इब्री लोकांना पत्र ६:१-२०

  • प्रौढतेपर्यंत पोहोचण्यासाठी खटपट (१-३)

  • जे पडले ते मुलाला पुन्हा वधस्तंभाला खिळतात (४-८)

  • आपली आशा दृढ करा (९-१२)

  • देवाच्या अभिवचनाची पूर्णता निश्‍चित (१३-२०)

    • देवाचं अभिवचन आणि शपथ अटळ आहे (१७, १८)

 आता आपण ख्रिस्ताबद्दलच्या प्राथमिक शिकवणींच्या पुढे गेलो असल्यामुळे,+ आपण प्रौढतेपर्यंत पोहोचण्यासाठी खटपट करू या.+ आपण पुन्हा एकदा पाया घालू नये, म्हणजे पुन्हा त्याच गोष्टी शिकू नयेत, ज्या आपण सुरुवातीला शिकलो होतो. जसं की निरर्थक* कामांबद्दल पश्‍चात्ताप, देवावर विश्‍वास, २  बाप्तिस्मा,* हात ठेवणं,+ मेलेल्यांचं पुनरुत्थान*+ आणि सर्वकाळाचा न्याय यांबद्दलची शिकवण. ३  आणि देवाने घडू दिलं, तर आपण नक्कीच प्रौढतेपर्यंत पोहोचू. ४  कारण ज्यांना एकेकाळी ज्ञानाचा प्रकाश मिळाला होता;+ ज्यांनी स्वर्गीय मोफत दान चाखलं; जे पवित्र शक्‍तीचे* भागीदार झाले; ५  आणि ज्यांनी देवाचं उत्तम वचन आणि येणाऱ्‍या जगाच्या व्यवस्थेच्या* सामर्थ्यशाली गोष्टी चाखल्या, ६  पण तरीसुद्धा जे पडले,+ त्यांना परत आणून पश्‍चात्ताप करायला प्रवृत्त करणं अशक्य आहे. कारण, ते स्वतःच देवाच्या मुलाला पुन्हा वधस्तंभाला* खिळतात आणि सगळ्यांसमोर त्याला लज्जित करतात.+ ७  देवाच्या आशीर्वादाने वारंवार पाऊस पडतो, तेव्हा जमीन पावसाचं पाणी पिऊन, तिची मशागत करणाऱ्‍यांसाठी पीक उत्पन्‍न करते. ८  पण, जी जमीन काटेकुसळे उत्पन्‍न करते, ती निरुपयोगी ठरते. तिला लवकरच शाप देऊन, शेवटी जाळून टाकलं जाईल. ९  प्रिय बांधवांनो, आम्ही अशा प्रकारे बोलत असलो, तरी आम्हाला खातरी आहे, की तुम्ही यापेक्षा चांगल्या स्थितीत आहात. अर्थात, तुम्ही तारणाकडे नेणाऱ्‍या मार्गावर चालत आहात. १०  तुम्ही पवित्र जनांची सेवा केली आणि अजूनही करत आहात. आणि तुमचं काम आणि देवाच्या नावाबद्दल तुम्ही दाखवलेलं प्रेम+ विसरून जायला देव अन्यायी* नाही. ११  पण, शेवटपर्यंत+ तुमची आशा दृढपणे टिकवून ठेवण्यासाठी+ तुमच्यापैकी प्रत्येकाने अशीच मेहनती वृत्ती पुढेही दाखवावी, अशी आमची इच्छा आहे. १२  म्हणजे तुम्ही आळशी बनणार नाही,+ तर विश्‍वासाद्वारे आणि धीर धरण्याद्वारे जे अभिवचनांचे वारस होतात, त्यांचं अनुकरण करणारे व्हाल. १३  देवाने अब्राहामला अभिवचन दिलं, तेव्हा शपथ घेण्यासाठी आपल्यापेक्षा मोठा कोणी नसल्यामुळे देवाने स्वतःचीच शपथ घेऊन म्हटलं:+ १४  “मी तुला नक्की आशीर्वाद देईन आणि तुझी संतती वाढवीन.”+ १५  अब्राहामने धीर धरल्यावर त्याला हे अभिवचन मिळालं. १६  कारण लोक सहसा आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्‍तीची शपथ घेतात; आणि त्यांच्या शपथेने प्रत्येक वाद मिटतो, कारण ती एक कायदेशीर हमी असते.+ १७  त्याच प्रकारे, आपला उद्देश* कधीही बदलणार नाही हे देवाने आपल्या अभिवचनांच्या वारसदारांना आणखी स्पष्टपणे दाखवायचं ठरवलं,+ तेव्हा त्याने शपथ घेऊन याची हमी दिली.* १८  देवाने केलेल्या या दोन गोष्टी* कधीच बदलत नाहीत आणि तो कधीही खोटं बोलू शकत नाही.+ आपण जे देवाच्या आश्रयाला धावून आलो आहोत, त्या आपल्याला, या गोष्टींमुळे आपल्यासमोर ठेवलेली आशा पक्की धरून ठेवण्याचं प्रोत्साहन मिळतं. १९  ही खातरीलायक आणि पक्की आशा+ आपल्या जिवासाठी* एखाद्या नांगरासारखी आहे आणि ती पडद्याच्या पलीकडे आत जाते.+ २०  तिथे, मलकीसदेकसारखा सर्वकाळासाठी महायाजक बनलेला येशू,+ आपल्याकरता मार्ग तयार करण्यासाठी आपल्या पुढे गेला आहे.+

तळटीपा

शब्दशः “निर्जीव.”
किंवा “येणाऱ्‍या काळाच्या.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “अनीतिमान.”
किंवा “इच्छा.”
शब्दशः “मध्यस्थी केली.”
हे देवाच्या अभिवचनाला आणि शपथेला सूचित करतं.
किंवा “जीवनासाठी.”