व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शब्बाथ दिवशी धान्य तोडणे

शब्बाथ दिवशी धान्य तोडणे

अध्याय ३१

शब्बाथ दिवशी धान्य तोडणे

लवकरच येशू व त्याचे शिष्य गालीलास परतण्यासाठी यरुशलेम सोडतात. हा वसंत ऋतु असून शेतात धान्याला कणसे आली आहेत. शिष्य भुकेले आहेत. म्हणून ते धान्याची कणसे तोडतात व खातात. पण हा शब्बाथ असल्यामुळे त्यांचे हे कृत्य लक्षात आल्यावाचून राहात नाही.

शब्बाथाच्या तथाकथित उल्लंघनासाठी येशूला मारण्याचा प्रयत्न यरूशलेमाच्या धार्मिक पुढाऱ्‍यांनी नुकताच केला होता. आता परुशी एक आरोप करतात, ते म्हणतातः “पहा, शब्बाथ दिवशी जे करू नये ते आपले शिष्य करीत आहेत.”

खाण्यासाठी धान्य उचलणे व हातावर रगडणे म्हणजे कापणी व मळणी होय असा परुशांचा दावा असतो. शब्बाथाचा काळ आनंदाचा, आध्यात्मिक उन्‍नतीचा असावा असा मूळ उद्देश होता; पण काम कशाला म्हणावे याचा परुशांनी लावलेल्या कडक अर्थामुळे तो तापदायक झाला आहे. यासाठी, आपला शब्बाथ नियम असा निष्कारण कडकपणे लागू करण्याचा यहोवा देवाचा कधीच उद्देश नव्हता हे दाखवण्यासाठी शास्त्रातील उदाहरणांनी येशू त्याचा विरोध करतो.

येशू म्हणतो की, दावीद व त्याचे लोक भुकेले असताना ते निवासमंडपाजवळ थांबले व त्यांनी समर्पित भाकरी सेवन केल्या. या भाकरी आधीच यहोवासमोरुन काढून त्याच्या जागी ताज्या भाकरी ठेवण्यात आल्या होत्या. सर्वसाधारणपणे, त्या भाकरी फक्‍त याजकांनी खाण्यासाठी राखून ठेवल्या जात. तरीही, त्या परिस्थितीत, दावीद व त्याचे लोक यांनी त्या भाकरी खाल्ल्यामुळे दोषी ठरले नाहीत.

आणखी एक उदाहरण देताना येशू म्हणतोः “याजक मंदिरात शब्बाथ दिवशी शब्बाथ मोडून निर्दोष असतात, हे नियमशास्त्रात तुम्ही वाचलेले नाही काय?” होय, प्राण्यांची अर्पणे तयार करण्यासाठी त्यांची कत्तल व इतर कामे शब्बाथ दिवशी देखील याजक करतात! येशू म्हणतोः “पण मी तुम्हास सांगतो की, मंदिरापेक्षा थोर असा कोणीएक येथे आहे.”

परुशांना ताकीद देत येशू पुढे म्हणतोः “‘मला दया पाहिजे, यज्ञ नको’ ह्‍याचा अर्थ तुम्हाला समजला असता तर तुम्ही निर्दोष्यांस दोष लावला नसता.” शेवटी तो म्हणतोः “कारण मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा धनी आहे.” असे म्हणताना येशूचा काय अर्थ होता? हजार वर्षांच्या आपल्या शांतीपूर्ण राज्यकारभाराचा उल्लेख तो करत आहे.

आता, ६,००० वर्षांपासून मानवजात दियाबल सैतानाच्या सत्तेखाली क्लेशकारक दास्यत्व सहन करीत आहे. त्यामुळे हिंसा व युद्धे ही दररोजची बनली आहेत. उलटपक्षी, ख्रिस्ताच्या शासनाचा मोठा शब्बाथ हा अशा सर्व दुःख व जुलुमापासून विश्रांती मिळण्याचा काळ असेल. मत्तय १२:१-८; लेवीय २४:५-९; १ शमुवेल २१:१-६; गणना २८:९; होशेय ६:६.

▪ येशूच्या शिष्यांविरुद्ध कोणता आरोप करण्यात आला आहे व त्याला येशू कसे उत्तर देतो?

▪ परुशांचा कोणता दोष येशू दाखवून देतो?

▪ येशू कोणत्या प्रकारे शब्बाथाचा धनी आहे?