आमोस ३:१-१५

  • देवाच्या न्यायदंडाची घोषणा (१-८)

    • देव आपल्या मनातली गोष्ट सांगतो ()

  • शोमरोनविरुद्ध संदेश (९-१५)

 “हे इस्राएली लोकांनो, यहोवाने तुमच्याविषयी, म्हणजे त्याने इजिप्त देशातून बाहेर आणलेल्या सबंध घराण्याविषयी सांगितलेला हा संदेश ऐका:  २  ‘पृथ्वीवरच्या सर्व घराण्यांपैकी मी फक्‍त तुमच्याच घराण्याला ओळखतो.+ म्हणूनच तुमच्या सर्व अपराधांबद्दल मी तुमच्याकडून हिशोब घेईन.+  ३  जर दोन जणांनी भेटायचंच ठरवलं नसेल, तर ते सोबत चालू शकतील का?  ४  जंगलात शिकार नसेल, तर सिंह गर्जना करेल का? तरुण सिंहाने* काही पकडलं नसेल, तर तो गुहेतून गुरगुरेल का?  ५  जर जमिनीवर सापळाच लावला नसेल,* तर पक्षी त्यात अडकेल का? सापळ्यात काही अडकलं नाही, तर तो सापळा जमिनीवरून वर उडेल का?  ६  शहरात शिंग फुंकलं गेलं, तर लोक थरथर कापत नाहीत का? शहरावर विपत्ती आली, तर ती यहोवानेच आणलेली नाही का?  ७  कारण सर्वोच्च प्रभू यहोवा आपल्या मनातली गोष्ट*आपल्या सेवकांना, म्हणजे संदेष्ट्यांना सांगितल्याशिवाय, काहीही करणार नाही.+  ८  सिंह गरजला आहे!+ मग कोण घाबरणार नाही? सर्वोच्च प्रभू यहोवा बोलला आहे! मग कोण भविष्यवाणी करणार नाही?’+  ९  ‘अश्‍दोदच्या बुरुजांवरून घोषणा कराआणि इजिप्तच्या बुरुजांवरून जाहीर करा. असं म्हणा: “शोमरोनच्या पर्वतांविरुद्ध एकत्र या;+शहरात माजलेला गोंधळआणि तिथे चाललेली फसवणूक पाहा.+ १०  कारण योग्य ते कसं करायचं हे त्यांना माहीत नाही,” असं यहोवा म्हणतो,“ते आपल्या बुरुजांमध्ये हिंसाचार आणि विनाश साठवत आहेत.”’ ११  म्हणून सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो,‘देशाला एक शत्रू घेरेल,+तो तुमची शक्‍ती हिरावून घेईलआणि तुमचे बुरूज लुटले जातील.’+ १२  यहोवा म्हणतो,‘मेंढपाळ जसा सिंहाच्या जबड्यातून फक्‍त दोन पाय आणि कानाचा तुकडा खेचून घेतो,तसंच, जे आज शोमरोनमध्ये आपल्या सुंदर पलंगांवर आणि दिवाणांवर* बसले आहेत,+त्या इस्राएली लोकांपैकी फक्‍त काही जणांना वाचवलं जाईल.’ १३  सैन्यांचा देव, सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो, ‘ऐका आणि याकोबच्या घराण्याला ताकीद द्या.’* १४  ‘कारण इस्राएलने केलेल्या सर्व बंडांसाठी* ज्या दिवशी मी त्याच्याकडून हिशोब मागीन,+त्या दिवशी मी बेथेलच्या वेदींचाही नाश करीन;+मी प्रत्येक वेदीची शिंगं कापून टाकीन आणि ती जमिनीवर पडतील.+ १५  उन्हाळ्याच्या घरासोबत मी हिवाळ्याचं घरही पाडून टाकीन.’ ‘हस्तिदंताची घरं नष्ट होतील,+आणि आलिशान* घरांचाही नाश होईल,’+ असं यहोवा म्हणतो.”

तळटीपा

किंवा “आयाळ असलेल्या तरुण सिंहाने.”
किंवा कदाचित, “त्यात आमिष लावलं नसेल.”
किंवा “त्याचं गुपित.”
किंवा “दिमिष्कच्या दिवाणांवर.”
किंवा “घराण्याविरुद्ध साक्ष द्या.”
किंवा “अपराधांसाठी.”
किंवा कदाचित, “पुष्कळ.”