व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूचा शेवटला वल्हांडण सण जवळ आहे

येशूचा शेवटला वल्हांडण सण जवळ आहे

अध्याय ११२

येशूचा शेवटला वल्हांडण सण जवळ आहे

मंगळवार, निसान ११ चा दिवस संपतो. तेव्हा येशू, जैतुनाच्या डोंगरावर आपल्या शिष्यांना शिकवणे संपवतो. तो किती घाईगर्दीचा आणि दगदगीचा दिवस होता! आता, रात्री कदाचित बेथानीला परत येताना, तो आपल्या प्रेषितांना सांगतोः “तुम्हास ठाऊक आहे की, दोन दिवसांनी वल्हांडण सण आहे, आणि मनुष्याचा पुत्र वधस्तंभावर खिळण्याकरिता धरून दिला जाईल.”

त्यानंतरचा दिवस, बुधवार, निसान १२, येशू आपल्या प्रेषितांसह एकांतात शांततेमध्ये घालवतो. आदल्या दिवशी त्याने धार्मिक नेत्यांची जाहीरपणे खरडपट्टी काढली होती व ते त्याला जिवे मारू पाहात आहेत हे त्याच्या ध्यानात येते. त्यामुळे पुढील दिवशी आपल्या प्रेषितांबरोबर वल्हांडण सण साजरा करण्यात अडथळा येऊ नये अशी त्याची इच्छा असल्याने बुधवारी तो उघडपणे हिंडत नाही.

दरम्यान मुख्य याजक व लोकातील वडीलधारी मंडळी प्रमुख याजक कयफाच्या अंगणात जमले आहेत. येशूने आदल्या दिवशी केलेल्या हल्ल्याने दुखावून, त्याला कपटाने धरण्याच्या व जिवे मारवण्याच्या योजना ते आखत आहेत. पण ते म्हणत राहतातः “लोकांमध्ये गडबड होऊ नये म्हणून हे सणात नको.” ते लोकांना घाबरतात, कारण लोक येशूला अनुकूल आहेत.

धार्मिक नेते दुष्टपणाने येशूचा घात करण्याचा कट करीत असताना त्यांच्याकडे एक पाहुणा येतो. त्यांना आश्‍चर्य वाटते की, तो यहुदा इस्कर्योत, तर येशूचाच एक प्रेषित आहे. आपल्या धन्याचा विश्‍वासघात करण्याची नीच कल्पना सैतानाने त्याच्यामध्ये रुजवली आहे. “मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल?” असे यहुदाने विचारल्यावर त्यांना किती आनंद होतो! मोशेच्या नियमशास्त्राच्या करारानुसार एका दासाची किंमत, चांदीचे ३० रुपये, त्याला देण्यास ते आनंदाने तयार होतात. तेव्हापासून, लोकसमुदाय जवळपास नसताना येशूचा विश्‍वासघात करण्याची चांगली संधी यहुदा शोधू लागतो.

बुधवारी सूर्यास्ताला निसान १३ चा दिवस सुरु होतो. येशू यरीहोहून शुक्रवारी आल्यावर त्याने बेथानीमध्ये घालवलेली ही सहावी व शेवटची रात्र आहे. दुसऱ्‍या दिवशी, गुरुवारी, सूर्यास्ताला सुरु होणाऱ्‍या वल्हांडण सणाची शेवटची तयारी करावी लागेल. ती म्हणजे वल्हांडणाचा कोकरा कापून सबंध भाजावा लागेल. हे भोजन ते कोठे साजरे करतील आणि त्याची तयारी कोण करील?

वल्हांडण सण साजरा करताना येशूला त्यांनी धरावे म्हणून प्रमुख याजकाला कळवण्यास यहुदाला प्रतिबंध करावा या हेतूने कदाचित येशूने तो तपशील दिलेला नाही. पण आता, कदाचित गुरुवारी दोन प्रहरी येशू, पेत्र आणि योहानाला पाठवितो. आणि “आपण वल्हांडण सणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा,” असे तो सांगतो.

ते विचारतातः “आम्ही त्याची तयारी कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे?”

येशू स्पष्टता देतोः “पाहा, तुम्ही नगरात प्रवेश केल्यावर पाण्याची घागर घेऊन जाणारा एक माणूस तुम्हाला भेटेल. तो ज्या घरात जाईल त्यात त्याच्यामागून जा. आणि त्या घराच्या धन्याला म्हणाः ‘गुरुजी तुम्हाला विचारतात, “मला माझ्या शिष्यांसह वल्हांडणाचे भोजन करता येईल अशी पाहुण्यांची खोली कोठे आहे?”’ मग तो तुम्हास सज्ज केलेली मोठी माडी दाखवील. तेथे तयारी करा.”

तो घरमालक येशूचा शिष्य असावा यात शंका नाही व कदाचित या विशेष प्रसंगी त्याचे घर वापरण्यासाठी येशूच्या विनंतीची अपेक्षा करीत असेल. ते काही असले तरी, पेत्र व योहान यरुशलेममध्ये येतात तेव्हा येशूने सांगितल्याप्रमाणेच त्यांना सर्व आढळते. तेव्हा येशू व त्याचे १२ प्रेषित अशा, वल्हांडण सण साजरा करणाऱ्‍या १३ जणांसाठी कोकरा व इतर सर्व व्यवस्था करण्याकडे ते दोघे लक्ष देतात. मत्तय २६:१-५, १४-१९; मार्क १४:१, २, १०-१६; लूक २२:१-१३; निर्गम २१:३२.

▪ बुधवारी येशू काय करतो असे सत्कृतदर्शनी दिसून येते व का?

▪ प्रमुख याजकाच्या घरी कोणती सभा भरवली जाते व यहुदा त्या धार्मिक नेत्यांना कोणत्या उद्देशासाठी भेट देतो?

▪ गुरुवारी येशू यरुशलेमास कोणाला पाठवितो व कोणत्या कारणाने?

▪ येशूचे अद्‌भुत सामर्थ्य पुन्हा एकदा प्रकट करणारी कोणती गोष्ट पाठवलेल्या पेत्र व योहानाला आढळते?