व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या भक्‍तीसाठी आवेश

यहोवाच्या भक्‍तीसाठी आवेश

अध्याय १६

यहोवाच्या भक्‍तीसाठी आवेश

येशूचे सावत्र भाऊ, याकोब, योसेफ, शिमोन व यहूदा हे मरीयेचे इतर मुलगे आहेत. येशू व त्याच्या शिष्यांबरोबर गालील समुद्राजवळच्या कफर्णहूम शहराला जाण्यापूर्वी आवश्‍यक वस्तु बरोबर घेण्यासाठी ते सर्व कदाचित नासरेथ येथील आपल्या घरी थांबतात.

काना, नासरेथ अथवा गालीलच्या डोंगराळ प्रदेशात आपले सेवाकार्य करण्याऐवजी येशू कफर्णहूमाला का जातो? एक कारण म्हणजे ते मोक्याच्या ठिकाणी वसलेले व मोठे शहर आहे. तसेच येशूचे नवीनच झालेले शिष्य कफर्णहूमात वा जवळपास राहतात, व म्हणूनच येशूकडून प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना आपली घरे सोडावी लागणार नाहीत.

कफर्णहूमातील आपल्या वास्तव्यात येशू अनेक अद्‌भूत कृत्ये करतो. काही महिन्यांनी याचीच ग्वाही तो देतो. परंतु लवकरच येशू व त्याचे सोबती प्रवासास निघतात. हा वसंत ऋतु आहे व इ. स. ३० चा वल्हांडण साजरा करण्यासाठी ते यरुशलेमच्या मार्गावर आहेत. तेथे असताना येशूचे शिष्य त्याच्याविषयी एक गोष्ट पाहतात, जी कदाचित त्यांनी आधी पाहिली नसावी.

देवाच्या नियमाप्रमाणे, इस्राएली लोकांना प्राण्यांचे बळी द्यावे लागतात. म्हणून त्यांच्या सोयीसाठी त्या उद्देशाने यरुशलेमातील व्यापारी लोक प्राणी व पक्षी विकतात. परंतु ते हा व्यापार थेट मंदिरातच करत असून भारी किंमत लावून लोकांना फसवत आहेत.

येशू अतिशय संतापून, दोऱ्‍यांचा चाबूक करतो व व्यापाऱ्‍यांना बाहेर हुसकावून लावतो. तो सराफांचा खुर्दा ओतून टाकतो व त्यांचे चौरंग पालथे करतो. कबुतरे विकणाऱ्‍यांना तो ओरडून सांगतोः “ही येथून बाहेर घ्या. माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका!”

येशूचे शिष्य हे पाहतात तेव्हा देवाच्या पुत्राबद्दलची भविष्यवाणी त्यांना आठवतेः “तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील.” परंतु यहुदी विचारतातः “तुम्ही हे करता तर आम्हाला तुमच्या अधिकाराचे काय चिन्ह दाखवता?” येशू उत्तर देतोः “तुम्ही हे मंदिर तोडून टाका आणि मी तीन दिवसात ते उभारीन.”

यहुद्यांना वाटते की, तो खरोखरच्या मंदिराविषयी बोलत आहे, म्हणून ते विचारतातः “हे मंदिर बांधायला शेचाळीस वर्षे लागली; आणि तुम्ही हे तीन दिवसात उभारणार काय?” परंतु येशू आपल्या शरीररूपी मंदिराबद्दल बोलत आहे. आणि तीन वर्षांनंतर तो मेलेल्यातून उठला तेव्हा त्याच्या शिष्यांना त्याचे हे बोलणे आठवते. योहान २:१२-२२; मत्तय १३:५५; लूक ४:२३.

▪ कानामधील लग्नानंतर येशू कोणकोणत्या ठिकाणी जातो?

▪ येशूला संताप का येतो व तो काय करतो?

▪ येशूच्या शिष्यांना त्याची कृत्ये पाहून कशाची आठवण येते?

▪ “या मंदिरा”बद्दल येशू काय म्हणतो व त्याचा काय अर्थ आहे?