व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूचे आरंभीचे कौटुंबिक जीवन

येशूचे आरंभीचे कौटुंबिक जीवन

अध्याय ९

येशूचे आरंभीचे कौटुंबिक जीवन

नासरेथमध्ये येशू लहानाचा मोठा होत असताना ते एक लहानसे शहर आहे. इज्रेलाच्या सुंदर खोऱ्‍यापासून जवळच गालील प्रांताच्या डोंगराळ भागात ते वसले आहे.

येशू बहुधा दोन वर्षांचा असताना मिसर देशातून योसेफ व मरीयेने त्याला इथे आणले आहे. तोपर्यंत तो मरीयेचा एकुलता एक मुलगा आहे. परंतु फार काळपर्यंत नव्हे. कालांतराने याकोब, योसेफ, शिमोन व यहूदा यांचा जन्म होतो व योसेफ व मरीयेला मुलीही होतात. होता होता येशूला कमीत कमी सहा लहान भाऊ-बहिणी आहेत.

येशूला इतरही नातेवाईक आहेत. त्याचा वडील मावसभाऊ योहान आपल्याला या आधीच माहीत झाला आहे. तो खूप किलोमीटर दूर यहूदीयात राहतो. परंतु बहुधा मरीयेची बहीण असलेली सलोमे गालीलात जवळच राहते. सलोमे हिचे लग्न जब्दीशी झालेले आहे. तेव्हा त्यांची दोन मुले याकोब व योहान येशूचे मावस भाऊ होतात. लहानचा मोठा होत असताना येशूने बराच काळ या मुलांबरोबर घालवला किंवा कसे ते आपल्याला ठाऊक नाही. परंतु नंतर ते जिवलग सोबती बनतात.

आपल्या वाढत्या कुटुंबाच्या निर्वाहासाठी योसेफला खूप काम करावे लागते. तो एक सुतार आहे. योसेफ येशूला आपल्या मुलाप्रमाणे वाढवतो. यासाठीच, येशूला “सुताराचा पुत्र” म्हटले जाते. योसेफ येशूलाही सुतारकाम शिकवतो व तो ते चांगले शिकतो. यामुळेच कालांतराने लोक येशूबद्दल “हाच तो सुतार” असे म्हणतात.

योसेफाच्या कुटुंबाचे जीवन यहोवाच्या उपासनेभोवती गुंफलेले आहे. देवाच्या नियमशास्त्राला अनुसरून योसेफ व मरीया आपल्या मुलांना “घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता” आध्यात्मिक शिक्षण देतात. नासरेथमध्ये एक सभास्थान आहे व योसेफही आपल्या कुटुंबासहित तेथे नियमितपणे उपासनेला जातो याची आपण खात्री बाळगू शकतो. परंतु यरुशलेममध्ये यहोवाच्या मंदिरात नियमितपणे जाण्यात त्यांना सर्वात जास्त आनंद होतो यात शंका नाही. मत्तय १३:५५, ५६; २७:५६; मार्क १५:४०; ६:३; अनुवाद ६:६-९.

▪ येशूला कमीत कमी किती लहान भाऊ व बहिणी आहेत व त्यातील काहींची नावे काय आहेत?

▪ येशूचे तीन प्रख्यात मावस भाऊ कोण आहेत?

▪ कालांतराने येशू कोणता व्यवसाय करतो व का?

▪ योसेफ त्याच्या कुटुंबाला कोणते महत्त्वाचे शिक्षण देतो?