व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शेवटल्या वल्हांडण सणाच्या वेळी नम्रता

शेवटल्या वल्हांडण सणाच्या वेळी नम्रता

अध्याय ११३

शेवटल्या वल्हांडण सणाच्या वेळी नम्रता

येशूच्या सूचनेप्रमाणे पेत्र व योहान वल्हांडण सणाची तयारी करण्यासाठी आधीच यरुशलेमामध्ये आलेले आहेत. इतर दहा प्रेषितांबरोबर येशू दुपारी उशीरा येतो असे दिसते. येशू व त्याच्या बरोबरची मंडळी जैतुनाचा डोंगर उतरत असताना क्षितिजावर सूर्य मावळत आहे. त्याचे पुनरुत्थान होण्यापूर्वी येशू दिवसा यरुशलेमाचा हा देखावा शेवटल्या वेळी पाहात आहे.

लवकरच येशू व त्याच्या बरोबरची मंडळी शहरात पोहंचतात आणि जेथे ते वल्हांडण सण साजरा करणार असतात त्या घराकडे येतात. माडीवरील मोठ्या खोलीकडे जाणारा जिना ते चढतात. तेथे त्यांना खाजगीरित्या वल्हांडण सण साजरा करण्यासाठी केलेली तयारी आढळते. “मी दुःख भोगण्यापूर्वी हे वल्हांडणाचे भोजन तुम्हाबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती,” असे तो म्हणतो, त्याप्रमाणे या प्रसंगाची येशूने उत्कटतेने वाट पाहिली आहे.

परंपरेनुसार वल्हांडण सणात भाग घेणारे चार प्याले द्राक्षारस पितात. द्राक्षारसाचा प्याला घेतल्यावर [हा तिसरा असावा हे उघड आहे] येशू उपकारस्तुती करतो व म्हणतोः “हा घ्या आणि आपणांमध्ये ह्‍याची वाटणी करा. कारण मी तुम्हास सांगतो की, देवाचे राज्य येईपर्यंत द्राक्षवेलाचा उपज ह्‍यापुढे मी पिणार नाही.”

भोजन चालू असताना केव्हा तरी येशू उठतो, आपली बाह्‍य वस्त्रे बाजूला ठेवतो, रुमाल घेतो व गंगाळात पाणी भरतो. सर्वसामान्यपणे पाहुण्यांचे पाय धुण्याकडे यजमान लक्ष देत असतो. पण ह्‍या प्रसंगी कोणी यजमान उपस्थित नसल्याने येशू या वैयक्‍तिक सेवेकडे लक्ष देतो. ते करण्याची संधी प्रेषितांपैकी कोणीही घेऊ शकला असता. पण बहुधा त्यांच्यामध्ये आपसात अजूनही थोडी स्पर्धा असल्याने कोणीही ते करीत नाही. आता, येशू त्यांचे पाय धुऊ लागल्यावर ते ओशाळतात.

येशू पेत्राकडे आल्यावर पेत्र थोडासा प्रतिकार करतोः “तुम्ही माझे पाय निश्‍चितच धुवायचे नाहीत.”—न्यू.व.

येशू म्हणतोः “मी तुला न धुतले तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही.”

यावर पेत्र म्हणतोः “प्रभुजी माझे केवळ पाय धुऊ नका तर हात व डोकेही धुवा.”

येशू उत्तर देतोः “ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायाखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही. कारण ते सर्वांगी शुद्ध आहेत. आणि तुम्ही शुद्ध राहा, पण सगळे नाही.” यहुदा इस्कर्योत त्याचा विश्‍वासघात करण्याची योजना करीत असल्याचे त्याला माहीत असल्याने तो असे म्हणतो.

विश्‍वासघात करणाऱ्‍या यहुदासकट सर्व १२ जणांचे पाय येशूने धुतल्यावर तो आपली बाह्‍य वस्त्रे चढवून पुन्हा भोजनाला बसतो. मग, तो विचारतोः “मी तुम्हाला काय केले आहे हे तुम्हाला समजले काय? तुम्ही मला गुरु व प्रभु असे संबोधिता आणि ते ठीक बोलता. कारण मी तसा आहेच. म्हणून मी प्रभु व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही. आणि पाठवलेला पाठवणाऱ्‍यापेक्षा थोर नाही. जर ह्‍या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहा.”

नम्र सेवेचा किती सुंदर हा धडा! प्रेषितांनी, आपण इतके श्रेष्ठ आहोत की इतरांनी सतत आपली सेवा करावी असा विचार करून त्यांनी प्रथम स्थानासाठी खटपट करू नये. येशूने घालून दिलेला कित्ता त्यांनी गिरवला पाहिजे. तो विधीपूर्वक पाय धुण्याचा नव्हे, तर काम कितीही अप्रिय व हलके असले तरी निपक्षपातीपणे सेवा करण्याच्या तयारीचा आहे. मत्तय २६:२०, २१; मार्क १४:१७, १८; लूक २२:१४-१८; ७:४४; योहान १३:१-१७.

▪ वल्हांडण सण साजरा करण्यासाठी येशू यरुशलेममध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याने पाहिलेल्या त्या शहराच्या दृश्‍याबद्दल असामान्य असे काय आहे?

▪ वल्हांडणात उपकारस्तुती केल्यानंतर येशू १२ प्रेषितांना देत असलेला प्याला कोणता आहे हे उघड आहे?

▪ येशू पृथ्वीवर असताना पाहुण्यांची कोणती वैयक्‍तिक सेवा सामान्यतः केली जात असे, व येशू आणि त्याच्या प्रेषितांनी वल्हांडण सण साजरा केला तेव्हा ती का केली गेली नाही?

▪ प्रेषितांचे पाय धुण्याची हलकी सेवा करण्यामध्ये येशूचा काय उद्देश होता?