व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

व्यवहारबुद्धीने भविष्याची तरतुद करा

व्यवहारबुद्धीने भविष्याची तरतुद करा

अध्याय ८७

व्यवहारबुद्धीने भविष्याची तरतुद करा

नुकतेच येशूने उधळ्या पुत्राची गोष्ट आपले शिष्य, अप्रामाणिक जकातदार व इतर पापी म्हणून ओळखले जाणारे लोक, तसेच शास्त्री व परुशांचा समावेश असलेल्या जनसमुदायाला सांगणे संपवले आहे. आता आपल्या शिष्यांना उद्देशून, आपल्या घरची व्यवस्था पाहणाऱ्‍या चाकरांबद्दल, कारभाऱ्‍याबद्दल, वाईट बातमी मिळालेल्या एका श्रीमंत माणसाचा दाखला येशू सांगतो.

येशूने सांगितल्याप्रमाणे तो श्रीमंत माणूस आपल्या कारभाऱ्‍याला बोलावतो व त्याला तो कामावरुन काढून टाकणार असल्याबद्दल सांगतो. कारभारी विचार करतोः “माझा धनी माझ्यापासून कारभार काढून घेणार आहे तर मी आता काय करू? खणण्याची मला शक्‍ती नाही; भीक मागण्याची लाज वाटते. तर कारभारावरुन काढल्यावर लोकांनी मला आपल्या घरात घ्यावे म्हणून मी काय करावे हे आता मला सुचले.”

कारभाऱ्‍याची काय योजना आहे? त्याच्या धन्याच्या देणेकऱ्‍यांना तो बोलावतो. तो विचारतोः “माझ्या धन्याचे तुला किती देणे आहे?”

पहिला म्हणतोः “१०० मण जैतुनाचे तेल.”

“हा तुझा रोखा घे व लवकर बसून ह्‍यावर ५० लिही.” असे तो त्याला सांगतो.

दुसऱ्‍याला तो विचारतोः “आता तुझी पाळी. तुला किती देणे आहे?”

तो म्हणतोः “१०० खंड्या गहू.”

“हा तुझा रोखा घे व ८० मांड.”

धन्याचा आर्थिक कारभार अजून आपल्या ताब्यात असल्यामुळे धन्याला असलेले येणे कमी करण्याचा त्याला अधिकार आहे. त्याचे काम सुटल्यावर, त्याने केलेल्या उपकारांची परत फेड करता येणाऱ्‍यांशी, वस्तुंचे प्रमाण कमी करून, तो मैत्री जोडत आहे.

घडलेली गोष्ट धन्याच्या कानी गेल्यानंतर, त्या गोष्टीची त्याच्यावर छाप पडते. “अनीतीमान असूनही व्यवहारबुद्धीने तो धनी कारभाऱ्‍याची वाहवा करतो.” (न्यू.व.) येशू पुढे म्हणतोः “ह्‍या युगाचे लोक आपल्यासारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात.”

आता आपल्या शिष्यांसाठी तात्पर्य सांगताना येशू उत्तेजन देतोः “अनीतीकारक धनाने आपल्यासाठी मित्र जोडा. ह्‍यासाठी की ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हास सार्वकालिक वस्तीस घ्यावे.”

येशू अनीतीसाठी नव्हे तर कारभाऱ्‍याच्या दूरदृष्टीच्या व्यवहारबुद्धीसाठी त्याची वाहवा करीत आहे. उपकाराची परत फेड करू शकणाऱ्‍या लोकांशी मैत्री जोडण्यासाठी “ह्‍या युगाचे लोक” अनेकदा आपल्या धनाचा व स्थानाचा उपयोग चातुर्याने करतात. तेव्हा, स्वतःच्या फायद्यास्तव आपल्या “अनीतीकारक धना”चा, भौतिक मालमत्तचा उपयोग “प्रकाशाच्या लोकां”नी म्हणजे देवाच्या सेवकांनी करण्याची गरज आहे.

पण, येशूने म्हटल्याप्रमाणे अशा धनाने, त्यांना “सार्वकालिक वस्तीत” घेणाऱ्‍यांसोबत त्यांनी मैत्री जोडली पाहिजे. लहान कळपाच्या सदस्यांसाठी ही वस्ती स्वर्गात आहे व “दुसरी मेंढरे” यासाठी ती नंदनवन पृथ्वीवर आहे. केवळ यहोवा देव व त्याचा पुत्र अशा ठिकाणी लोकांचे स्वागत करू शकत असल्यामुळे राज्याच्या हितसंबंधांना उपयुक्‍त असलेल्या, आपल्या जवळच्या “अनीतीकारक धनाने” त्यांच्याशी मैत्री जोडण्यासाठी आपण परिश्रम घेतले पाहिजेत. यास्तव जेव्हा भौतिक धन नाहीसे होईल किंवा नाश पावेल आणि ते खात्रीने नाश पावेलच, तेव्हा आपले सार्वकालिक भवितव्य सुरक्षित असेल.

येशू पुढे म्हणतो की, या भौतिक वा थोडक्या [क्षुल्लक] गोष्टींबाबत जे लोक विश्‍वासू आहेत ते अधिक महत्त्वाच्या गोष्टीची काळजी घेण्यात देखील विश्‍वासू असतील. “म्हणून,” येशू पुढे म्हणतो, “तुम्ही अनीतीकारक धनाविषयी विश्‍वासू झाला नाही तर जे खरे धन [आध्यात्मिक वा देवाच्या राज्याचे हितसंबंध] ते तुम्हाला कोण सोपवून देईल? आणि जे दुसऱ्‍यांचे [देव आपल्या सेवकांच्या हाती देत असलेले राज्याचे हितसंबंध] त्याविषयी तुम्ही विश्‍वासू झाला नाही तर जे आपले [सार्वकालिक वस्तीतील जीवनाचे बक्षीस] आहे ते तुम्हाला कोण देईल?”

समारोपात येशू सांगतो त्याप्रमाणे आपण एकाच वेळी देवाचे खरे सेवक व अनीतीकारक धनाचे, भौतिक धनाचे, दास होऊ शकतच नाही. तो म्हणतोः “कोणत्याही चाकराला दोन धन्याची सेवाचाकरी करता येत नाही. कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्‍यावर प्रीती करील. अथवा एकाला धरून राहील व दुसऱ्‍याला तुच्छ मानील. तुम्हाला देवाची आणि धनाची सेवाचाकरी करता येत नाही.” लूक १५:१, २; १६:१-१३; योहान १०:१६.

▪ येशूच्या दाखल्यातील कारभारी, मागाहून त्याची मदत करू शकणाऱ्‍यांशी कशी मैत्री करतो?

▪ “अनीतीकारक धन” काय आहे व त्याच्यायोगे आपण मित्र कसे जोडू शकतो?

▪ आपल्याला “सार्वकालिक वस्ती”मध्ये कोण घेऊ शकतो व या जागा कोणत्या?