व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

समारोप

समारोप

यहोवाच्या साक्षीदारांच्या विश्‍वासांविषयी सविस्तर चर्चा करण्याचा या माहितीपत्रकाचा उद्देश नव्हता. उलटपक्षी, साक्षीदारांच्या काही मोजक्या तत्त्वांचे स्पष्टीकरण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. शिवाय तुमच्या विद्यार्थ्यांच्या पालकांपैकी एक किंवा दोघेही साक्षीदार असल्यास त्यांच्यावर त्याचा नेमका कसा प्रभाव पडत असतो हे दाखवण्याचाही आम्ही प्रयत्न केला आहे.

यहोवाचे साक्षीदार त्यांच्या मुलांच्या आध्यात्मिक विकासाला फार महत्त्व देतात. यामुळे त्यांच्या मुलांचा दुसऱ्‍या क्षेत्रांतही विकास घडून येतो, असा त्यांचा पूर्ण विश्‍वास आहे. ज्या विश्‍वासांना ते जडून राहतात आणि ज्या तत्त्वांनुसार ते जगतात त्यामुळे त्यांच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो आणि दररोजच्या समस्यांना तोंड देण्यासही त्यांना मदत होते. याशिवाय, त्यांच्या विश्‍वासांनी आणि तत्त्वांनी त्यांना संपूर्ण जीवनभर उत्सुक विद्यार्थी आणि चांगले नागरिक होण्यास प्रेरित करण्यास हवे.

जीवनाच्या बाबतीत वास्तववादी होण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे यहोवाचे साक्षीदार शिक्षणाला खूप महत्त्व देतात. त्यामुळे तुम्हाला पूर्ण सहकार्य करण्याची त्यांची मनस्वी इच्छा आहे. संपूर्ण जगभरात त्यांच्या घरांत आणि त्यांच्या उपासनेच्या ठिकाणी ते त्यांच्या मुलांना या फलदायक सहकार्यामध्ये स्वतःची भूमिका पार पाडण्याचे उत्तेजन देत राहतील.