व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आस्थेवाईक लोकांनी अनेकदा विचारलेले प्रश्‍न

आस्थेवाईक लोकांनी अनेकदा विचारलेले प्रश्‍न

आस्थेवाईक लोकांनी अनेकदा विचारलेले प्रश्‍न

काही विशिष्ट प्रश्‍न इतर प्रश्‍नांपेक्षा अनेकदा उद्‌भवतात. त्यातील काहींचा विचार येथे केला आहे.

देव प्रीती आहे, तर तो दुष्टाईला अनुमती का देतो?

देवाने दुष्टाईला अनुमती दिली आहे, आणि पृथ्वीवरील लाखो लोक स्वच्छेने त्याचा अवलंब करतात. उदाहरणार्थ, ते युद्धांची घोषणा करतात, मुलांवर बॉम्ब फेकतात, पृथ्वीला होरपळून टाकतात व दुष्काळ घडवतात. लाखो लोक धुम्रपान करतात व फुफ्फुसाचा कर्करोग जडवून घेतात, व्यभिचार करतात आणि गुप्त रोगाची लागण होते, प्रमाणाबाहेर मादक पदार्थांचे सेवन करतात व यकृत कठीण होण्याचा आजार व अशाच प्रकारच्या इतर रोगांनाही आमंत्रण देतात. या लोकांना दुष्टाईचा अंत व्हावयाची खरोखर इच्छा नसते. तर केवळ अशा गोष्टीमुळे ज्या शिक्षा मिळतात, त्या शिक्षेचाच अंत ते करू इच्छितात. त्यांनी जे पेरले आहे त्याची कापणी केल्यावर ते ओरडतात, “ह्‍या सर्व गोष्टी मलाच का होतात?” आणि नीतीसूत्रे १९:३ म्हणते त्याप्रमाणे ते देवाला दोष देतात: “मनुष्याची मूर्खता त्याचा मार्ग विपरीत करते, आणि त्याचे हृदय प्रभूवर (मराठी कॉमन लँग्वेज बायबल) चिडते.” आणि जर देवाने त्यांचे हे दुष्कृत्य थांबवले तर, ते करण्याचे स्वातंत्र्य गमावल्याबद्दल ते बंड करतील!

दुष्टाईला अनुमती देण्याचे यहोवाचे मुख्य कारण, सैतानाच्या आव्हानाला उत्तर देण्याचे आहे. दियाबल सैतानाने म्हटले की, परीक्षेत असताना देवाला इमानदार असा कोणीही मनुष्य ह्‍या पृथ्वीवर राहू शकणार नाही. (ईयोब १:६-१२; २:१-१०) यास्तव, यहोवा, सैतानाला त्याच्या ह्‍या आव्हानाला शाबीत करून दाखवण्यासाठी आतापर्यंत अनुमती देतो. (पडताळा निर्गम ९:१६.) आता, सैतान त्याच्या आव्हानाला सिद्ध करत असताना, देवाच्या विरूद्ध होण्यासाठी लोकांवर पीडा आणतो. (प्रकटीकरण १२:१२) तथापि, ईयोबाने सत्वनिष्ठा राखून ठेवली, येशूनेही राखली आणि खरे ख्रिश्‍चनही आज राखून आहेत.—ईयोब २७:५; ३१:६; मत्तय ४:१-११; १ पेत्र १:६, ७.

लोक जेथे अनंतकाळासाठी जगतील अशा एका पार्थिव नंदनवनावर मी विश्‍वास ठेवू इच्छितो, परंतु हे खरेच होणार आहे का?

मानवजातीला कित्येक शतकांपासून वाईटाचा अनुभव येत असल्यामुळे हीच वस्तुस्थिती खरी आहे असे भासेल. परंतु पवित्र शास्त्रानुसार ते तसे नाही. यहोवाने पृथ्वी निर्माण केली आणि वनस्पतींची व प्राणी जीवनाची काळजी घेऊ शकतील व तिच्या सौंदर्याचा नाश करण्याऐवजी सांभाळ करणाऱ्‍या धार्मिक पुरूष आणि स्त्रियांनी भरून टाकण्यास मानवजातीला सांगितले. (पृष्ठ. १२ आणि १७ पाहा) ते वचनदत्त नंदनवन सत्य असण्यासाठी अतिशय चांगले आहे असे म्हणण्यापेक्षा सध्याची दुःखद स्थिती अशीच चालू राहण्यासाठी अतिशय वाईट आहे. नंदनवन त्याची जागा घेईल.

ह्‍या अभिवचनांवर विश्‍वास ठेवणे हा काही फाजील भोळेपणा नाही. “विश्‍वास वार्ता ऐकण्यावरून होतो.” देवाच्या वचनाचा अभ्यास केल्यावर, त्याचे सुज्ञान स्पष्ट होते व विश्‍वास वाढतो.—रोमकरास १०:१७; इब्रीकरास ११:१.

पवित्र शास्त्र केवळ दंतकथा व अशास्त्रीय आहे असे उपहास करून म्हणणाऱ्‍या लोकांना मी कसे उत्तर देऊ शकेन?

पवित्र शास्त्रीय भूगर्भशास्त्र हे, पवित्र शास्त्राच्या ऐतिहासिक अचूकतेला पुष्कळ बळकटी आणते. खरे विज्ञान पवित्र शास्त्रासोबत सुसंगत आहे. पुढील वास्तविकता, ऐहिक विद्वानांनी शोध लावण्याआधीच पवित्र शास्त्रात फार पूर्वीपासून होत्या. जसे की: पृथ्वीची वाढ होत असतानाच्या अवस्थेतेचा अनुक्रम, पृथ्वी वर्तुळाकार आहे, ती निराधार टांगली आहे, व पक्षी स्थलांतर करतात.—उत्पत्ती, १ अध्याय; यशया ४०:२२; ईयोब २६:७; यिर्मया ८:७.

पवित्र शास्त्राची प्रेरकता ही पूर्ण झालेल्या भविष्यवाणींतून दाखवली आहे. जागतिक सत्तांचा उदय व पाडाव याबद्दल तसेच मशीहा कधी येईल व मारला जाईल याविषयी दानीएलाने भाकीत केले. (दानीएल, अध्याय २, ८; ९:२४-२७) आज, इतर आणखी काही भविष्यवाण्या पूर्ण होऊन, “शेवटल्या दिवसांची” ओळख करून देत आहेत. (२ तीमथ्य ३:१-५; मत्तय, २४ अध्याय) अशाप्रकारचे पूर्वज्ञान मानवाच्या कह्‍यात नाही. (यशया ४१:२३) आणखी पुष्टीकरता, वॉचटावर संस्थेची द बायबल—गॉडस्‌ वर्ड ऑर मॅन्झ? आणि लाईफ—हाऊ डीड इट गेट हियर? बाय इव्होल्युशन ऑर बाय क्रिएशन? ही पुस्तके पाहा.

पवित्र शास्त्रावरील प्रश्‍नांची उत्तरे देण्यास मला कसे शक्य होईल?

म्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे आणि त्यावर मनन केले पाहिजे, त्यासोबतच तुम्हाला मार्गदर्शन मिळण्यास देवाच्या पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. (नीतीसूत्रे १५:२८; लूक ११:९-१३) पवित्र शास्त्र म्हणते, “जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो.” (याकोब १:५) तसेच, सल्ला घेण्यासाठी योग्य अशी पवित्र शास्त्र अभ्यासाची साधने आहेत. फिलीप्पाने हबशी षंढाबरोबर जसा अभ्यास केला त्याप्रमाणेच, अनेकवेळा, इतरांकडून मदतीची आवश्‍यकता असते. (प्रे. कृत्ये ८:२६-३५) यहोवाचे साक्षीदार आस्थेवाईक लोकांच्या घरी जाऊन विनामूल्य पवित्र शास्त्र अभ्यास चालवतात. ह्‍या सेवेची विनंती अगदी मोकळ्या मनाने करा.

यहोवाच्या साक्षीदारांचा आज अनेक लोक विरोध करून त्यांच्याबरोबर अभ्यास करू नका असे मला का सांगतात?

येशूच्या प्रचारकार्याला विरोध होता, आणि त्याच्या शिष्यांचाही विरोध केला जाईल असे त्याने म्हटले. येशूच्या शिकवणींचा प्रभाव काहींवर झाला तेव्हा, धार्मिक विरोधकांनी टोमणा देत असे विचारले: “तुम्हीही फसला आहा काय? अधिकाऱ्‍यांपैकी किंवा परुश्‍यांपैकी कोणीतरी त्याच्यावर विश्‍वास ठेवला आहे काय?” (योहान ७:४६-४८; १५:२०) साक्षीदारांबरोबर अभ्यास करू नका असा सल्ला देणाऱ्‍या अनेकजणांना एकतर अपुरी माहिती असते किंवा मनात कलुषितपणा असतो. साक्षीदारांसोबत अभ्यास करून तर पहा, की तुमचे पवित्र शास्त्राचे ज्ञान वाढते की नाही.—मत्तय ७:१७-२०.

ज्या लोकांना त्यांचा स्वतःचा धर्म आहे अशा लोकांकडे साक्षीदार का जातात?

असे करण्यात ते येशूचे अनुकरण करतात. तो यहुद्यांकडे गेला. यहुदियांना त्यांचा स्वतःचा धर्म होता, परंतु अनेक बाबतीत तो धर्म देवाच्या वचनापासून दूर गेलेला होता. (मत्तय १५:१-९) प्रत्येक राष्ट्रांचा, ख्रिश्‍चन म्हणविणारा असो की गैर ख्रिस्ती असो कोणता ना कोणता धर्म आहे. देवाच्या वचनाशी तंतोतंत जुळणाऱ्‍या विश्‍वासाला धरून राहणे हे लोकांसाठी फार महत्त्वपूर्ण आहे, आणि त्यांना अशी मदत करण्यासाठी साक्षीदारांच्या प्रयत्नात शेजाऱ्‍यांवरील प्रीती समाविष्ट असते.

त्यांचा धर्म हाच केवळ खरा धर्म आहे असा विश्‍वास साक्षीदार करतात का?

ज्या व्यक्‍तीला धर्माचे गांभीर्य आहे त्याने तो बरोबरचा आहे हे जाणले पाहिजे. अन्यथा, तो किंवा ती यामध्ये का गोवला असता? ख्रिश्‍चनांना सूचना दिली आहे: “सर्व गोष्टींची पारख करा; चांगले ते बळकट धरा.” (१ थेस्सलनीकरास ५:२१) एकच खरा विश्‍वास असल्यामुळे, एखाद्याने याची खात्री करावी की त्याच्या विश्‍वासांना, शास्त्रीय आधार दिला जाऊ शकतो. इफिसकरास ४:५ याला पुष्टी देत, “प्रभू एकच, विश्‍वास एकच, बाप्तिस्मा एकच” असे म्हणते. तारणाकडे नेणारे अनेक मार्ग, अनेक धर्म आहेत या आधुनिक, शिथिल दृष्टिकोनाला येशूने सहमती दिली नाही. या उलट, त्याने म्हटले: “परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद आणि मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत.” यहोवाच्या साक्षीदारांचा विश्‍वास आहे की त्यांना तो मार्ग सापडला आहे. नाहीतर, ते दुसऱ्‍या धर्माकडे वळाले असते.—मत्तय ७:१४.

त्यांचाच केवळ बचाव होईल असा त्यांचा विश्‍वास आहे का?

नाही. अनेक लाखो लोक जे शतकांपूर्वी होते व जे यहोवाचे साक्षीदार नव्हते ते पुनरूत्थानात पुन्हा येतील व त्यांनाही जीवनाची संधी असेल. आज जिवंत असलेले अनेक लोक अजूनही “मोठेसंकट” येण्याआधी सत्य आणि धार्मिकतेसाठी टिकाव धरू शकतात व त्यांना तारण लाभेल. शिवाय, येशूने म्हटले की आपण एकमेकांचा न्याय करू नये. आपण बाह्‍यस्वरूपावर पाहतो; परंतु देव आमचे हृदय पारखतो. तो अगदी अचूकतेने पाहून दयाळूपणे न्याय करतो. त्याने आमच्या नव्हे तर येशूच्या हाती न्याय करण्याचे काम सोपवले आहे.—मत्तय ७:१-५; २४:२१.

यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना उपस्थित राहणाऱ्‍यांकडून कोणत्या आर्थिक देणगीची अपेक्षा केली जाते?

पैशांच्या वर्गणीसंबंधी प्रेषित पौलाने म्हटले: “प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे. दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.” (२ करिंथकर ९:७) यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात आणि अधिवेशनात कधीही वर्गणी गोळा केली जात नाही. तेथे पेट्या ठेवल्या जातात जेणेकरून वर्गणी देऊ इच्छिणाऱ्‍या कोणालाही ते सोईस्कर होईल. इतर लोक किती देतात हे कोणालाही ठाऊक नसते. काही जण इतरांपेक्षा अधिक देऊ शकतात; काही जण तर काहीच देऊ शकत नाहीत. यरुशलेमच्या मंदिरातील भांडार व त्यात दान टाकणाऱ्‍यांवर विवेचन करताना येशूने योग्य दृष्टिकोन दाखवला व तो म्हणजे: किती पैसे दिले त्यावर नव्हे तर एखाद्याची देण्याची क्षमता व त्याची देण्याची इच्छा गणली जाते.—लूक २१:१-४.

मी यहोवाच्या साक्षीदारांमधला एक झालो तर, ते ज्याप्रकारे प्रचार करतात त्याप्रकारे मलाही करावा लागेल अशी अपेक्षा केली जाते का?

ख्रिस्ताच्या राज्याखाली पार्थिव नंदनवनाच्या अभिवचनाच्या ज्ञानाने भरल्यावर, एखाद्याला त्याची सहभागिता इतरांबरोबर करण्याची इच्छा होते. तुम्हालाही तसेच वाटेल. ती सुवार्ता आहे!—प्रे. कृत्ये ५:४१, ४२.

तुम्ही येशू ख्रिस्ताचे शिष्य आहात हे दाखवण्याचा हा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे. पवित्र शास्त्रात, येशूला “विश्‍वसनीय व खरा साक्षी” म्हटले आहे. पृथ्वीवर असताना त्याने असे म्हणत प्रचार केला: “स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे,” आणि त्याच्या शिष्यांनाही असेच करण्यास त्याने पाठवले. (प्रकटीकरण ३:१४; मत्तय ४:१७; १०:७) पुढे, येशूने त्याच्या शिष्यांना आज्ञा दिली: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकास शिष्य करा, . . . त्यास शिकवा.” त्याने असेही भाकीत केले, अंत येण्यापूर्वी, “साक्षीसाठी राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल.”—मत्तय २८:१९, २०; २४:१४.

ह्‍या सुवार्तेचा प्रचार करण्याचे अनेक मार्ग आहेत. मित्रांसोबत व ओळखीच्या लोकांसोबत संभाषण अनेकवेळा असे करण्यासाठी मार्ग तयार करते. काही जण पत्र लिहून किंवा टेलिफोनचा उपयोग करून सुवार्तेचा प्रचार करतात. इतर काही लोक, त्यांच्या ओळखीच्या लोकांचा अधिक आस्थेचा विषय असेल असा विचार करून साहित्य पोस्टाद्वारे पाठवतात. साक्षीदार एकालाही न चुकवण्याच्या उद्देशाने हा संदेश घेऊन घरोघरी जातात.

पवित्र शास्त्रामध्ये हे उबदार निमंत्रण आहे: “आत्मा व वधू ही म्हणतात, ये. ऐकणाराही म्हणो, ये. आणि तान्हेला येवो; ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो.” (प्रकटीकरण २२:१७) नंदनवनमय पृथ्वी आणि तिच्या आशीर्वादांबद्दल इतरांना स्वखुषीने सांगितले पाहिजे, व ह्‍या सुवार्तेची सहभागिता करण्याची इच्छा हृदयातून असली पाहिजे.

यहोवाचे साक्षीदार आणि त्यांच्या विश्‍वासांबद्दल तुमचे इतर प्रश्‍न आहेत याची आम्हाला खात्री आहे. कदाचित काही स्वाभाविकतेत विवाद्य आहेत. आम्हाला त्यांची उत्तरे देण्यास आवडेल. ह्‍या माहितीपत्रकात कमी जागा असल्यामुळे आम्ही तुम्हाला स्थानिक साक्षीदारांना त्यांच्या राज्य सभागृहात किंवा ते तुमच्या घरी येतात तेव्हा त्यांना ती उत्तरे विचारण्याचे निमंत्रण देतो. किंवा तुम्ही तुमचे प्रश्‍न तुमच्या जवळपास असलेल्या वॉचटावर संस्थेच्या शाखा दप्तराला पाठवू शकता; पुढील यादी पाहा.