व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शिक्षणाविषयी यहोवाच्या साक्षीदारांचा दृष्टिकोन

शिक्षणाविषयी यहोवाच्या साक्षीदारांचा दृष्टिकोन

सर्व पालकांप्रमाणे यहोवाच्या साक्षीदारांनाही त्यांच्या मुलांच्या भवितव्याची काळजी वाटते. यास्तव ते शिक्षणाला खूप महत्त्व देतात. “शिक्षणामुळे लोकांना समाजाचे उपयोगी सदस्य होण्याकरता मदत मिळाली पाहिजे. स्वतःच्या सांस्कृतिक वारशाची जाणीव करून देऊन समाधानी जीवन जगण्यासही शिक्षण सहायक ठरले पाहिजे.”

दि वर्ल्ड बुक एन्सायक्लोपीडियाचा हा संदर्भ दाखवून देतो, की शालेय शिक्षणाचा एक मुख्य उद्देश म्हणजे मुलांना दैनंदिन जीवनाकरता तयार करणे. मोठे झाल्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यास शक्य व्हावे, हे यामध्ये समाविष्ट आहे. हे एक धार्मिक कर्तव्य असल्याचा यहोवाच्या साक्षीदारांचा विश्‍वास आहे. स्वतः बायबल म्हणते: “जर कोणी स्वकीयांची व विशेषेकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्‍वास नाकारला आहे; तो माणूस विश्‍वास न ठेवणाऱ्‍या माणसापेक्षा वाईट आहे.” (१ तीमथ्य ५:८) शाळेत घालवलेली वर्षे मुलांना त्यांच्या भावी आयुष्यात येणाऱ्‍या जबाबदाऱ्‍या पार पाडण्यास तयार करतात. यामुळे शिक्षणाकडे मोठ्या गांभीर्याने पाहण्यात यावे, असे यहोवाच्या साक्षीदारांना वाटते.

“शिक्षणामुळे लोकांना समाजाचे उपयोगी सदस्य होण्याकरता मदत होण्यास हवी. स्वतःच्या सांस्कृतिक वारशाची जाणीव करून देऊन समाधानी जीवन जगण्यासही शिक्षण सहायक ठरले पाहिजे.”​—दि वर्ल्ड बुक एन्सायक्लोपीडिया

साक्षीदार बायबलच्या या आज्ञेचे पालन करण्याचा प्रयत्न करतात: “जे काही तुम्ही करिता ते माणसांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा.” (कलस्सैकर ३:२३) हे तत्त्व दैनंदिन जीवनात पदोपदी लागू होते आणि शाळेच्या बाबतीत सुद्धा. यामुळे परिश्रम करण्याचे आणि शाळेतील कार्यहालचाली मनःपूर्वक पार पाडण्याचे उत्तेजन साक्षीदार त्यांच्या मुलांना देतात.

“जे काही तुम्ही करिता ते माणसांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा.”​—कलस्सैकर ३:२३.

आपण राहात असलेल्या देशाच्या कायद्यांचे आपण पालन करावे, असेही बायबल शिकवते. त्यामुळे कायद्यानुसार एका विशिष्ट वयापर्यंत शिक्षण आवश्‍यक असते तेव्हा यहोवाचे साक्षीदार त्या कायद्याचे पालन करतात.—रोमकर १३:१-७.

हितकर करमणूक, संगीत, छंद, शारीरिक व्यायाम, ग्रंथालयांना आणि संग्रहालयांना भेटी देणे वगैरे गोष्टी संतुलित शिक्षणामध्ये मोलाचा वाटा उचलतात

बायबल दररोजच्या जीवनाकरता आवश्‍यक प्रशिक्षणाचे महत्त्व कमी करत नसले तरी शिक्षण हेच केवळ एकमेव किंवा प्रमुख लक्ष्य आहे असेही ते दाखवून देत नाही. यशस्वी शिक्षणामुळे मुलांच्या मनातील जगण्याचा आनंद वाढवण्यास हवा आणि समाजाचे चांगले, संतुलित सदस्य होण्याकरता त्यांना मदत मिळावी. यास्तव, यहोवाच्या साक्षीदारांना वाटते, की वर्गात शिकवण्यात येणाऱ्‍या गोष्टींसोबत इतरही खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ते असे मानतात, की हितकर करमणूक, संगीत, छंद, शारीरिक व्यायाम, ग्रंथालयांना आणि संग्रहालयांना भेटी देणे वगैरे गोष्टी संतुलित शिक्षणामध्ये मोलाचा वाटा उचलतात. याशिवाय, वडीलधाऱ्‍यांचा आदर करावा आणि त्यांना मदत करण्यास सदैव तयार असावे, या गोष्टी देखील साक्षीदार त्यांच्या मुलांना शिकवतात.

अतिरिक्‍त शिक्षणाविषयी काय?

नवनवीन तंत्रज्ञानामुळे श्रमिक बाजारांमध्ये नेहमी बदल होत आहेत. परिणामी, अनेक युवकांना अशा कार्यक्षेत्रांत किंवा व्यवसायात काम करावे लागेल ज्यांचे त्यांनी कोणतेही विशेष प्रशिक्षण घेतलेले नाही. अशाप्रकारच्या परिस्थितीमुळे, त्यांची काम करण्याची सवय आणि व्यक्‍तिगत प्रशिक्षण, विशेषतः बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांची क्षमता, त्यांच्या कामी पडेल. यास्तव, हे केव्हाही अधिक चांगले, की विद्यार्थी मोठे होऊन अशा प्रकारचे लोक व्हावेत ज्यांच्याकडे ‘गच्च भरलेल्या डोक्याऐवजी चांगले तयार डोके आहे,’ असे प्रबोधन काळातील निबंधकार मॉनटेन यांनी म्हटले.

गरीब तसेच श्रीमंत राष्ट्रांतील पुरेसे प्रशिक्षण न मिळालेल्या तरुणांना बेरोजगारीचा धोका हा असतोच. यास्तव, श्रमिक बाजार, कायद्याने अनिवार्य ठरवलेल्या किमान शिक्षणाखेरीज आणखी अपेक्षा करत असल्यास अतिरिक्‍त शिक्षणाविषयी निर्णय घेण्याकरता मुलांना मार्गदर्शन देण्याची जबाबदारी त्यांच्या पालकांची आहे; अतिरिक्‍त शिक्षणामुळे संभावणारे लाभ आणि त्याग यांचा पालकांनी काळजीपूर्वक विचार करावा.

तथापि, तुम्ही कदाचित या गोष्टीशी सहमत असाल, की जीवनात यशस्वी होण्यामध्ये भौतिक संपन्‍नतेपेक्षा अधिक काही अंतर्भूत आहे. अलीकडील काळात, करियरलाच आपले संपूर्ण जीवन मानलेल्या पुरुषांची आणि स्त्रियांची नोकरी गेली तेव्हा त्यांचे सर्वकाही गेले. काही पालक त्यांच्या व्यवसायात इतके गुंतले आहेत, की त्यांना त्यांच्या कौटुंबिक जीवनाकरता आणि मुलांकरता वेळच शिल्लक राहिला नाही; मुलांना मोठे करण्यात ते उणे पडले आहेत.

स्पष्टपणे, संतुलित शिक्षणामध्ये या गोष्टीचा विचार करण्यात यावा, की आपल्याला खरा आनंद मिळण्यासाठी भौतिक संपन्‍नतेखेरीज अधिक काही आवश्‍यक आहे. येशू ख्रिस्ताने म्हटले: “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्‍वराच्या मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगेल, असा शास्त्रलेख आहे.” (मत्तय ४:४) ख्रिस्ती या नात्याने यहोवाचे साक्षीदार भौतिक गरजा पूर्ण करण्याकरता योग्य होण्यासोबतच नैतिक आणि आध्यात्मिक गुण विकसित करण्याचे महत्त्व जाणतात.