व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शब्बाथाच्या दिवशी सत्कर्मे करणे

शब्बाथाच्या दिवशी सत्कर्मे करणे

अध्याय २९

शब्बाथाच्या दिवशी सत्कर्मे करणे

हा इ.स. ३१ चा वसंत ऋतु आहे. यहूदीयातून गालीलकडे जाताना शोमरोनात विहीरीपाशी येशू त्या स्त्रीशी बोलल्यापासून काही महिने लोटले आहेत.

आता गालीलमध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणावर शिकवण दिल्यानंतर येशू पुन्हा यहूदीयाला जाण्यास निघतो. तेथे तो सभास्थानात प्रचार करतो. त्याच्या गालीलातील सेवाकार्याच्या तुलनेत यहूदीयाच्या या भेटीतील येशूच्या कार्याबद्दल व मागच्या वल्हांडण सणानंतर त्याने येथे घालवलेल्या वेळाबद्दल पवित्र शास्त्र फार कमी माहिती देते. गालीलमधील प्रतिसादाप्रमाणे यहूदीयात त्याच्या सेवाकार्याला प्रतिसाद मिळाला नाही हे उघड आहे.

लवकरच इ. स. ३१च्या वल्हांडण सणासाठी येशू, यहूदीयाचे प्रमुख शहर, यरुशलेम याच्या वाटेवर आहे. येथे शहराच्या मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे. त्याला बेथेसदा म्हणतात. तेथे अनेक आजारी, अंधळे व पांगळे लोक येतात. तळ्यातले पाणी हालल्यावर त्यात उतरल्याने लोक बरे होऊ शकतात असा त्यांचा विश्‍वास आहे.

तो शब्बाथ आहे, आणि ३८ वर्षे आजारी असलेल्या कोणा एका माणसाला येशू त्या तळ्यापाशी पाहतो. तो बराच काळ आजारी असल्याचे जाणून येशू विचारतोः “तुला बरे होण्याची इच्छा आहे काय?”

तो येशूला उत्तर देतोः “महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडण्यास माझा कोणी माणूस नाही. मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो.”

येशू त्याला म्हणतोः “उठ, आपली बाज घेऊन चालू लाग.” तात्काळ तो माणूस बरा होतो व आपली बाज घेऊन चालू लागतो!

परंतु यहुदी त्याला पाहतात तेव्हा म्हणतातः “आज शब्बाथ आहे. बाज उचलणे तुला योग्य नाही.”

तो माणूस त्यांना उत्तर देतोः “ज्याने मला बरे केले त्यानेच मला सांगितले की, ‘आपली बाज उचलून घेऊन चालू लाग.’”

“‘आपली बाज उचलून चालू लाग,’ असे ज्याने तुला सांगितले तो माणूस कोण?” असे त्यांनी त्याला विचारले. गर्दीमुळे येशू तिकडून निघून गेला होता व बरे झालेल्या माणसाला त्याचे नाव माहीत नव्हते. पण नंतर येशू व तो माणूस मंदिरात भेटतात व आपल्याला कोणी बरे केले ते त्या माणसाला कळते.

येशूने आपल्याला बरे केले हे सांगण्यासाठी बरा झालेला माणूस त्या यहुद्यांना हुडकून काढतो. हे कळल्यावर ते यहुदी येशूकडे जातात. कशासाठी बरे? तो या अद्‌भुत गोष्टी कशाच्या साहाय्याने करत होता हे जाणून घेण्यासाठी? नाही. तर या चांगल्या गोष्टी तो शब्बाथाच्या दिवशी करत असल्याने त्याला दोषी ठरवण्यासाठी. आणि ते त्याचा छळही करू लागतात! लूक ४:४४; योहान ५:१-१६.

▪ येशूने यहूदीयाला मागची भेट दिल्यापासून सुमारे किती काळ लोटला आहे?

▪ बेथेसदा म्हटलेले तळे इतके प्रसिद्ध का आहे?

▪ तळ्यापाशी येशू कोणता चमत्कार करतो व यहुद्यांची प्रतिक्रिया काय आहे?