व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्यांचा आधुनिक विकास व वृद्धी

त्यांचा आधुनिक विकास व वृद्धी

त्यांचा आधुनिक विकास व वृद्धी

यहोवाच्या साक्षीदारांचा आधुनिक इतिहास शंभर पेक्षा काही अधिक वर्षांपूर्वी आकार घेऊ लागला. १८७० रीच्या सुरवातीला, चटकन नजरेस न येणाऱ्‍या पवित्र शास्त्र अभ्यासाच्या गटाची सुरवात पेन्सिल्व्हानिया, अमेरिका, येथील आता पिट्‌सबर्गचा एक भाग असलेल्या ॲलेघेनी शहरात झाली. चार्लस टेझ रस्सल त्या गटाचे मूळ प्रस्तावक होते. जुलै १८७९ मध्ये, झायन्स्‌ वॉचटावर ॲन्ड हेरॉल्ड ऑफ ख्राईस्टस्‌ प्रेझेन्स ह्‍या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. त्या छोट्याशा पवित्र शास्त्र अभ्यासातून, १८८० पर्यंत, जवळपासच्या राज्यांमध्ये अनेक मंडळ्या पसरल्या होत्या. झायन्स्‌ वॉचटावर सोसायटी ही १८८१ मध्ये तयार झाली व १८८४ मध्ये रस्सल त्याचे अध्यक्ष होऊन ती संस्था स्थापण्यात आली. त्या संस्थेचे नाव पुढे, वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटी असे बदलण्यात आले. पुष्कळ लोक घरोघरी प्रचार कार्य करत असताना पवित्र शास्त्र साहित्यांचे वितरण करत होते. पन्‍नास लोक १८८८ मध्ये, पूर्णवेळचे काम करत होते, आता जगव्याप्त सरासरी संख्या ६,२०,००० पेक्षा अधिक आहे.

हे काम १९०९ पर्यंत आंतरराष्ट्रीय बनले होते, व संस्थेचे मुख्य दप्तर, सध्या ब्रुकलिन न्यूयॉर्क येथे असलेल्या ठिकाणी हलविण्यात आले. वृत्तपत्रांना छापील प्रवचने पुरवली जात होती, आणि १९१३ पर्यंत अमेरिका, कॅनडा, आणि युरोपमध्ये ३,००० वृत्तपत्रात चार भाषांमध्ये ती पुरवली जात होती. पुस्तके, पुस्तिका आणि पत्रिकांचे वाटप हजारोंनी केले.

फोटो-ड्रामा ऑफ क्रिएशन वर १९१२ मध्ये काम चालू झाले. स्लाईड्‌स व बोलपटांद्वारे, पृथ्वीच्या सृष्टीपासून, ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राजवटीपर्यंत सर्व काही दाखवण्यात आले. हे कार्यक्रम १९१४ मध्ये सुरू झाले व प्रत्येक दिवशी ३५,००० लोक ते पाहू लागले. बोलपटांमधील हा चित्रपट अग्रेसर होता.

१९१४ हे वर्ष

एक महत्त्वाचा काळ जवळ येत होता. पवित्र शास्त्र विद्यार्थी, चार्ल्स टेझ रस्सल यांनी १८७६ मध्ये “विदेश्‍यांचा काळ: त्यांची समाप्ती कधी होते?” हा लेख ब्रुकलिन न्यूयॉर्क येथे प्रकाशित झालेल्या बायबल एक्झॅमिनर मध्ये सादर केला. ऑक्टोबर अंकाच्या पृष्ठ २७ वर असे म्हटले होते की, “सात काळ इ.स. १९१४ मध्ये समाप्त होतील.” येशूने संबोधलेला विदेश्‍यांचा काळ, ‘परराष्ट्रीयांच्या सद्दीचा’ काळ आहे. (लूक २१:२४) ज्या गोष्टींच्या पूर्णतेची अपेक्षा १९१४ मध्ये केली होती त्या सर्वच गोष्टी घडल्या नाहीत, परंतु त्यांनी विदेश्‍यांच्या काळाच्या समाप्तीला चिन्हित केले व ते वर्ष खास महत्त्वाचे होते. अनेक इतिहासकार आणि टिकाकार कबूल करतात की १९१४ हे वर्ष, मानवी इतिहासाला वळण लावणारे वर्ष होते. पुढील उतारे ते दाखवतात:

“पहिले महायुद्ध चालू होण्याअगोदर इतिहासात १९१३ हे शेवटले वर्ष पूर्णपणे ‘सुरळीत’ होते.”—टाईम्स-हेराल्ड वॉशिंग्टन, डी. सी, मार्च १३, १९४९ मधील अग्रलेख.

“जगातील प्रवृत्तीबद्दल जागृत असणारा प्रत्येकजण १९१४ पासून, विधीलिखित व आगाऊ ठरवलेले वाटणाऱ्‍या मोठ्या संकटाकडे चाल करीत असलेल्या गोष्टींमुळे खूपच त्रस्त झाला आहे. मनापासून कळकळ असणाऱ्‍या अनेक लोकांना वाटते की नाशाकडे ओढणाऱ्‍या गोष्टींना कुठलीही गोष्ट परावृत्त करू शकत नाही.”—बरट्रॅन्ड रस्सल, द न्यूयॉर्क टाईम्स मॅगजीन, सप्टेंबर २७, १९५३.

“पहिल्या महायुद्धाच्या वेळी संपूर्ण जगाचा स्फोट झाला आणि आम्हाला अजूनही त्याचे कारण माहीत नाही. त्याच्या पूर्वी, सुखावस्था दृष्टिपथात आहे असे लोकांना वाटत होते. तेथे शांती आणि समृद्धी होती. मग सगळ्याचाच स्फोट झाला. आणि तेव्हापासून आमची स्थिती दबलेल्या उत्साहासारखी झाली आहे. . . . इतिहासात याच शतकात अधिक लोक ठार झाले आहेत.”—डॉ. वॉकर पर्सी, अमेरिकन मेडिकल न्यूज, नोव्हेंबर २१, १९७७.

“लोकांच्या जीवनातील सुरक्षितता आणि शांती, १९१४ पासून नाहीशी झाली आहे,” असे जर्मन मुत्सद्दी कॉनरड ॲडन्यूर यांनी १९१४ नंतर ५० वर्षांपेक्षा अधिक वर्षांनी असे लिहिले.—द वेस्ट पार्कर, क्लीवलँड, ओहियो, जानेवारी २०, १९६६.

संस्थेचे पहिले अध्यक्ष, सी. टी रस्सल १९१६ मध्ये मरण पावले व पुढील वर्षी जोसफ एफ. रदरफोर्ड हे अध्यक्षपदी आले. तेव्हा अनेक बदल झाले. द वॉचटावरच्या सोबतच्या गोल्डन एज नावाच्या मासिकाची सुरवात करण्यात आली. (आता त्याला अवेक! म्हणण्यात येते, ज्याचे ६० पेक्षा अधिक भाषांमध्ये, १,२०,००,००० प्रतींचे वितरण होत आहे.) दारोदार साक्षकार्यावर अधिक जोर दिला गेला. ख्रिस्ती धर्मजगताच्या पंथांपासून भिन्‍न आहोत हे दाखवण्यासाठी ह्‍या ख्रिश्‍चनांनी १९३१ मध्ये यहोवाचे साक्षीदार हे नाव स्वीकारले. हे नाव यशया ४३:१०-१२ वर आधारित आहे.

आकाशवाणीचा वापर १९२० आणि १९३० मध्ये मोठ्या प्रमाणात केला गेला. पवित्र शास्त्र व्याख्याने देण्यासाठी १९३३ पर्यंत, संस्था ४०३ आकाशवाणी केंद्रांचा उपयोग करत होती. नंतर, सहज उचलून नेता येण्याजोगा ग्रामोफोन आणि रेकॉर्ड केलेली पवित्र शास्त्र भाषणे घेऊन जाणाऱ्‍या साक्षीदारांच्या घरोघरच्या भेटींनी, मोठ्या प्रमाणात आकाशवाणीची जागा घेतली. जेथे आस्था दाखवली जाई तेथे गृह पवित्र शास्त्राभ्यास चालू करण्यात येत होते.

न्यायालयीन विजय

हे काम केल्यामुळे, १९३० आणि १९४० च्या दरम्यान अनेक साक्षीदारांना अटक करण्यात आली व बोलण्यासाठी, नियतकालिके छापण्यासाठी, संमेलनासाठी, व भक्‍तीसाठी स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने अनेक न्यायलयीन खटले लढविले गेले. अमेरिकेत, कनिष्ठ न्यायालयातील अपिलांच्या परिणामांमुळे अमेरिकेच्या सर्वश्रेष्ठ न्यायालयासमोर साक्षीदारांनी ४३ खटले जिंकले. त्याचरितीने, इतर राष्ट्रांमध्ये उच्च न्यायालयातून अनुकूल न्याय प्राप्त करण्यात आले. ह्‍या न्यायालयीन विजयासंबंधी, प्रोफेसर सी. एस. ब्रॅडन यांनी त्यांच्या, तेही विश्‍वास करतात (इंग्रजी) या पुस्तकात साक्षीदारांबद्दल असे म्हटले: “त्यांचा नागरिकत्वाचा हक्क सांभाळून ठेवण्यासाठी त्यांच्या लढतीद्वारे, लोकसत्तेला उल्लेखनीय सेवा केली आहे, कारण त्यांच्या या झगड्यात, अमेरिकेतील प्रत्येक लहान गटांच्या हक्कांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी पुष्कळ काही केले आहे.”

खास प्रशिक्षणाचे कार्यक्रम

जे. एफ रदरफोर्ड १९४२ साली मरण पावले व त्यांच्यानंतर एन. एच नॉर यांनी अध्यक्षपद घेतले. प्रशिक्षणाचा एकत्रित कार्यक्रम चालू झाला. वॉचटावर बायबल स्कूल ऑफ गिल्यड ह्‍या नावाची एक खास प्रशिक्षण प्रशाळा मिशनऱ्‍यांकरता १९४३ मध्ये स्थापना करण्यात आली. त्यावेळेपासून पुढे, ह्‍या शाळेतील पदवीधरांना पृथ्वीवरील १४० राष्ट्रांमध्ये पाठविण्यात आले आहे. ज्या राष्ट्रांमध्ये मंडळ्या मुळीच नव्हत्या तेथे नवनवीन मंडळ्या निर्माण झाल्या, आणि आंतरराष्ट्रीयरित्या स्थापिलेल्या शाखांची संख्या आता १०० इतकी आहे. वेळोवेळी, मंडळीतील वडिलांना, शाखांमध्ये काम करणाऱ्‍या स्वयंसेवकांना व साक्षकार्यात भाग घेणाऱ्‍या पूर्णवेळच्या सेवकांना (पायनियरांना) प्रशिक्षण देण्यासाठी खास अभ्यासक्रमाची स्थापना करण्यात आली.

एन. एच नॉर १९७७ मध्ये मरण पावले. त्यांच्या मृत्यू पूर्वी, ब्रुकलिन येथील जागतिक मुख्यालयात नियमन मंडळांचा विस्तार हा, संघटनेचा शेवटला बदल होता ज्यामध्ये त्यांची सहभागिता होती. कारभारविषयक जबाबदाऱ्‍या १९७६ मध्ये विभाजित केल्या गेल्या व नियमन मंडळाच्या सदस्यांनी मिळून बनलेल्या विविध समितींना नेमून दिल्या गेल्या. त्यातील प्रत्येक ११ सदस्य (१९९३ मध्ये) ५० किंवा त्याहीपेक्षा अधिक वर्षांपासून साक्षकार्यात त्यांचा पूर्ण वेळ खर्च करत आले आहेत.

छापण्याच्या तरतूदींमध्ये वाढ होते

यहोवाच्या साक्षीदारांचा आधुनिक दिवसातील इतिहास, नाट्यपूर्ण घटनांनी भरला आहे. मागे १८७० मधील पेन्सिल्व्हानिया येथील एका लहानशा पवित्र शास्त्र अभ्यासापासून, संपूर्ण जगभरात १९९३ या वर्षापर्यंत साक्षीदारांच्या ७३,००० पेक्षा अधिक मंडळ्या वाढल्या आहेत. पहिल्यांदा, सर्व साहित्य व्यापारी छापखान्यात छापले जात होते; मग, १९२० मध्ये, साक्षीदारांकरवी काही साहित्य भाड्याच्या कारखान्याच्या इमारतीत उत्पादित करण्यात आले. परंतु १९२७ पासून पुढे, पुष्कळ साहित्य, वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्कच्या, मालकीचे असलेल्या ब्रुकलिन न्यूयॉर्क येथील आठ मजल्यांच्या कारखान्यात उत्पादन तयार होऊ लागले. हेच आता सात कारखान्याच्या इमारतींमध्ये व एका मोठ्या कार्यालयात विस्तारित झाले आहे. प्रकाशनाच्या तरतूदींना चालवण्यासाठी ३,००० आवश्‍यक कामगारांच्या राहण्याची सोय, ब्रुकलिनजवळील काही इमारतींमध्ये करण्यात आली आहे. आणखी शेकडो पॅटर्सन, न्यूयार्क येथे शैक्षणिक तरतूदींमध्ये काम करत आहेत. यासोबतच, न्यूयॉर्क, वॉलकिलजवळ शेती आणि कारखाना या दोन्ही गोष्टी हजार कामगार चालवतात. तेथे वॉचटावरअवेक! छापले जातात आणि या हजारो स्वयंसेवकांसाठी अन्‍न उत्पादित करते. प्रत्येक स्वयंसेवकाला व्यक्‍तिगत खर्चासाठी मर्यादित मोबदला मिळतो.

आंतरराष्ट्रीय अधिवेशने

शिकागो, इलिनॉईस, अमेरिका येथे, १८९३ मध्ये पहिले मोठे अधिवेशन झाले होते. तेथे ३६० जण उपस्थित होते व ७० नव्या लोकांनी बाप्तिस्मा घेतला होता. शेवटले एकच मोठे आंतरराष्ट्रीय अधिवेशन न्यूयॉर्क शहरात १९५८ मध्ये झाले. यांकी स्टेडीयम आणि तेव्हा अस्तित्वात असलेले पोलो ग्राऊन्डस्‌ या दोघांचा उपयोग करण्यात आला होता. तेथील उपस्थितीचे शिखर २,५३,९२२ होते; बाप्तिस्मा घेतलेल्या नव्या जणांची संख्या ७,१३६ होती. तेव्हा पासून अनेक राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय अधिवेशने, संमेलनाच्या श्रृंखलेप्रमाणे होत आले आहेत. आता आंतरराष्ट्रीय अधिवेशनांच्या श्रृंखलेत १०० पेक्षा अधिक राष्ट्रांमध्ये १,५०० पेक्षा अधिक अधिवेशनांचा समावेश आहे.

[६ पानांवरील संक्षिप्त आशय/चित्र]

“द वॉचटावर,” एका भाषेतील ६,००० प्रतींपासून ११५ पेक्षा अधिक भाषांमध्ये १,६०,००,००० पेक्षा अधिक प्रती

[६ पानांवरील संक्षिप्त आशय]

पूर्वीचे बोलपट

[७ पानांवरील संक्षिप्त आशय]

मानवी इतिहासाला वळण लावणारा केंद्रबिंदू

[८ पानांवरील संक्षिप्त आशय]

मुक्‍त नागरिकांसाठी उल्लेखनीय सेवा

[१० पानांवरील चित्रं]

वॉलकिल, न्यूयॉर्क व

. . .  ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथील छापखाने