व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ते कोण आहेत?

ते कोण आहेत?

ते कोण आहेत?

यहोवाच्या साक्षीदारांसोबत तुम्ही चांगल्यारितीने परिचित व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. तुम्ही त्यांना कदाचित शेजारी म्हणून किंवा तुमचे सहकर्मचारी म्हणून किंवा जीवनाच्या कोणत्याही दैनंदिन कामात भेटला असाल. रस्त्यावर येणाऱ्‍या जाणाऱ्‍या लोकांना, मासिकांचे वितरण करताना तुम्ही त्यांना पाहिले असेल. किंवा ते तुमच्या दारी आले तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत थोडक्यात बोलला असाल.

खरे पाहता, यहोवाच्या साक्षीदारांना तुमच्याबद्दल व तुमच्या हितासंबंधी आपुलकी आहे. त्यांना तुमचे मित्र होण्याची इच्छा आहे व स्वतःबद्दल, त्यांच्या विश्‍वासाबद्दल, त्यांच्या संघटनेबद्दल, तसेच इतर लोकांविषयी व आम्ही सर्व जण ज्या जगात राहात आहोत त्याबद्दल त्यांना काय वाटते याबाबतीत ते अधिक सांगू इच्छितात. हा उद्देश साध्य करण्यासाठी, त्यांनी हे माहितीपत्रक तुमच्यासाठी तयार केले आहे.

यहोवाचे साक्षीदार बहुतेक सर्व बाबतीत इतरांप्रमाणेच आहेत. त्यांना त्यांच्या आर्थिक, शारीरिक व मानसिक समस्या आहेत. काही वेळा ते चुका देखील करतात कारण ते परिपूर्ण, प्रेरित किंवा अचूक असे नाहीत. परंतु, ते स्वानुभवातून शिकण्याचा प्रयत्न करतात आणि आवश्‍यक तो सुधार करण्यासाठी पवित्र शास्त्राचा परिश्रमपूर्वक अभ्यास करतात. देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्याला समर्पण केले आहे, व समर्पणाच्या पूर्ततेसाठी ते शिकलेल्या गोष्टी स्वतःला लागू करतात. त्यांच्या सर्व कार्यात ते देवाच्या वचनाचे आणि त्याच्या पवित्र आत्म्याचे मागदर्शन मिळवतात.

त्यांचा विश्‍वास कोणत्याही मानवी तर्कावर किंवा धर्मावर आधारित नसून पवित्र शास्त्रावरच आहे हे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. प्रेषित पौलाने स्वतःला प्रेरणेद्वारे ज्याप्रमाणे व्यक्‍त केले त्याप्रमाणे त्यांनाही वाटते की: “देव खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो.” (रोमकर ३:४, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन a) पवित्र शास्त्रीय सत्य म्हणून शिकवल्या जाणाऱ्‍या शिकवणींचा मुद्दा येतो तेव्हा, प्रेषित पौलाने बिरुयातील लोकांना प्रचार केल्यावर त्या लोकांनी जो मार्ग अनुसरला त्याच मार्गाला ते देखील ठामपणे मान्यता देतात: “त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला, आणि ह्‍या गोष्टी अशाच आहेत की काय ह्‍याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत गेले.” (प्रे. कृत्ये १७:११) यहोवाचे साक्षीदार असा विश्‍वास करतात की सर्व धार्मिक शिकवणी शास्त्रवचनांच्या मान्यतेनुसार असल्या पाहिजेत, मग त्या शिकवणी त्यांच्याद्वारे दिल्या जात असोत किंवा कोणा दुसऱ्‍याकडून असोत. त्यांच्यासोबत चर्चा करत असताना असेच करण्यासाठी ते तुम्हाला आमंत्रण देतात, नव्हे आर्जवतात.

ह्‍यावरून हे स्पष्ट आहे की यहोवाचे साक्षीदार, पवित्र शास्त्र देवाचे वचन आहे असा विश्‍वास ठेवतात. त्यातील ६६ पुस्तके प्रेरित आणि ऐतिहासिकरित्या अचूक असल्याचे ते समजतात. सर्वसामान्यपणे ज्याला नवा करार म्हटले जाते त्याला ते ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने म्हणून संबोधतात, आणि जुन्या कराराला ते इब्री शास्त्रवचने असे संबोधतात. ते दोन्ही ग्रीक आणि इब्री शास्त्रवचनांवर विसंबून आहेत व अलंकारिक किंवा लाक्षणिक अभिव्यक्‍ती किंवा दृश्‍यांच्या व्यतिरिक्‍त, इतर सर्व गोष्टींना ते शब्दशः अर्थाने घेतात. पवित्र शास्त्रातील अनेक भविष्यवाण्या पूर्ण झाल्या, इतर पूर्णतेच्या मार्गावर आहेत व आणखी काही पूर्ण व्हावयाच्या आहेत असे ते समजतात.

त्यांचे नाव

यहोवाचे साक्षीदार? होय, याच नावाने ते स्वतःला संबोधतात. हे एक वर्णनात्मक नाव असून, यहोवाची, त्याच्या देवत्वाची व त्याच्या उद्देशांची साक्ष ते बाळगतात असा त्याचा अर्थ होतो. “देव,” “प्रभू,” आणि “निर्माणकर्ता” ह्‍या पदव्या “राष्ट्रपती”, “राजा” आणि “जनरल” यासारख्याच आहेत व अनेक विविध महत्त्वाच्या व्यक्‍तींना त्या लागू होतात. परंतु “यहोवा” हे व्यक्‍तिगत नाव आहे व ते सर्वसमर्थ देवाला आणि विश्‍वाच्या निर्माणकर्त्याला संबोधले आहे. त्याबद्दल पवित्र शास्त्राच्या किंग जेम्स व्हर्शन नुसार स्तोत्रसंहिता ८३:१८ वचनात असे दाखवले आहे की: “ज्या तुझे नाव यहोवा असे आहे, तो तूच, मात्र अवघ्या पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांनी जाणावे.”

यहोवा हे नाव, (किंवा रोमन कॅथोलिक जेरुसलेम बायबल नुसार व काही आधुनिक विद्वानांच्या मते, याव्हे) मूळ इब्री शास्त्रवचनांमध्ये जवळजवळ ७,००० वेळा आले आहे. बहुतेक पवित्र शास्त्र याप्रमाणे दाखवत नाहीत, त्याच्याऐवजी “देव” किंवा “प्रभू” असे वापरतात. तथापि, यहोवा हे नाव मूळ इब्री शास्त्रवचनात कोठे आहे ते एक व्यक्‍ती ह्‍या पवित्र शास्त्रातून देखील दाखवू शकते, कारण त्या ठिकाणी जे शब्द बदली म्हणून वापरले आहेत, तेथे: GOD [देव], LORD [प्रभू] असे, मोठ्या आणि लहान अक्षरांमध्ये लिहिले आहे. अनेक आधुनिक अनुवाद यहोवा किंवा याव्हे ही नावे वापरतात. या कारणास्तव, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनमध्ये यशया ४२:८ हे वचन असे वाचले जाते: “मी यहोवा आहे. हे माझे नाव आहे.”

यहोवाचे साक्षीदार त्यांचे नाव ज्या शास्त्रवचनातून स्वत:ला लावून घेतात, त्या शास्त्रवचनाचा अहवाल यशयाच्या ४३व्या अध्यायात आहे. तेथे जागतिक देखावा हा न्यायालयीन नाटकाच्या रूपात सादर केला आहे: राष्ट्रांच्या दैवतांना धार्मिकतेचा दावा केलेल्या घटनांचा पुरावा देण्यासाठी त्यांचे साक्षीदार पुढे करावयास, किंवा यहोवाच्या बाजूच्या साक्षीदारांचे ऐकण्यासाठी आणि सत्याला मान्य करण्यासाठी आमंत्रित केले जाते. तेथे यहोवा त्याच्या लोकांना अशी घोषणा करतो: “यहोवा म्हणतो, ‘तुम्ही माझे साक्षी आहा, आणि जो माझा सेवक मी निवडला आहे तो साक्षी आहे, अशासाठी की तुम्ही मला ओळखावे; व माझ्यावर विश्‍वास ठेवावा व मीच तो आहे हे तुम्हाला समजावे: माझ्यापूर्वी कोणी देव निर्माण झाला नाही, आणि माझ्यानंतर कोणीही व्हावयाचा नाही. मी, मीच यहोवा आहे, आणि माझ्यावाचून कोणी तारणारा नाही.”—यशया ४३:१०, ११, पंडिता रमाबाई भाषांतर.

यहोवा देवाचे पृथ्वीवर ख्रिस्तापूर्वी हजारो वर्षांपासून साक्षीदार होते. त्यातील काही विश्‍वासू पुरुषांची यादी इब्रीकरास ११ अध्यायात दिल्यावर, इब्रीकरास १२:१ म्हणते: “तर मग, आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहो म्हणून, आपणही सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.” पंतय पिलातासमोर येशू म्हणाला: “मी ह्‍यासाठी जन्मलो आहे, व ह्‍यासाठी जगात आलो आहे की मी, सत्यासाठी साक्ष द्यावी.” त्याला “विश्‍वसनीय व खरा साक्षी” असे म्हटले आहे. (योहान १८:३७; प्रकटीकरण ३:१४) येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले: “पवित्र आत्मा तुम्हांवर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमेत, सर्व यहुदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.”—प्रे. कृत्ये १:८.

या कारणास्तव, आज २३० राष्ट्रांमध्ये, येशू ख्रिस्ताकरवी येणाऱ्‍या यहोवाच्या राज्याची सुवार्ता सांगणारे ४०,००,००० पेक्षा अधिक लोक, स्वतःचा यहोवाचे साक्षीदार असल्याचा उल्लेख उचितपणे करत आहेत असे त्यांना वाटते.

[तळटीपा]

a अन्यता सूचित नसल्यास, ह्‍या माहितीपत्रकातील शास्त्रवचनांचा संदर्भ ह्‍या अनुवादातून आहे.

[३ पानांवरील संक्षिप्त आशय]

त्यांना तुमच्याबद्दल आपुलकी आहे

[३ पानांवरील संक्षिप्त आशय]

देवाची इच्छा करण्यासाठी ते समर्पित आहेत

[४ पानांवरील संक्षिप्त आशय]

पवित्र शास्त्र देवाचे वचन आहे असा ते विश्‍वास बाळगतात

[४ पानांवरील संक्षिप्त आशय]

प्राचीन इब्री भाषेतील देवाचे व्यक्‍तिगत नाव

[१३ पानांवरील संक्षिप्त आशय]

त्या नावाचा सबंध एका न्यायलयीन नाटकासोबत आहे

[५ पानांवरील संक्षिप्त आशय/चित्र]

२३० राष्ट्रांमध्ये ४०,००,००० पेक्षा अधिक साक्षीदार