व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ती तुम्हाला सांगण्यासाठी ते वापरत असलेले मार्ग

ती तुम्हाला सांगण्यासाठी ते वापरत असलेले मार्ग

ती तुम्हाला सांगण्यासाठी ते वापरत असलेले मार्ग

ख्रिश्‍चनांना “सर्व राष्ट्रातील लोकास शिष्य” करण्याची आज्ञा दिली असली तरी त्यांनी इतरांवर दबाव आणून किंवा जबरदस्तीने त्यांचे धर्मांतर करावे असा याचा अर्थ होत नाही. येशूने, “दीनांस शुभवृत्त सांगण्या”ची, “भग्न हृदयी जनास पट्टी बांधण्या”ची, “शोकग्रस्तांचे सांत्वन करण्या”ची नेमणूक दिली होती. (मत्तय २८:१९; यशया ६१:१, २; लूक ४:१८, १९) या गोष्टी यहोवाचे साक्षीदार पवित्र शास्त्रातून सुवार्तेची घोषणा करण्याद्वारे करू पाहतात. प्राचीन काळचा संदेष्टा यहेज्केलाप्रमाणे, यहोवाचे साक्षीदार आज, “जी माणसे आपल्यात होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करीत” आहेत अशांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.—यहेज्केल ९:४.

सध्याच्या परिस्थितीमुळे त्रासलेल्या लोकांना शोधून काढण्याचा त्यांचा सर्व परिचित मार्ग म्हणजे, घरोघरी जाणे. येशू ज्याप्रकारे “उपदेश करीत व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गावोगावी फिरत होता,” त्याचप्रकारे लोकांपर्यंत पोंहचण्यासाठी ते सकारात्मक प्रयत्न करतात. येशूच्या आरंभीच्या शिष्यांनीही असेच केले. (लूक ८:१; ९:१-६; १०:१-९) आज, यहोवाचे साक्षीदार शक्य आहे तेथे दर वर्षी प्रत्येक घरी अनेकवेळा जाण्याचा, व घरमालकासोबत काही मिनिटांसाठी कोणत्यातरी आस्थेच्या किंवा काळजी करण्यासारख्या स्थानिक किंवा जागतिक विषयावर चर्चा करण्याचा प्रयत्न करतात. विचार करण्यासाठी एक किंवा दोन शास्त्रवचने दाखवली जातात, आणि घरमालकाने आस्था दाखवली तर, साक्षीदार समयोचित वेळी पुढील चर्चेसाठी योजना करू शकतात. पवित्र शास्त्रांना आणि पवित्र शास्त्राचे स्पष्टीकरण देणाऱ्‍या साहित्याला उपलब्ध केले जाते, व घरमालकाची इच्छा असल्यास विनामूल्य गृह पवित्र शास्त्र अभ्यास चालू केला जातो. संपूर्ण जगात १९९३ मध्ये सरासरीने ४५,००,००० पवित्र शास्त्र अभ्यास नियमितपणे चालवले जात होते.

स्थानिक राज्य सभागृहात होणाऱ्‍या सभांद्वारे “राज्याची सुवार्ता” इतरांना सांगण्याचा हा आणखी एक मार्ग होय. साक्षीदार तेथे दर आठवडी सभा भरवितात. एका सभेत, चालू कुतूहलाच्या विषयावर जाहीर भाषण असते, त्यांनतर वॉचटावर मासिकाचा साहित्य मूळ या नात्याने उपयोग करून काही पवित्र शास्त्रीय विषयावर किंवा भविष्यवाणीवर आधारित अभ्यास असतो. दुसरी सभा, सुवार्तेचे उत्तम उद्‌घोषक होण्यात साक्षीदारांना प्रशिक्षिण देण्यासाठी ही शाळा असते, व त्याच्यानंतर स्थानिक क्षेत्रात साक्षकार्याची चर्चा करण्यासाठी एक भाग नेमून दिलेला असतो. यासोबतच, लहान गटांमध्ये साक्षीदार खाजगी घरांमध्ये आठवड्यातून एकदा पवित्र शास्त्र अभ्यासांसाठी एकत्र येतात.

ह्‍या सर्व सभा जनसामान्यांसाठी खुल्या आहेत. येथे कधीही वर्गणी गोळा केली जात नाही. अशा सभा सर्वांसाठी फायदेकारक आहेत. पवित्र शास्त्र म्हणते: “प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा.” खाजगी व्यक्‍तिगत अभ्यास व संशोधन आवश्‍यक आहे, परंतु एकमेकांबरोबर मिळणे उत्तेजनकारक आहे: “लोखंड लोखंडाला तिखट करते, आणि मनुष्य आपल्या मित्रांचे मुख पाणीदार करतो.”—इब्रीकरास १०:२४, २५; नीतीसूत्रे २७:१७, पंडिता रमाबाई भाषांतर.

साक्षीदारांचा दैनंदिन जीवनात इतर लोकांशी संपर्क येतो तेव्हा ते सुवार्ता सांगण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग करतात. कदाचित शेजाऱ्‍यांसोबत किंवा बसमधील वा विमानात एखाद्या प्रवाशासोबत, एखादा मित्र किंवा नातलगाबरोबर अधिक काळपर्यंत बोलणी, किंवा जेवणाच्या सुटीच्या दरम्यान सहकर्मचाऱ्‍याबरोबर केलेली चर्चा अशारीतीचे ते संभाषण असेल. येशू पृथ्वीवर असताना त्याचे बहुतेक प्रकाराचे साक्षकार्य, समुद्रकिनाऱ्‍यावरून चालत असताना, टेकडीवर बसून, कोणाच्या तरी घरी जेवताना, लग्न समारंभाला उपस्थित असताना, किंवा गालील समुद्रात मासे मारण्याच्या नावेत बसून प्रवास करतानाचे होते. त्याने सभास्थानात आणि यरुशलेमेच्या मंदिरात शिकवले. तो जेथे कोठे होता, तेथे देवाच्या राज्याबद्दल बोलण्यासाठी त्याला संधी प्राप्त झाल्या. यहोवाचे साक्षीदार ह्‍या बाबतीत देखील त्याच्या पावलांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात.—१ पेत्र २:२१.

उदाहरणाद्वारे प्रचार करणे

तुम्हाला सुवार्ता सांगणाऱ्‍याने जर त्या शिकवणी स्वतः लागू केल्या नाहीत, तर सुवार्ता सांगण्याच्या या मार्गांतील एकही मार्ग तुम्हाला अर्थपूर्ण वाटणार नाही. एक गोष्ट बोलणे व दुसरी आचरणे, निव्वळ दांभिकपणा आहे, आणि धार्मिक दांभिकतेने हजारोंना पवित्र शास्त्रापासून दूर नेले आहे. पवित्र शास्त्राला दोष देणे उचित नाही. शास्त्री आणि परुश्‍यांकडे इब्री शास्त्रवचने होती, परंतु येशूने त्यांना ढोंगी म्हणून उघड केले. मोशेच्या नियमातून त्यांच्या वाचनाबद्दल तो बोलला, मग त्याच्या शिष्यांना पुढे म्हणाला: “ते जे काही तुम्हास सांगतील ते सर्व आचरीत व पाळीत जा; परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका.” (मत्तय २३:३) एखाद्या ख्रिश्‍चनाचे योग्य उदाहरण तासन्‌तास प्रवचन झाडण्यापेक्षा अधिक काही बोलते. ज्यांचे पती ख्रिस्ती विश्‍वासात नव्हते अशा ख्रिश्‍चन पत्नींना, हे दर्शवून देण्यात आले होते की: “कोणी वचनाला अमान्य असले तरी, तुमचे भीडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचनावाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतील.”—१ पेत्र ३:१, २.

यास्तव, ख्रिश्‍चन वर्तनात उदाहरणीय राहून इतरांनाही त्याच प्रकारे होण्याचा सल्ला देऊन: यहोवाचे साक्षीदार या मार्गांनी देखील सुवार्तेची शिफारस करण्याचा प्रयत्न करतात. ‘इतरांनी त्यांच्यासोबत जसे वागावे म्हणून त्यांची इच्छा आहे तसेच तेही त्यांच्याशी वागण्याचा’ प्रयत्न करतात. (मत्तय ७:१२) साक्षीदार केवळ बांधव, मित्र, शेजारी किंवा नातलग यांच्यासोबतच नव्हे तर, सर्व लोकांसोबत असे राहण्याचा ते प्रयत्न करतात. अपूर्ण असल्यामुळे, १०० टक्के ते यशस्वी होत नाहीत. परंतु केवळ राज्याची सुवार्ता सांगून नव्हे तर शक्य आहे तेव्हा त्यांना मदतीचा हात देऊन सर्व लोकांचे भले करावे ही त्यांची अंतःकरणापासून इच्छा आहे.—याकोब २:१४-१७.

[२० पानांवरील चित्रं]

व्यवहार्य रचनेत बांधलेली राज्य सभागृहे, पवित्र शास्त्राची चर्चा करण्याची ठिकाणे आहेत

[२१ पानांवरील संक्षिप्त आशय]

शब्दांविना जिंकणे

[२२ पानांवरील चित्रं]

साक्षीदारांच्या स्वतःच्या कौंटुंबिक जीवनात, तसेच इतर लोकांबरोबर संपर्क येतो तेव्हा, इतरांना ज्या गोष्टी करण्याचा सल्ला देतात त्याच गोष्टी ते स्वतः प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतात