व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्यांचा काय विश्‍वास आहे?

त्यांचा काय विश्‍वास आहे?

त्यांचा काय विश्‍वास आहे?

सर्वसमर्थ देव यहोवा, जो स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माणकर्ता आहे त्याच्यावर यहोवाचे साक्षीदार विश्‍वास ठेवतात. आमच्या सभोवतालच्या विश्‍वामध्ये गुंतागुंतीने रचलेल्या आश्‍चर्याच्या गोष्टींचे अस्तित्वच तर्कशुद्धतेत हे दर्शविते की, एका सर्वश्रेष्ठ बुद्धिमान व शक्‍तीमान सृष्टीकर्त्याने हे सर्व निर्माण केले. ज्याप्रमाणे पुरूष आणि स्त्रियांचे कार्य त्यांचे गुण प्रतिबिंबित करतात, त्याचप्रमाणे ही वरील कामे, यहोवा देवाला प्रतिबिंबित करतात. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की, “सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्‍य गोष्टी . . . निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत.” शिवाय, आवाज किंवा शब्दांविना, “आकाश देवाची महिमा वर्णिते.”—रोमकरास १:२०; स्तोत्रसंहिता १९:१-४.

लोक, मातीची भांडी, किंवा दूरदर्शन संच व संगणक उद्देशाविना बनवत नाहीत. पृथ्वी आणि तिच्यावरील वनस्पती तसेच प्राणी जीवनाची सृष्टी त्याहीपेक्षा अधिक आर्श्‍चकारक आहेत. दशलक्षापेक्षा अधिक पेशी असलेल्या आमच्या मानवी शरीराची घडण आमच्या समज होण्यापलिकडे आहे—आम्ही ज्याद्वारे विचार करू शकतो तो मेंदू देखील गहन चमत्काराचा आहे! जर मनुष्यांना सापेक्षत: क्षुद्र असलेले शोध लावण्याचा एक उद्देश आहे तर निश्‍चितच यहोवा देवाचाही त्याच्या या भयजनक सृष्टीमध्ये काही तरी उद्देश होता! तो जे करतो त्याबद्दल नीतीसूत्रे १६:४ म्हणते: “परमेश्‍वराने [यहोवा, न्यूव.] सर्व काही विशेष उद्देशाने निर्माण केले आहे.”

यहोवाने ही पृथ्वी एका उद्देशास्तव बनवली, ज्याच्याबद्दल त्याने पहिल्या मानवी दांपत्याला म्हटले: “फलद्रुप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका . . . समुद्रतील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा.” (उत्पत्ती १:२८) हे दांपत्य अवज्ञाकारी बनल्यामुळे, पृथ्वीची आणि तिच्यावरील वनस्पती व प्राण्यांची काळजी घेणाऱ्‍या धार्मिक कुटुंबाने तिला भरविण्यात ते अपयशी ठरले. परंतु हे अपयश यहोवाचा उद्देश अयशस्वी ठरवत नाही. हजारो वर्षांनंतर असे लिहिले होते: “पृथ्वीचा घडणारा व कर्ता तोच (देव) . . . त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्‍न केली नाही.” त्याने “तिजवर लोकवस्ती व्हावी म्हणून घडिली.” तिचा नाश केला जाणार नाही, परंतु “पृथ्वी सर्वकाळ टिकते.” (यशया ४५:१८; उपदेशक १:४, पंडिता रमाबाई भाषांतर) यहोवाचा पृथ्वीसाठी असलेला उद्देश पूर्ण होईल: “माझा संकल्प सिद्धिस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन.”—यशया ४६:१०.

यास्तव, यहोवाचे साक्षीदार हा विश्‍वास बाळगतात की पृथ्वी सर्वकाळ राहील व लायक असणारे सर्व जीवीत आणि मृत लोक यहोवाच्या उद्देशानुरूप असलेल्या सुंदर व निवासीत पृथ्वीवर सदासर्वकाळ वास करतील. सर्व मानवजातीला आदाम आणि हव्वेकडून वारसाने पाप मिळाल्यामुळे सर्व पापी आहेत. (रोमकरास ५:१२) पवित्र शास्त्र आम्हाला सांगते: “पापाचे वेतन मरण आहे.” “आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतास तर काहीच कळत नाही.” “जो जिवात्मा पाप करतो—तो मरेल.” (रोमकरास ६:२३; उपदेशक ९:५; यहेज्केल १८:४, २०) तर मग पृथ्वीवरील आशीर्वादांच्या सहभागितेसाठी ते पुन्हा कसे जगू शकतील? केवळ येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाद्वारे, कारण तो म्हणाला: “पुनरूत्थान व जीवन मीच आहे; जो माझ्यावर विश्‍वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल.” “कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील व बाहेर येतील.”—योहान ११:२५; ५:२८, २९; मत्तय २०:२८.

हे कसे होऊ शकेल? येशू पृथ्वीवर असताना ज्या “राज्याच्या सुवार्तेचा” प्रचार त्याने चालू केला त्यामध्ये याचे स्पष्टीकरण दिले आहे. (मत्तय ४:१७-२३) परंतु यहोवाचे साक्षीदार आज सुवार्तेचा प्रचार अगदी खास मार्गाने करत आहेत.

[१३ पानांवरील तक्‍ता]

यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्‍वास आहे

विश्‍वास शास्त्रवचनीय कारण

पवित्र शास्त्र देवाचे वचन व सत्य आहे २ तीम. ३:१६, १७; २ पेत्र १:२०, २१; योहान १७:१७

पवित्र शास्त्र सांप्रदायांपेक्षा अधिक विश्‍वसनीय आहे मत्त. १५:३; कल. २:८

देवाचे नाव यहोवा आहे स्तोत्र. ८३:१८; यश. २६:४; ४२:८, AS; निर्ग. ६:३

ख्रिस्त हा देवाचा पुत्र व त्याच्या पेक्षा कमी दर्जाचा आहे मत्त. ३:१७; योहान ८:४२; १४:२८; २०:१७; १ करिंथ. ११:३; १५:२८

देवाच्या उत्पत्तीत ख्रिस्त ज्येष्ठ आहे कलस्सै १:१५; प्रकटी. ३:१४

ख्रिस्त क्रुसावर नव्हे तर वधस्तंभावर मरण पावला गलती. ३:१३; प्रे. कृत्ये ५:३०

ख्रिस्ताचे मानवी जीवन आज्ञाधारक मानवांसाठी खंडणी बलिदान म्हणून देण्यात आले मत्त. २०:२८; १ तीम. २:५, ६; तीत २:१४; १ पेत्र २:२४

ख्रिस्ताचे एकदाचे बलिदान पुरेसे होते रोम. ६:१०; इब्री. ९:२५-२८

ख्रिस्ताला मृतांमधून एक अमर आत्मिक व्यक्‍ती असे उठविण्यात आले १ पेत्र ३:१८; रोम. ६:९; प्रकटी. १:१७, १८

ख्रिस्ताची उपस्थिती आत्मिक आहे योहा. १४:१९; मत्त. २४:३; २ करिंथ. ५:१६; स्तोत्र ११०:१, २

ख्रिस्ताचे वर्चस्व असलेले राज्य, पृथ्वीवर धार्मिकतेत व शांतीत शासन करील यश. ९:६, ७; ११:१-५; दानी. ७:१३, १४; मत्त. ६:१०

राज्य, पृथ्वीवर उत्कृष्ट जीवनाची परिस्थिती आणील स्तोत्र. ७२:१-४; प्रकटी. ७:९, १०, १३-१७; २१:३, ४

पृथ्वीचा कधीही नाश केला जाणार नाही किंवा ती निर्जन होणार नाही. उप. १:४; यश. ४५:१८; स्तोत्र. ७८:६९

हर्मगिद्दोनमध्ये देव सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश करील प्रकटी. १६:१४, १६; सफ. ३:८; दानी. २:४४; यश. ३४:२

दुष्टांचा सर्वकाळासाठी नाश केला जाईल मत्त. २५:४१-४६; २ थेस्स. १:६-९

देवाने स्वीकृती दाखवलेले लोक अनंत जीवन प्राप्त करतील योहान. ३:१६; १०:२७, २८; १७:३; मार्क १०:२९, ३०

जीवनाकडे जाणारा एकच मार्ग आहे मत्त. ७:१३, १४; इफि. ४:४, ५

आम्ही आता ‘शेवटल्या दिवसात’ आहोत मत्त. २४:३-१४; २ तीम. ३:१-५; लूक १७:२६-३०

आदामाचे पाप मानवी मरणाला कारणीभूत आहे रोम. ५:१२; ६:२३

मानवी आत्मा मरणानंतर अस्तित्वात राहात नाही यहे. १८:४; उप. ९:१०; स्तोत्र ६:५; १४६:४; योहान ११:११-१४

नरक मानवजातीची सर्वसाधारण कबर आहे ईयो. १४:१३, Dy; प्रकटी. २०:१३, १४, AV (समास)

मृतांसाठी पुनरूत्थानाची आशा आहे १ करिंथ १५:२०-२२; योहान ५:२८, २९; ११:२५, २६

आदामाकडून आलेल्या मरणाचा शेवट होईल १ करिंथ १५:२६; प्रकटी. २१:४; यश. २५:८; १ करिंथ. १५:५४

केवळ १,४४,००० जणांचा लहान कळप, स्वर्गात जाऊन ख्रिस्ताबरोबर राज्य करतो लूक १२:३२; प्रकटी. १४:१, ३; १ करिंथ १५:४०-५३; प्रकटी. ५:९, १०

देवाचे आत्मिक पुत्र म्हणून १,४४,००० नव्याने जन्मलेले आहेत १ पेत्र १:२३; योहान ३:३; प्रकटी. ७:३, ४

आध्यात्मिक इस्त्राएलांबरोबर नवा करार करण्यात आला आहे. यिर्म. ३१:३१; इब्री. ८:१०-१३

ख्रिस्ताची मंडळी ही त्याच्या स्वतःवर बांधलेली आहे इफि. २:२०; यश. २८:१६; मत्त. २१:४२

ख्रिस्ताद्वारे यहोवालाच प्रार्थना केली पाहिजे योहान १४:६, १३, १४; १ तीम. २:५

भक्‍तीमध्ये मूर्त्यांचा उपयोग करू नये निर्ग. २०:४, ५; लेवी. २६:१; १ करिंथ. १०:१४; स्तोत्र. ११५:४-८

भुताटकीपासून दूर राहिले पाहिजे अनु. १८:१०-१२; गलती. ५:१९-२१; लेवी. १९:३१

सैतान जगाचा अदृश्‍य अधिपती आहे १ योहान ५:१९; २ करिंथ ४:४; योहान १२:३१

ख्रिश्‍चनाचा संमीश्र विश्‍वासाच्या हालचालीत कोणताच भाग असू नये २ करिंथ. ६:१४-१७; ११:१३-१५; गलती. ५:९; अनु. ७:१-५

ख्रिश्‍चनाने स्वतःला जगापासून वेगळे ठेवावे याको. ४:४; १ योहान २:१५; योहान १५:१९; १७:१६

देवाच्या नियमांच्या विरोधात नसणाऱ्‍या सर्व मानवी नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे मत्त. २२:२०, २१; १ पेत्र २:१२; ४:१५

तोंडावाटे किंवा नसांतून शरीरात रक्‍त घेतल्याने देवाच्या नियमांचा भंग होतो उत्प. ९:३, ४; लेवी. १७:१४; प्रे. कृत्ये १५:२८, २९

पवित्र शास्त्राच्या नैतिकतेच्या नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे १ करिंथ. ६:९, १०; इब्री. १३:४; १ तीम. ३:२; नीती. ५:१-२३

शब्बाथाचे पालन केवळ यहुद्यांकरताच होते व मोशेच्या नियमासोबतच त्याचा अंत झाला अनु. ५:१५; निर्ग. ३१:१३; रोम. १०:४; गलती. ४:९, १०; कलस्सै. २:१६, १७

पाळक वर्ग व खास पदव्या अनुचित आहेत मत्त. २३:८-१२; २०:२५-२७; ईयो. ३२:२१, २२

मनुष्याची उत्क्रांती नव्हे तर निर्मिती केली गेली यश. ४५:१२; उत्प. १:२७

देवाची सेवा करताना, ख्रिस्ताने घालून दिलेल्या उदाहरणाचे अनुकरण केले पाहिजे १ पेत्र. २:२१; इब्री. १०:७; योहान ४:३४; ६:३८

पूर्णपणे बुडवून घेतलेला बाप्तिस्मा समर्पणाचे प्रतीक आहे मार्क १:९, १०; योहान ३:२३; प्रे. कृत्ये १९:४, ५

ख्रिश्‍चनांनी शास्त्रवचनीय सत्याची जाहीरीत्या साक्ष दिली पाहिजे रोम. १०:१०; इब्री. १३:१५; यश. ४३:१०-१२

[१२ पानांवरील चित्रं]

पृथ्वी . . . यहोवाने निर्मिलेली मानवाने काळजी घेण्यासाठी . . . अनंतकालच्या लोकवस्तीसाठी बनवलेली

[चित्र का श्रेय]

NASA photo