व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उपस्थितांसाठी माहिती

उपस्थितांसाठी माहिती

अटेंडंट या बांधवांना तुम्हाला मदत करण्यासाठी नेमण्यात आलं आहे. त्यामुळे पार्किंग, गर्दीवर नियंत्रण ठेवणं, जागा राखणं व इतर गोष्टींबद्दल ते जेव्हा तुम्हाला सूचना देतात तेव्हा कृपया त्यांच्याशी सहकार्य करा.

बाप्तिस्मा बाप्तिस्मा घेणाऱ्‍या उमेदवारांना बसण्यासाठी स्टेजसमोर काही जागा आरक्षित केलेल्या असतील. उमेदवारांनी, शनिवारी सकाळी बाप्तिस्म्याचे भाषण सुरू होण्याआधी आरक्षित जागेवर येऊन बसावं. कृपया प्रत्येकाने सोबत एक टॉवेल आणि योग्य प्रकारचे कपडे आणावेत.

दान सर्वांनाच अधिवेशनाच्या कार्यक्रमाचा पूर्ण आनंद घेता यावा व यहोवासोबतचं नातं आणखी घनिष्ठ करता यावं, म्हणून बराच खर्च करून बसण्यासाठी पुरेशी जागा, व्हिडिओ व साऊंड सिस्टम आणि इतर अनेक सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. तुम्ही स्वेच्छेने देत असलेल्या दानातून हा खर्च भागवला जातो. तसंच, जगभरात होणाऱ्‍या कार्यासाठीसुद्धा या दानाचा उपयोग केला जातो. दान टाकण्यासाठी सभागृहात ठिकठिकाणी स्पष्ट शब्दांत, ‘दानपेटी’ असं लिहिलेल्या पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय, तुम्ही donate.pr418.com या वेबसाईटवरूनही ऑनलाईन दान देऊ शकता. तुम्ही देत असलेल्या दानाची आम्ही मनापासून कदर करतो. राज्याशी संबंधित कार्याला हातभार लावण्यासाठी तुम्ही उदार मनाने जे काही देता त्याबद्दल नियमन मंडळ तुमचे आभार मानतं.

प्रथमोपचार कृपया हे लक्षात घ्या, की ही वैद्यकीय सेवा फक्‍त तातडीच्या प्रसंगांसाठीच  आहे.

हरवलेल्या वस्तू अधिवेशनाच्या आवारात सापडलेल्या सर्व वस्तू या विभागात आणून द्याव्यात. तुमची एखादी वस्तू हरवली असेल, तर या विभागात जाऊन त्या वस्तूची ओळख पटवून, ती घ्यावी. पालकांपासून चुकामूक झालेल्या मुलांनादेखील या विभागात न्यावं. पण हा विभाग मुलांची काळजी घेणारा विभाग आहे असं समजू नये. कृपया आपल्या मुलांवर लक्ष असू द्या आणि त्यांना नेहमी तुमच्यासोबत ठेवा.

बसण्याची व्यवस्था स्वतःसाठी जागा पकडताना कृपया इतरांचाही विचार करा. लक्षात असू द्या, की तुम्ही केवळ तुमच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास करणाऱ्‍यांसाठी, तुमच्यासोबत एकाच घरात राहणाऱ्‍यांसाठी किंवा तुमच्यासोबत बायबलचा अभ्यास करत असलेल्यांसाठीच जागा राखून ठेवू शकता. तुम्ही ज्या सीटवर बसणार आहात त्याच्या आजूबाजूच्या सीटवर वस्तू ठेवू नका.

स्वयंसेवा अधिवेशनातील कामाला हातभार लावण्याची तुमची इच्छा असेल, तर माहिती आणि स्वयंसेवा विभागाशी संपर्क साधा.

खास सभा

सुवार्तिकांसाठी प्रशाला ज्या पायनियरांचं वय २३ ते ६५ यामध्ये आहे व ज्यांना आपली सेवा वाढवायची इच्छा आहे, अशांना रविवारी दुपारी सुवार्तिकांच्या प्रशालेसाठी असलेल्या सभेला उपस्थित राहायचं आमंत्रण देण्यात येत आहे. या सभेचं निश्‍चित ठिकाण व वेळ यांबद्दल घोषणा केली जाईल.

यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळातर्फे आयोजित

© 2020 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania