आमोस १:१-१५
१ आमोस* याला दृष्टान्ताद्वारे मिळालेला हा संदेश आहे. आमोस तकोवाच्या+ मेंढपाळांपैकी एक होता. त्याला भूकंपाच्या दोन वर्षांपूर्वी,+ यहूदाचा राजा उज्जीया+ आणि इस्राएलचा राजा, म्हणजे योवाशचा+ मुलगा यराबाम+ यांच्या शासनकाळात, इस्राएलबद्दल हा दृष्टान्त झाला.
२ आमोस म्हणाला:
“यहोवा* सीयोनमधून गरजेल,आणि यरुशलेममधून घोषणा करेल.
मेंढपाळांची कुरणं शोक करतील,आणि कर्मेलच्या शिखरावरची हिरवळ सुकेल.”+
३ “यहोवा म्हणतो,‘“दिमिष्कने तीन नाही, तर चार वेळा बंड* केलं; म्हणून मी माझा निर्णय बदलणार नाही,कारण त्यांनी गिलादला मळणीच्या यंत्रांनी मळलं.+
४ म्हणून मी हजाएलच्या+ घरावर आग पाठवीन,आणि ती बेन-हदादचे बुरूज भस्म करेल.+
५ मी दिमिष्कचे अडसर तोडून टाकीन;+मी बिकथ-आवेनच्या रहिवाशांचा,आणि बेथ-एदनवरून शासन करणाऱ्याचा* नाश करीन;आणि अरामचे लोक बंदिवान म्हणून कीर इथे जातील,”+ असं यहोवा म्हणतो.’
६ यहोवा म्हणतो,‘“गाझाने तीन नाही, तर चार वेळा बंड केलं;+ म्हणून मी माझा निर्णय बदलणार नाही,कारण त्यांनी सगळ्या लोकांना बंदिवान बनवून+ अदोमच्या हाती दिलं.
७ म्हणून मी गाझाच्या भिंतीवर आग पाठवीन,+आणि ती तिचे बुरूज भस्म करेल.
८ मी अश्दोदच्या रहिवाशांचा,आणि अष्कलोनवरून शासन करणाऱ्याचा* नाश करीन;+मी एक्रोनविरुद्ध माझा हात उगारीन+आणि उरलेल्या पलिष्टी लोकांचा नाश होईल,”+ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.’
९ यहोवा म्हणतो,‘सोरने तीन नाही, तर चार वेळा बंड केलं;+ म्हणून मी माझा निर्णय बदलणार नाही,कारण त्यांनी सगळ्या बंदिवानांना अदोमच्या हाती दिलं,आणि ते भावांचा करार विसरले.+
१० म्हणून मी सोरच्या भिंतीवर आग पाठवीन,आणि ती तिचे बुरूज भस्म करेल.’+
११ यहोवा म्हणतो,‘अदोमने तीन नाही, तर चार वेळा बंड केलं;+ म्हणून मी माझा निर्णय बदलणार नाही,कारण त्याने तलवार घेऊन आपल्याच भावाचा पाठलाग केला,+आणि त्याने दया दाखवायला नकार दिला;तो आपल्या रागाच्या भरात त्यांना सतत फाडून खातो,आणि त्यांच्यावर कायम संतापलेला असतो.+
१२ म्हणून मी तेमानवर आग पाठवीन,+आणि ती बस्राचे बुरूज भस्म करेल.’+
१३ यहोवा म्हणतो,‘“अम्मोनी लोकांनी तीन नाही, तर चार वेळा बंड केलं;+ म्हणून मी माझा निर्णय बदलणार नाही,कारण त्यांनी आपल्या देशाच्या सीमा वाढवण्यासाठी+ गिलादच्या गर्भवती स्त्रियांना चिरून टाकलं.
१४ म्हणून मी राब्बाच्या भिंतीवर आग पाठवीन,+आणि ती तिचे बुरूज भस्म करेल,युद्धाच्या दिवशी लढाईची घोषणा ऐकू येईल,वादळी वाऱ्याच्या दिवशी तुफान येईल.
१५ आणि त्यांच्या राजाला आणि त्याच्या अधिकाऱ्यांना* बंदिवान म्हणून नेलं जाईल,”+ असं यहोवा म्हणतो.’
तळटीपा
^ म्हणजे, “ओझं असणं” किंवा “ओझं वाहून नेणं.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “अपराध.”
^ शब्दशः “ज्याच्या हातात राजदंड आहे.”
^ शब्दशः “ज्याच्या हातात राजदंड आहे.”
^ किंवा कदाचित, “राजकुमार.”