व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जी सुवार्ता तुम्ही ऐकावी असे त्यांना वाटते

जी सुवार्ता तुम्ही ऐकावी असे त्यांना वाटते

जी सुवार्ता तुम्ही ऐकावी असे त्यांना वाटते

येशू पृथ्वीवर असताना, त्याच्या शिष्यांनी त्याच्याजवळ येऊन पृच्छा केली: “आपल्या उपस्थितीचे व ह्‍या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हास सांगा?” अनेक राष्ट्रांचा समावेश असलेली युद्धे, दुष्काळ, रोगराई, भूमिकंप, भ्रष्टाचाराची वाढ, अनेकांना फसवणारे खोटे संदेष्टे, त्याच्या खऱ्‍या शिष्यांचा द्वेष आणि छळ, अनेक लोकांमध्ये धार्मिकतेची प्रीती थंडावणे या सर्व गोष्टी होतील असे त्याने उत्तर दिले. ह्‍या सर्व गोष्टींची सुरवात, ख्रिस्ताच्या अदृश्‍य उपस्थितीचे व स्वर्गीय राज्य अत्यंत निकट असल्याचे चित्रित करील. ही वार्ता—सुवार्ता असेल! यास्तव येशूने त्या चिन्हाचा एक भाग म्हणून आणखी असे म्हटले: “सर्व राष्ट्रास साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.”—मत्तय २४:३-१४.

अलिकडच्या जागतिक घटना वाईट आहेत हे स्पष्टच आहे. परंतु ते जी गोष्ट सुचवितात, ती ख्रिस्ताची उपस्थिती, ही उत्तम गोष्ट आहे. यास्तव, येशू म्हणाला: “ह्‍या गोष्टीस आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा; कारण तुमचा मुक्‍तीसमय जवळ आला आहे.” (लूक २१:२८) विस्तृतपणे घोषणा केलेल्या, १९१४ ह्‍या वर्षी, या सर्व गोष्टींच्या घडण्याची सुरवात झाली! विदेश्‍यांच्या काळाच्या समाप्तीला व मानवी राज्यापासून ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राजवटीच्या स्थित्यंतराच्या काळाच्या सुरवातीला त्यांनी चिन्हीत केले.

स्थित्यंतराचा काळ होणार होता हे, स्तोत्रसंहिता ११० अध्याय, १ आणि २ वचनात तसेच प्रकटीकरण १२:७-१२ मध्ये दर्शविले आहे. तेथे असे दाखवले आहे की ख्रिस्त त्याच्या दुसऱ्‍या येण्याचा काळ येईपर्यंत, स्वर्गात देवाच्या उजवीकडे बसेल. मग, स्वर्गामधील लढाई प्रथम सैतानाला पृथ्वीवर टाकून देण्यामध्ये, पृथ्वीवर अनर्थ आणण्यामध्ये, परिणामीत होईल आणि मग ख्रिस्त त्याच्या शत्रूंमध्ये साधारण एक पिढी राज्य करील. दुष्टाईचा समूळ नाश, एका “मोठ्या संकटा”द्वारे होईल, त्याचा कळस हर्मगिद्दोनाच्या लढाईपर्यंत जाईल व त्यापाठोपाठ ख्रिस्ताची शांतीची हजार वर्षीय राजवट सुरू होईल.—मत्तय २४:२१, ३३, ३४; प्रकटीकरण १६:१४-१६.

पवित्र शास्त्र म्हणते, “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई-बापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्‍वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्‍तीचे केवळ बाह्‍य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील; त्यांच्यापासून दूर राहा.” (२ तीमथ्य ३:१-५) आता, काहीजण असा वाद करतील की ह्‍या गोष्टी मानवी इतिहासाच्या आधीपासूनच घडल्या आहेत.

तथापि, इतिहासकार आणि विवेचनकार म्हणतात त्याप्रमाणे, पृथ्वीवर १९१४ पासून पुढे अनुभवलेल्या काळासारखा दुसरा काळ नव्हता. पूर्वी कधीही नव्हत्या इतक्या विस्तृतप्रमाणावर पीडा होत्या. शिवाय, शेवटल्या दिवसांच्या ख्रिस्ताच्या चिन्हातील इतर पैलूंबाबत, ह्‍या वास्तविकतांचा विचार करणे आवश्‍यक आहे: ख्रिस्ताच्या उपस्थितीची व राज्याची जगव्याप्त घोषणा इतिहासात अभूतपूर्व प्रमाणात झाली आहे. यहोवाच्या साक्षीदारांचा प्रचारकार्यासाठी जितका छळ झाला तितका कोणाचाही कधी झाला नव्हता. हिटलरच्या छळ छावण्यांमध्ये शेकडो लोकांना देहदंड दिला. ह्‍या दिवसांपर्यंत अनेक राष्ट्रांमध्ये यहोवाच्या साक्षीदारांवर बंदी आहे, व इतर राष्ट्रांमध्ये त्यांना अटक करण्यात येत आहे, कैद केले जात आहे, यातना दिल्या जात आहेत व मारलेही जात आहे. ह्‍या सर्व गोष्टी, येशूने दिलेल्या चिन्हाचा एक भाग आहेत.

प्रकटीकरण ११:१८ मध्ये भाकीत केल्यानुसार, यहोवाच्या विश्‍वासू साक्षीदारांविरूद्ध ‘राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली’ आहेत, व यावरून हे सूचित होते की यहोवाचा “क्रोध” त्या राष्ट्रांविरूद्ध व्यक्‍त केला जाईल. तेच वचन पुढे म्हणते की देव ‘पृथ्वीची नासाडी करणाऱ्‍यांचा नाश करील.’ जीवनाच्या गरजा भागविण्याच्या पृथ्वीच्या क्षमतेला, मानवी इतिहासामध्ये पूर्वी कधीही इतक्या धोक्याचा काळ नव्हता. तथापि, आता परिस्थिती वेगळी आहे! अनेक शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की जर मानव पृथ्वीला असाच दूषित करत राहिला, तर ती निर्जन होईल. परंतु यहोवाने “तिजवर लोकवस्ती व्हावी म्हणून ती घडिली,” व तिची नासाडी होण्याआधीच, दूषित करणाऱ्‍यांचा तो नाश करणार आहे.—यशया ४५:१८.

राज्य वर्चस्वातील पृथ्वीवरील आशीर्वाद

देवाच्या राज्याखाली मनुष्यांनी प्रजा म्हणून पृथ्वीवर राहावे हा विचार अनेक पवित्र शास्त्रावर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांसाठी विलक्षण आहे, कारण ते असा विचार करतात की बचावलेले सर्वजण स्वर्गात जातील. पवित्र शास्त्र दाखवते की, स्वर्गात केवळ मर्यादित संख्येचे लोक जातात, व पृथ्वीवर अनंतकाळपर्यंत राहणाऱ्‍यांचा मोठा लोकसमुदाय अमर्यादित संख्येचा असेल. (प्रकटीकरण १४:१-५; ७:९; स्तोत्रसंहिता ३७:११, २९) पवित्र शास्त्रात दानीएल नावाच्या पुस्तकातील भविष्यवाणीनुसार, ख्रिस्ताद्वारे येणारे ते देवाचे राज्य संपूर्ण पृथ्वीला भरून टाकील व त्याच्यावर राज्य करील.

तेथे, ख्रिस्ताचे राज्य, यहोवाच्या डोंगरासमान सार्वभौमत्वातून आपोआप सुटलेल्या पाषाणाला प्रतिनिधीत करते. तो पाषाण, पृथ्वीवरील शक्‍तीमान राष्ट्रांना चित्रित करणाऱ्‍या पुतळ्यावर आपटतो व त्याचा नाश करतो, आणि मग “त्या पुतळ्यावर आदळलेल्या पाषाणाचा एक मोठा पर्वत होऊन त्याने सर्व पृथ्वी व्यापिली.” ती भविष्यवाणी पुढे म्हणते: “त्या राज्यांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्‍याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यास नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.”—दानीएल २:३४, ३५, ४४.

ह्‍याच राज्याबद्दल तसेच स्वच्छ आणि सुंदर पृथ्वीवरील अनंतकालिक जीवनाच्या शास्त्र आधारित आशेबद्दल यहोवाचे साक्षीदार तुम्हाला सांगू इच्छितात. सध्या जिवंत असलेले लक्षावधी व कबरेत असलेल्या अनेक लक्षावधी जणांना त्यात सदासर्वकाळ जगण्याची संधी प्राप्त होईल. यानंतर, येशू ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीमध्ये, पृथ्वीची निर्मिती व तिच्यावर पहिल्या मानवी दांपत्याला ठेवण्याचा यहोवाचा मूळ उद्देश पूर्ण होईल. हे पृथ्वीवरील नंदनवन कधीही कंटाळवाणे होणार नाही. एदेन बागेमध्ये आदामाला ज्याप्रकारे काम नेमून दिले होते, त्याप्रकारे मानवजातीला पृथ्वीची, वनस्पती जीवनाची आणि प्राण्यांची निगा राखण्याचा आव्हानात्मक प्रकल्प असेल. ते “आपल्या हाताचे काम दीर्घकाल भोगतील.”—यशया ६५:२२, पंडिता रमाबाई भाषांतर; उत्पत्ती २:१५.

“तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो” येशूने आम्हाला शिकवलेल्या या प्रार्थनेचे उत्तर मिळाल्यानंतरची परिस्थिती दाखवण्यासाठी अनेक शास्त्रवचने सादर केली जाऊ शकतात. (मत्तय ६:१०) तथापि, आतासाठी इतकेच पुरे की, “मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी: ‘पाहा! देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्याच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील, ह्‍यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्ट ही नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.’ तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला: ‘पाहा! मी सर्व गोष्टी नवीन करतो.’ तो म्हणाला, ‘लिही, कारण ही वचने विश्‍वसनीय व सत्य आहेत.’”—प्रकटीकरण २१:३-५.

[१५ पानांवरील संक्षिप्त आशय]

“कठीण दिवस येतील,” परंतु “तुमचा मुक्‍तीसमय जवळ आला आहे”