व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शिष्यत्वाची जबाबदारी

शिष्यत्वाची जबाबदारी

अध्याय ८४

शिष्यत्वाची जबाबदारी

तोप्रतिष्ठित परुशी न्यायसभेचा सभासद असावा. त्याचे घर सोडल्यावर येशू यरुशलेमच्या वाटेवर पुढे जातो. मोठा जनसमुदाय त्याच्या मागे येतो. पण त्यांचा हेतु काय आहे? त्याचा खरा शिष्य होण्यात काय गोवलेले आहे?

ते प्रवास करीत असताना येशू जमावाकडे वळतो व म्हणतोः “जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी ह्‍यांचा आणि आपल्या जिवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही.” असे म्हणून कदाचित त्यांना धक्काही देतो.

येशूच्या या बोलण्याचा काय अर्थ आहे? त्याच्या कोणा अनुयायाने आपल्या नातलगांचा अक्षरशः द्वेष करावा असे येशू म्हणत नाही. तर त्याच्यावरील प्रेमाच्या तुलनेत त्यांच्यावर त्यांनी कमी प्रेम करावे या अर्थाने त्यांचा द्वेष करावा. येशूचा पूर्वज याकोबाने लेआचा “द्वेष” केला व राहेलवर “प्रीती” केली असे म्हटले गेले आहे. याचा अर्थ, लेआवर राहेलपेक्षा कमी प्रीती केली गेली असा होतो. तसेच शिष्याने “आपल्या जिवाचा [वा प्राणाचा]” देखील द्वेष करावा असे येशूने म्हटले याचाही विचार करा. पुन्हा येशूच्या म्हणण्याचा अर्थ आहे की, खऱ्‍या शिष्याने स्वतःच्या प्राणापेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती केली पाहिजे. अशा रितीने, त्याचा शिष्य बनणे ही एक गंभीर जबाबदारी आहे यावर येशू जोर देत आहे. याचा अर्थ, काळजीपूर्वक विचार केल्याशिवाय ती गोष्ट करणे हे बरोबर नव्हे.

पुढे त्याने दाखवून दिल्याप्रमाणे येशूचा शिष्य बनण्यात कष्ट व छळ गोवलेले आहेत. तो म्हणतोः “जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही, त्याला माझा शिष्य होता येत नाही.” अशा तऱ्‍हेने, येशूचे लवकरच जसे होणार आहे त्याप्रमाणे जरुर पडल्यास देवाच्या शत्रूंच्या हातून मृत्युही पत्करुन, येशूने सहन केलेले लांच्छनाचे ओझे अनुभवण्याची, खऱ्‍या शिष्यांची तयारी असली पाहिजे.

असे असल्याने, येशूचे शिष्य होण्याबद्दल, त्याच्या मागे जाणाऱ्‍या जमावाने, अतिशय काळजीपूर्वक परिक्षण केले पाहिजे. एका दाखल्याद्वारे येशू या वस्तुस्थितीवर भर देतो. तो म्हणतोः “तुमच्यामध्ये असा कोण आहे की, त्याला बुरुज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून, आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहात नाही? नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील, ‘हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु ह्‍याला तो पुरा करता आला नाही.’”

तेव्हा, त्याच्यामागे जाणाऱ्‍या जनसमुदायाला येशू उदाहरणाने दाखवून देत आहे की, बुरुज बांधावयाची इच्छा असलेल्या माणसाने जशी तो पूर्ण करण्याची ऐपत असल्याची खात्री सुरवात करण्यापूर्वी केली, तसा अनुयायी बनण्यामध्ये गोवलेल्या गोष्टी करू शकण्याचा त्यांनी आपल्या मनात पक्का निर्धार करावा. दुसरा दाखला देत येशू पुढे म्हणतोः

“अथवा असा कोण राजा आहे की जो दुसऱ्‍या राजाबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करीत नाही की जो वीस हजार घेऊन माझ्यावर येतो त्याच्यावर मला दहा हजारानिशी जाता येईल काय? जर जाता येत नसेल तर तो दूर आहे तोच तो वकिलास पाठवून सलोख्याचे बोलणे सुरु करील.”

“यास्तव, त्याचप्रमाणे तुम्हापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही,” असे म्हणून येशू, त्याने दिलेल्या दाखल्यांच्या मुद्यांवर भर देतो. त्याच्यामागे जाणाऱ्‍या जनसमुदायाने व ख्रिस्ताबद्दल माहिती मिळणाऱ्‍या प्रत्येकाने हेच करण्यास राजी झाले पाहिजे. त्याचे शिष्य व्हावयाचे असल्यास अगदी प्राणासकट त्यांच्या जवळच्या सर्व गोष्टींचा—सर्वस्वाचा—त्याग करण्याची त्यांची तयारी असली पाहिजे. हे करण्यास तुम्ही राजी आहात का?

येशू पुढे म्हणतोः “मीठ हा चांगला पदार्थ आहे.” डोंगरावरील आपल्या प्रवचनात तो म्हणाला होता की, त्याचे शिष्य “पृथ्वीचे मीठ” आहेत, म्हणजे जसे खरे मीठ टिकावूपणा आणते तसा लोकांवर त्यांचा [चांगुलपणा] टिकवण्याचा प्रभाव होतो. शेवटी तो म्हणतोः “पण मिठाचा खारटपणाच गेला तर त्याला रुचि कशाने आणता येईल? ते जमिनीला किंवा उकिरड्यालाही उपयोगी नाही. ते बाहेर टाकून देतात. ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको.”

अशा प्रकारे, काही काळ त्याचे शिष्य असलेल्यांनीही सातत्याने पुढे जाण्याच्या निर्धारात डगमगू नये असे येशू दर्शवितो. तसे झाल्यास, ते या जगात हास्यास्पद व देवापुढे अपात्र इतकेच नव्हे तर देवाला कलंक असे कुचकामी होतील. तेव्हा, दुर्बळ [बेचव], दूषित मिठाप्रमाणे त्यांना बाहेर टाकण्यात, म्हणजेच नाश करण्यात, येईल. लूक १४:२५-३५; उत्पत्ती २९:३०-३३; मत्तय ५:१३.

▪ आपल्या नातलगांचा व स्वतःचा द्वेष करण्याचा अर्थ काय?

▪ येशू कोणते दोन दाखले देतो व त्यांचा अर्थ काय?

▪ समारोपात मिठाविषयीच्या येशूच्या बोलण्याचा मुख्य मुद्दा कोणता आहे?