व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सज्ज राहा!

सज्ज राहा!

अध्याय ७८

सज्ज राहा!

लोभीपणाबद्दल, जनसमुदायाला इशारा दिल्यावर व शिष्यांना भौतिक गोष्टींकडे फाजील लक्ष देण्यापासून सावध केल्यानंतर येशू प्रोत्साहन देतोः “हे लहान कळपा, भिऊ नको, कारण तुम्हास ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.” अशा रितीने, सापेक्षतेने केवळ थोडेच (१,४४,००० असे नंतर सांगितलेले) स्वर्गीय राज्यात असतील असे तो उघड करतो. सार्वकालिक जीवन मिळविणाऱ्‍यातील बहुतेक त्या राज्याची पृथ्वीवरील प्रजा असतील.

ते “राज्य” ही किती अद्‌भूत भेट आहे बरे! ती मिळाल्यावर शिष्यांनी कशी प्रतिक्रिया दाखवावी याचे वर्णन करताना येशू त्यांना आग्रह करतोः “जे तुमचे आहे ते विकून दानधर्म करा.” होय, इतरांना आध्यात्मिकरित्या फायदा करून देण्यासाठी व अशा तऱ्‍हेने ‘स्वर्गातील अक्षय धन’ साठवण्यासाठी त्यांनी आपल्या मालमत्तेचा उपयोग करावा.

त्यानंतर त्याच्या परतीसाठी सज्ज राहण्याची ताकीद येशू आपल्या शिष्यांना देतो. तो म्हणतोः “तुमच्या कंबरा बांधलेल्या व दिवे लावलेले असू द्या. धनी लग्नाहून येऊन दार ठोकील तेव्हा आपण त्याच्यासाठी तात्काळ उघडावे म्हणून तो परत येण्याची वाट पाहात असलेल्या माणसांसारखे तुम्ही व्हा. धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य! मी तुम्हास खचित सांगतो की तो आपली कंबर बांधून त्यांस जेवावयास बसवील आणि येऊन त्याची सेवा करील.”

आपले लांब अंगरखे चढवून ते कमरपट्टयाने कसण्याने व भरपूर तेल घातलेल्या दिव्यांच्या प्रकाशात रात्री उशीरापर्यंत आपली कर्तव्ये करीत राहण्याने धन्याच्या परतीच्या वेळी सेवकांची सज्जता या उदाहरणामध्ये दाखवली आहे. येशू खुलासा करतोः ‘तो धनी रात्रीच्या दुसऱ्‍या [रात्री साधारण नऊ ते मध्यरात्रीपर्यंत] किंवा तिसऱ्‍या [मध्यरात्रीपासून साधारण पहाटे तीनपर्यंत] प्रहरी येईल तेव्हा ते त्याला असे आढळतील तर ते धन्य आहेत.’

तो धनी आपल्या चाकरांना असाधारणरित्या बक्षीस देतो. त्यांना जेवणाऱ्‍या पंक्‍तीत बसवून तो त्यांची सेवा करू लागतो. तो त्यांना दासांप्रमाणे नव्हे तर एकनिष्ठ मित्रांसारखे वागवतो. त्याच्या परतीची वाट पाहात असताना रात्रभर आपल्या धन्यासाठी त्यांनी केलेल्या कामाचे हे किती उत्तम प्रतिफळ!

शेवटी येशू म्हणतोः “तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हास वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.”

आता पेत्र विचारतोः “प्रभुजी, हा दाखला आपण आम्हालाच सांगता की सर्वांना?”

या प्रश्‍नाचे सरळ उत्तर देण्याऐवजी येशू दुसरा दाखला देतो. तो विचारतोः “आपल्या चाकर माणसांना त्यांचा अन्‍नाचा वाटा नेमलेल्या वेळी द्यायला ज्याचा धनी आपल्या घरावर ठेवील असा विश्‍वासू व बुद्धिमान कारभारी कोण आहे? त्याचा धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना आढळेल तो सुखी. मी तुम्हास खचित सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील.” (न्यू.व.)

तो धनी येशू ख्रिस्त असल्याचे उघड आहे. एक गट या दृष्टीने शिष्यांचा “लहान कळप,” ‘कारभाऱ्‍या’ला चित्रित करतो व ज्यांना स्वर्गीय राज्य मिळते त्या याच १,४४,००० च्या गटाला उद्देशून ‘चाकर माणसे’ म्हटले आहे. पण हे ‘चाकर माणसे’ हा शब्दप्रयोग व्यक्‍तीगतपणे त्यांच्या कामावर विशेष प्रकाश टाकतात. विश्‍वासू दासाला ज्याची काळजी घ्यायला नेमले आहे ते ‘सर्वस्व’ म्हणजे त्या धन्याचा पृथ्वीवरील शाही वाटा होय. त्यात त्या राज्याच्या पृथ्वीवरील प्रजाजनांचा समावेश आहे.

कारभारी वा दास वर्गातील सर्व सभासद निष्ठावान न राहण्याच्या शक्यतेकडे, येशू या दाखल्यात पुढे लक्ष वेधतो. तो खुलासा करतोः “परंतु, ‘आपला धनी येण्यास उशीर लागेल’ असे आपल्या मनात म्हणून तो दास चाकरांस व चाकरिणींस मारहाण करू लागेल आणि खाऊन-पिऊन मस्त होईल तर तो वाट पाहात नाही अशा दिवशी . . . त्याचा धनी येऊन त्याला कापून टाकील.”

त्याच्या येण्याने यहुद्यांवर परिक्षेची वेळ आलेली आहे, कारण काही त्याची शिकवण स्वीकारतात व इतर नाकारतात, ह्‍या गोष्टीची येशू नोंद घेतो. तीन वर्षांपूर्वी त्याचा पाण्यात बाप्तिस्मा झाला. पण आता मृत्युतील त्याचा बाप्तिस्मा भराभर जवळ येऊन ठेपला आहे. त्यामुळे तो म्हणतोः “तो [बाप्तिस्मा] होईपर्यंत मी मोठ्या पेचात आहे.”

असे आपल्या शिष्यांना म्हटल्यावर येशू पुन्हा जमावाशी बोलतो. त्याची ओळख व तिचे महत्त्व याबद्दलचा स्पष्ट पुरावा न स्वीकारण्याच्या त्यांच्या आडमुठेपणाबद्दल तो खेद व्यक्‍त करतो. तो म्हणतोः “जेव्हा तुम्ही ढग पश्‍चिमेकडून वर येताना पाहता तेव्हा तुम्ही लागलेच म्हणताः ‘पावसाची सर येत आहे,’ आणि तसे घडते. दक्षिणेचा वारा सुटतो तेव्हा ‘कडाक्याची उष्णता होईल’ असे तुम्ही म्हणता, आणि तसे घडते. अहो ढोंग्यांनो, तुम्हास पृथ्वीवरील व आकाशातील लक्षणांचा अर्थ लावता येतो. तर ह्‍या काळाचा अर्थ तुम्ही का लावीत नाही”? लूक १२:३२-५९.

▪ “लहान कळप” किती जणांचा बनला आहे व त्यांना काय मिळते?

▪ त्याच्या सेवकांनी सज्ज राहण्याच्या गरजेवर येशू कसा भर देतो?

▪ येशूच्या दाखल्यात “धनी,” “कारभारी,” “चाकर माणसे,” व “सर्वस्व” हे कोण किंवा काय आहे?