व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

या माहितीपत्रकाचा उद्देश

या माहितीपत्रकाचा उद्देश

डच तत्त्वज्ञानी, स्पिनोझा यांनी लिहिले: “मानवी कृत्ये पाहून मी ना हसतो, ना रडतो, ना त्यांना दोष देतो; शक्यतो मी त्यांना समजून घेण्याचाच प्रयत्न करत आलोय.” शिक्षक या नात्याने तुमच्या देखरेखीखाली असलेल्या विद्यार्थ्यांचे दृष्टिकोन, त्यांची पार्श्‍वभूमी आणि त्यांचा विश्‍वास समजून घेणे हे खरोखरच तुमच्यासमोरील एक आव्हान आहे; या विद्यार्थ्यांमध्ये यहोवाच्या साक्षीदारांची मुलेही आहेत. काही वेळा, हे विद्यार्थी काही विशिष्ट बाबतींत कदाचित इतरांपेक्षा वेगळी भूमिका घेतील. परंतु अशा प्रकारची पावले विद्यार्थ्याच्या धार्मिकतेमुळे आणि नैतिकतेमुळे उचलली जातात तेव्हा तुम्ही त्यांची दखल घेणे गरजेचे आहे. हे माहितीपत्रक वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी (यहोवाच्या साक्षीदारांची प्रकाशक संस्था) याद्वारे तयार करण्यात आलेले असून तुम्हाला साक्षीदार विद्यार्थ्यांना अधिक चांगल्याप्रकारे समजून घेता यावे हा यामागचा उद्देश आहे. याचे काळजीपूर्वक वाचन करण्यासाठी तुम्ही वेळ काढाल, अशी आम्ही आशा करतो.

दुसऱ्‍या व्यक्‍तीचे धार्मिक विश्‍वास समजून घेण्याचा असा अर्थ होत नाही, की ते विश्‍वास तुम्हीही स्वीकारावेत किंवा त्यांप्रमाणे तुम्ही चालावे; किंवा तुम्ही धर्मांतर करावे, हादेखील या माहितीमागचा हेतू नाही. हे माहितीपत्रक तुमच्यावर आणि तुमच्या विद्यार्थ्यांवर साक्षीदारांचे धार्मिक दृष्टिकोन लादण्याचा प्रयत्न करत नाही. तुमच्या काही विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांकडून शिकवल्या जाणाऱ्‍या तत्त्वांविषयी आणि विश्‍वासांविषयी तुम्हाला परिचित करून देण्याचा आमचा मानस आहे. जेणेकरून साक्षीदार विद्यार्थ्यांना समजून घेण्यास आणि त्यांना सहकार्य करण्यास तुम्हाला अधिक सोपे जाईल. अर्थातच, प्रत्येक मूल त्याचा स्वतःचा विवेक विकसित करण्याचे शिकत असते त्यामुळे शिकवल्या जाणाऱ्‍या गोष्टी मुले प्रत्येक वेळेस करतीलच असे नाही.

शालेय जीवनाचा आपल्या मुलांनी पुरेपूर लाभ घ्यावा, असे बहुतेक पालकांना वाटते आणि यहोवाचे साक्षीदार यास अपवाद नाहीत. यास्तव, आपल्या शिक्षकांना सहकार्य करावे, असे ते त्यांच्या मुलांना शिकवतात. दुसरीकडे पाहता, शिक्षक, विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी समजूतदारपणे आणि आदराने वागतात तेव्हा साक्षीदार पालक आणि त्यांची मुले त्या गोष्टीची नक्कीच गुणग्राहकता बाळगतील.

यहोवाचे साक्षीदार असे ख्रिस्ती आहेत ज्यांविषयी संपूर्ण जगाला माहिती आहे. तथापि, काही वेळा त्यांच्याविषयी गैरसमज होतो. यास्तव, तुमच्या देखरेखीखाली असलेल्या साक्षीदार मुलांना अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यास हे माहितीपत्रक तुम्हाला मदत करील, अशी आमची आशा आहे. विशेषतः, काही विशिष्ट प्रसंगी ही मुले इतरांपेक्षा वेगळे असण्याची मागणी का करतील, हे तुम्हाला कळून येईल, असे आम्ही अपेक्षितो.