व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूचा पहिला चमत्कार

येशूचा पहिला चमत्कार

अध्याय १५

येशूचा पहिला चमत्कार

आंद्रिया, पेत्र, योहान, फिलिप्प, नथनेल व कदाचित याकोब हे येशूचे पहिले शिष्य बनले त्याला एक किंवा दोनच दिवस झाले आहेत. ते, त्या सर्वांच्या मूळ प्रांताला, गालील येथे आता जात आहेत. येशू वाढला त्या नासरेथ गावापासून जवळच डोंगराळ भागातील काना या नथनेलच्या गावी ते जात आहेत. काना येथे त्यांना एका लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण आहे.

लग्नाला येशूची आईही आली आहे. मित्रांच्या घरचे लग्न असल्याने मरीया पाहुण्यांची सेवा करण्यात गुंतली असावी हे दिसते. त्यामुळे एक गोष्ट कमी पडल्याचे चटकन्‌ तिच्या लक्षात येते. ती त्याबद्दल येशूला सांगते. “त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.”

अशा रितीने, द्राक्षारसाच्या तुटवड्याबद्दल येशूने काहीतरी करावे या अर्थाने मरीया सुचवते तेव्हा सुरवातीला येशू टाळाटाळ करतो. तो विचारतो, “बाई, ह्‍याच्याशी तुझा माझा काय संबंध?” देवाचा नियुक्‍त राजा या नात्याने त्याच्या कार्याचे मार्गदर्शन त्याच्या कुटुंबाने वा मित्रांनी करायचे नाही. “हा तुम्हाला जे सांगेल ते करा,” असे नुसते म्हणून, सूज्ञपणे ती सर्व गोष्टी आपल्या मुलाच्या हाती सोपवते.

तेथे सहा दगडी रांजण आहेत. त्यात प्रत्येकी ४० लिटर पाणी मावते. येशू सेवकांना सांगतोः “रांजण पाण्याने भरा.” आणि सेवक ते काठोकाठ भरतात. मग, येशू म्हणतोः “आता त्यातले काढून भोजन कारभाऱ्‍याकडे न्या.”

द्राक्षारसाच्या उत्तम दर्जाची, भोजन कारभाऱ्‍यावर मोठी छाप पडते, कारण तो चमत्काराने बनला असल्याचे त्याला माहीत नाही. वराला बोलावून तो म्हणतोः “प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षारस काढतो व लोक यथेच्छ प्याल्यावर निरस वाढतो. तू तर चांगला द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहेस.”

हा येशूचा पहिला चमत्कार आहे व तो पाहून त्याच्या नव्या शिष्यांचा विश्‍वास अधिक बळकट होतो. त्यानंतर त्याची आई व सावत्र भावासह ते गालील समुद्राजवळील कफर्णहूम शहरास जातात. योहान २:१-१२.

▪ काना येथील लग्न येशूच्या सेवाकार्यात केव्हा घडते?

▪ येशू आपल्या आईच्या सूचनेला आक्षेप का घेतो?

▪ येशू कोणता चमत्कार करतो व त्याचा इतरांवर कसा परिणाम होतो?