नाही. तेव्हा येशू आपल्या आईवडीलांसह घरी परत येतो व त्यांच्या आज्ञेत राहतो. तो ज्ञानात व शरीराने प्रगती करत जातो, तसेच देव व माणसांच्या कृपादृष्टीत राहतो. होय, आपल्या बालपणापासून, आध्यात्मिक बाबतीतच नव्हे, तर आईवडीलास आदर दाखवण्यातही येशू उत्तम उदाहरण घालून देतो. लूक २:४०-५२; २२:७.

▪ वसंत ऋतुमध्ये येशू आपल्या कुटुंबासह नियमितपणे कोठे प्रवास करतो व तो प्रवास किती काळाचा आहे?

▪ येशू १२ वर्षांचा असताना केलेल्या प्रवासात काय घडते?

▪ आजच्या तरुणांसाठी येशू कोणते उदाहरण घालून देतो?