व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दुसरे कोणते असे पुस्तक आहे

दुसरे कोणते असे पुस्तक आहे

दुसरे कोणते असे पुस्तक आहे

• ज्याने जगातील सर्वात महान कला, वाङ्‌मय आणि संगीत यांवर इतका मोठा प्रभाव पडला आहे आणि ज्याचा कायदेशास्त्रावरही जबरदस्त पगडा राहिला आहे?

• ज्याच्या हजारो वर्षांपासून मनुष्याच्या हातून असंख्य प्रतिकृती तयार करण्यात आल्या असूनही ते जसे लिहिण्यात आले होते तसेच आपल्यापर्यंत आले आहे?

• ज्याने असा विलक्षण आत्मत्याग प्रेरित केला आहे की त्याचे भाषांतर करण्यासाठी काहींनी स्वेच्छेने अनेक संकटे सोसली एवढेच काय तर मृत्यूही पत्करला?

• जे २,१०० पेक्षा अधिक भाषांत भाषांतरीत झाले असून त्याअर्थी ९० टक्के मानवजातीसाठी उपलब्ध आहे?

• ज्यांत वैज्ञानिक वस्तुस्थितींचा त्यांचा शोध लागण्याच्या कितीतरी शतकांआधीच उल्लेख केलेला आहे?

• ज्यात सर्व जातीय, वंशीय, आणि राष्ट्रीय पार्श्‍वभूमींच्या लोकांना आपल्या जीवनात सुधारणा करण्यास सहायक ठरतील अशी कालनिरपेक्ष तत्त्वे आहेत?

• ज्यात खरी ठरलेली निःसंदिग्ध भाकिते आहेत, जी ऐतिहासिक घटनांवरून सिद्ध होतात?

अशा एका पुस्तकाचे परीक्षण करणे फलप्रद ठरणार नाही का?