त्यांची जगव्याप्त संघटना व कार्य
त्यांची जगव्याप्त संघटना व कार्य
हे काम जेथे केले जात आहे त्या २०० पेक्षा अधिक राष्ट्रांमध्ये साक्षकार्याच्या कामाला मार्गदर्शित करण्यासाठी अनेक दुवे आहेत. सर्व मार्गदर्शन ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथील जागतिक कार्यालयातील नियमन मंडळाकडून येते. नियमन मंडळ प्रत्येक वर्षी १५ पेक्षा अधिक प्रतिनिधींना प्रत्येक टापूंमधील शाखा प्रतिनिधींसोबत विचार विनिमय करण्यासाठी जगव्याप्त “टापूंमध्ये” पाठवतात. शाखा दप्तरांमध्ये, तीन ते सात सदस्यांची मिळून बनलेली एक शाखा समिती असते जी त्यांच्या अधिकारक्षेत्राखाली असलेल्या राष्ट्रांतील कामावर नेतृत्व करते. अनेक शाखांमध्ये, छापण्याच्या सोयी आहेत ज्यात वेगवान छपाई यंत्रे देखील आहेत. प्रत्येक शाखेखाली आलेली राष्ट्रे किंवा क्षेत्र यांची जिल्ह्यात, आणि जिल्ह्यांचे विभागात विभाजन केले जाते. प्रत्येक विभागात जवळजवळ २० मंडळ्या असतात. जिल्हा पर्यवेक्षक त्यांच्या जिल्ह्यांतील सर्व विभागांना आळीपाळीने भेट देतात. प्रत्येक विभागासाठी दर वर्षी दोन संमेलने होतात. एक विभागीय पर्यवेक्षक देखील असतात, आणि ते त्यांच्या विभागात असलेल्या प्रत्येक मंडळ्यांना बहुतेककरून वर्षातून दोन वेळा, त्या मंडळीला प्रचार कार्यासाठी जे क्षेत्र नेमून दिले आहे तेथे प्रचार कार्य आणि त्याची व्यवस्था पाहण्यासाठी साक्षीदारांना मदत करण्यासाठी भेटी देतात.
स्थानिक मंडळी व त्यासोबत राज्य सभागृह, तुमच्या समाजात सुवार्ता सांगण्याचे केंद्र आहे. प्रत्येक मंडळीला नियुक्त केलेल्या क्षेत्रांचा लहान क्षेत्रांमध्ये नकाशा काढला जातो. प्रत्येक घरातील लोकांना भेट देऊन बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तिगत साक्षीदारांना ते क्षेत्र नेमून दिले जाते. प्रत्येक मंडळीमध्ये, २०० किंवा त्यापेक्षा कमी साक्षीदार असतात, व विविध जबाबदाऱ्यांची देखरेख करण्यासाठी वडील असतात. यहोवाच्या साक्षीदारांच्या संघटनेमध्ये सुवार्तेची घोषणा करणारा व्यक्तिगत उद्घोषक महत्त्वपूर्ण आहे. देवाच्या राज्याची सुवार्ता व्यक्तिगतपणे सांगण्याचे हे क्षेत्र कार्य, जागतिक कार्यालयात, शाखा दप्तरांत, किंवा मंडळीत काम करणारा असो, साक्षीदारांतील प्रत्येक जण करतो.
ह्या कार्यांचा अहवाल शेवटी, जागतिक कार्यालयात पाठवला जातो, आणि मग एक वार्षिक अहवाल संग्रहित करून प्रकाशित केला जातो. यासोबतच, प्रत्येक वर्षी द वॉचटावरच्या जानेवारी १ च्या अंकात एक अहवाल प्रकाशित केला जातो. यहोवा आणि येशू ख्रिस्ताद्वारे येणाऱ्या राज्याबद्दलची साक्ष देण्यासाठी साध्य केलेल्या गोष्टींचा प्रत्येक वर्षाचा सविस्तर अहवाल ही दोन प्रकाशने सादर करतात. येशूच्या मृत्युच्या वार्षिक स्मरणोत्सवाला १९९३ ह्या सेवा वर्षात, १,१८,६५,७६५ साक्षीदार आणि आस्थेवाईक लोक उपस्थित असल्याचा अहवाल १९९४ चा वार्षिक अहवाल देतो. यहोवाच्या साक्षीदारांनी, १९९३ ह्या वर्षी सुवार्तेची घोषणा करण्यात १,०५,७०,००,००० तास खर्च केले व २,९६,००४ नव्या जणांनी बाप्तिस्मा घेतला. एकूण करोडो प्रतींच्या साहित्यांचे वितरण करण्यात आले होते.