व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगातील सर्वाधिक वितरीत पुस्तक

जगातील सर्वाधिक वितरीत पुस्तक

जगातील सर्वाधिक वितरीत पुस्तक

“बायबल हे सबंध इतिहासात सर्वात व्यापक प्रमाणावर वाचण्यात आलेले पुस्तक आहे. . . . इतर कोणत्याही पुस्तकाच्या तुलनेत बायबलच्या सर्वात जास्त प्रती वितरीत करण्यात आल्या आहेत. तसेच इतर कोणत्याही पुस्तकापेक्षा अधिक वेळा आणि अधिक भाषांमध्ये बायबलचे भाषांतर करण्यात आले आहे.”—“द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया.”

काही बाबतींत पुस्तके माणसांसारखीच असतात. ती अस्तित्वात येतात, कदाचित गाजतात आणि—काही मूठभर श्रेष्ठ ग्रंथांचा अपवाद वगळता—ती जुनी होऊन शेवटी काळाच्या पडद्याआड होतात. ग्रंथालये म्हणजे जणू स्मशानभूमीच; येथे नामशेष झालेली, कोणीही वाचत नाहीत अशी आणि त्याअर्थी मृत झालेली असंख्य पुस्तके धूळ खात पडलेली असतात.

तथापि बायबल, श्रेष्ठ ग्रंथांमध्येही अपवादात्मक आहे. त्याचे आरंभीचे लेखन ३,५०० वर्षांइतके जुने असले तरीसुद्धा, ते आजदेखील जिवंत आहे. मोठ्या फरकाने, ते जगातील सर्वात व्यापक प्रमाणावर वितरीत झालेले पुस्तक आहे. a दर वर्षी, संपूर्ण बायबलच्या किंवा त्याच्या काही भागांच्या जवळजवळ सहा कोटी प्रती वितरीत केल्या जातात. चल खिळ्यांच्या साहाय्याने मुद्रित करण्यात आलेली प्रथमावृत्ती, १४५५ सालाच्या सुमारास जर्मन शोधक योहॅन्‍नस गुटेनबेर्क यांच्या मुद्रणालयातून बाहेर पडली. त्यानंतर आजपावेतो बायबलच्या (संपूर्ण किंवा अंशतः) अंदाजे चार अब्ज प्रती मुद्रित करण्यात आल्या आहेत. इतर कोणतेच धार्मिक अथवा धर्मेतर पुस्तक या आकड्याच्या जवळही येत नाही.

तसेच, बायबल हे सबंध इतिहासात सर्वाधिक प्रमाणात भाषांतरित झालेले पुस्तक आहे. अवघे बायबल किंवा त्याचे काही भाग २,१०० पेक्षा अधिक भाषांत आणि पोटभाषांत अनुवादित करण्यात आले आहेत. b मानवी कुटुंबातील ९० टक्क्यांहून अधिक लोकांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत बायबलचा निदान काही भाग तरी उपलब्ध आहे. अशाप्रकारे या पुस्तकाने राष्ट्रीय सीमा ओलांडल्या आहेत आणि जातीय आणि वंशीय मर्यादाही सर केली आहे.

केवळ आकडेवारी पाहून बायबलचे परीक्षण केलेच पाहिजे, असे कदाचित तुम्हाला वाटणार नाही. तरीसुद्धा, बायबलचे वितरण आणि भाषांतर यांसंबंधीचे आकडे अत्यंत प्रभावित करणारे आहेत आणि विश्‍वव्यापी प्रमाणावर बायबलला लाभलेल्या पसंतीची ते ग्वाही देतात. सबंध इतिहासातले सर्वाधिक खपाचे आणि सर्वाधिक भाषांत भाषांतरित झालेले पुस्तक तुमच्याकरता वाचनीय आहे यात शंकाच नाही.

[तळटीपा]

a बायबलच्या पाठोपाठ क्वोटेशन्स फ्रॉम द वर्क्स ऑफ माओ द्‌सी-दुंग ही लाल पुस्तिका सर्वात व्यापक प्रमाणावर वितरण झालेले प्रकाशन असावे असा समज आहे; या पुस्तिकेच्या अंदाजे ८० कोटी प्रती विकण्यात किंवा वितरीत करण्यात आल्या आहेत.

b भाषांच्या संख्यांसंबंधी आकडे युनायटेड बायबल सोसायटीज तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या आकडेवारीवर आधारित आहेत.

[६ पानांवरील चित्र]

चल खिळ्यांच्या तंत्राने मुद्रित केलेले पहिले संपूर्ण पुस्तक, लॅटिन भाषेतील गुटेनबेर्क बायबल