आमोस ९:१-१५

  • देवाच्या न्यायदंडापासून सुटका नाही (१-१०)

  • दावीदचा तंबू पुन्हा उभा केला जाईल (११-१५)

 मला यहोवा वेदीच्या वरती दिसला+ आणि तो म्हणाला: “खांबांच्या माथ्यावर मार, म्हणजे त्यांचा पाया हलेल. त्यांची डोकी* कापून टाक, आणि मी त्यांच्यातल्या उरलेल्यांना तलवारीने मारून टाकीन. कोणालाही पळून जाता येणार नाही आणि कोणी प्रयत्न केला, तरी त्याला निसटून जाता येणार नाही.+  २  ते जरी कबर* खोदून तिच्यात लपून बसले,तरी मी त्यांना आपल्या हाताने बाहेर काढीन;ते आकाशात गेले,तरी मी त्यांना तिथून खाली आणीन.  ३  आणि जर ते कर्मेल पर्वतावर जाऊन लपले,तर मी त्यांना तिथून शोधून काढीन.+ माझ्यापासून लपण्यासाठी ते समुद्राच्या तळाशी गेले,तर तिथे मी सापाला त्यांना चावण्याची आज्ञा देईन.  ४  जर त्यांच्या शत्रूंनी त्यांना बंदिवासात नेलं,तर तिथे मी तलवारीला आज्ञा करीन आणि ती त्यांना मारून टाकेल;+मी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी नाही, तर संकटं आणण्यासाठी त्यांच्यावर आपली नजर रोखीन.+  ५  कारण सर्वोच्च प्रभू, सैन्यांचा यहोवा याने हात लावताच देश* वितळेल,+आणि त्याचे सर्व रहिवासी शोक करतील;+सगळा देश, भरून वाहणाऱ्‍या नाईल नदीसारखा उसळेल,आणि इजिप्तच्या नाईलसारखा पुन्हा ओसरेल.+  ६  ‘जो आकाशात आपला जिनाआणि पृथ्वीवर आपला घुमट बांधतो;जो समुद्राच्या पाण्याला बोलावतो आणि पृथ्वीवर त्याचा वर्षाव करतो,+​—त्याचं नाव यहोवा आहे.’+  ७  यहोवा म्हणतो, ‘इस्राएलच्या लोकांनो, तुम्ही माझ्यासाठी कूशी लोकांच्या वंशजांसारखे नाहीत का? मी इस्राएलला इजिप्त देशातून बाहेर आणलं नाही का?+ मी पलिष्ट्यांना क्रेतमधून,+ आणि अरामी लोकांना कीरमधून बाहेर आणलं नाही का?’+  ८  ‘पाहा! सर्वोच्च प्रभू यहोवा याची नजर या पापी राज्यावर आहे,आणि तो पृथ्वीच्या पाठीवरून त्याचं नामोनिशाण मिटवून टाकेल.+ पण मी याकोबच्या घराण्याचा पूर्णपणे नाश करणार नाही,’+ असं यहोवा म्हणतो.  ९  ‘कारण पाहा! मी अशी आज्ञा देतो,चाळणीत धान्य चाळल्यावरजसा एकही खडा जमिनीवर पडत नाही,तसं इस्राएलच्या घराण्याला सर्व राष्ट्रांमध्ये चाळलं जावं.+ १०  माझ्या लोकांतले पापी म्हणतात, “संकट आमच्या जवळ येणार नाही, ते आमच्यापर्यंत पोहोचणारही नाही,” पण ते सर्व तलवारीने मरतील.’ ११  ‘त्या दिवशी मी दावीदचा पडलेला तंबू* पुन्हा उभा करीन,+मी खिंडारं दुरुस्त करीन,त्याचे कोसळलेले भाग परत उभे करीन;मी तो पूर्वीच्या दिवसांप्रमाणे पुन्हा बांधीन.+ १२  मग माझे लोक अदोमच्या उरलेल्यांचा,आणि माझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या सर्व राष्ट्रांचा ताबा घेतील,’+ असं यहोवा म्हणतो. तोच हे सर्व घडवून आणेल. १३  यहोवा म्हणतो, ‘पाहा! असे दिवस येत आहेत,जेव्हा नांगरणारा, कापणी करणाऱ्‍याला;आणि द्राक्षं तुडवणारा, बी पेरणाऱ्‍याला गाठेल.+ पर्वतांवरून गोड द्राक्षारस पाझरेल+आणि टेकड्यांवरून तो वाहील.+ १४  मी माझ्या लोकांना, इस्राएली लोकांना गोळा करून बंदिवासातून परत आणीन,+आणि ते त्यांची उजाड पडलेली शहरं पुन्हा बांधून त्यांत राहतील;+ते द्राक्षमळे लावून त्यांचा द्राक्षारस पितील+ आणि बागा लावून त्यांची फळं खातील.’+ १५  ‘मी त्यांना त्यांच्या देशात रुजवीन,आणि जो देश मी त्यांना दिलाय त्यातून त्यांना पुन्हा कधीही उपटलं जाणार नाही,’+ असं तुमचा देव यहोवा म्हणतो.”

तळटीपा

किंवा कदाचित, “खांबांचे माथे.”
हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.
किंवा “पृथ्वी.”
किंवा “मंडप; झोपडी.”