तुम्हाला आमचे निमंत्रण
तुम्हाला आमचे निमंत्रण
या माहितीपत्रकातून तुमच्याशी बोलण्यास आम्हाला आनंद वाटला. यहोवाच्या साक्षीदारांविषयी अधिक काही शिकण्यास तुम्हाला आनंद झाला असेल अशी आम्ही अपेक्षा करतो. आमच्या स्थानिक राज्य सभागृहात येऊन आम्हाला भेट द्यावी, या निमंत्रणाचा कृपया स्वीकार करा. आमच्या सभा कशा चालवल्या जातात ते पाहा. ख्रिस्ताच्या राजवटीतील नंदनवनमय पृथ्वीच्या सुवार्तेची सहभागिता इतरांबरोबर करण्याचे आमचे प्रयत्न पाहा.
देवाने त्याचे अभिवचन दिले आहे. “ज्यामध्ये नीतीमत्व वास करते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.” (२ पेत्र ३:१३) एकोणीस शतके निघून गेली आहेत. प्रतीक्षेचा काळ त्याच्या अंता नजिक येत आहे. जागतिक परिस्थिती याचे चिन्ह दाखवते. येशूच्या भविष्यवाणीची पूर्णता जवळ येत आहे: “ह्या गोष्टीस आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा; कारण तुमचा मुक्तीसमय जवळ आला आहे.”—लूक २१:२८.
प्रेषित पौलाने म्हटले, ‘प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन द्या, आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा.’ (इब्रीकरास १०:२४, २५) आमचे तुम्हाला निमंत्रण आहे की, आमच्यासोबत एकत्र मिळण्याद्वारे पौलाचा सल्ला ऐका.