ईयोब ११:१-२०

  • सोफरचं पहिलं भाषण (१-२०)

    • विनाकारण बडबड करण्याचा ईयोबवर आरोप (२, ३)

    • ईयोबला चुकीचं काम सोडून द्यायला सांगतो (१४)

११  मग सोफर+ नामाथी याने उत्तर दिलं:  २  “तुझ्या या सर्व शब्दांना कोणी उत्तर देऊ नये का? खूप बोलल्यामुळे एखादा खरा ठरेल का?*  ३  तुझ्या या बडबडीमुळे लोक गप्प बसतील का? तू चालवलेल्या या थट्टेमुळे तुला कोणी खडसावणार नाही का?+  ४  कारण तू म्हणतोस, ‘माझी शिकवण शुद्ध आहे,+मी देवाच्या नजरेत निष्कलंक आहे.’+  ५  पण जर देव तुझ्याशी बोलला असताआणि त्याने आपलं तोंड उघडलं असतं,+  ६  तर त्याने बुद्धीची रहस्यं तुझ्यापुढे प्रकट केली असती,कारण व्यावहारिक बुद्धीचे बरेच पैलू असतात. देव तुझ्या काही अपराधांकडे दुर्लक्ष करतो, हे तेव्हा तुला कळलं असतं.  ७  देवाच्या गूढ गोष्टी तू जाणू शकतोस का? सर्वशक्‍तिमान देवाचं सगळं ज्ञान* तू शोधू शकतोस का?  ८  ते आकाशापेक्षा उंच आहे, तू तिथे कसा पोहोचणार? ते कबरेपेक्षाही* खोल आहे, ते तू कसं जाणणार?  ९  त्याची लांबी पृथ्वीपेक्षाआणि रुंदी समुद्रापेक्षा जास्त आहे. १०  जर त्याने जाताजाता एखाद्याला धरून त्याच्यावर खटला चालवला,तर त्याला कोण अडवणार? ११  कारण माणसांनी केलेली फसवणूक तो ओळखतो. दुष्टपणा पाहिल्यावर, तो त्याच्या लक्षात येणार नाही का? १२  जर कधी रानगाढवाने माणसाला जन्म दिला,तरच मूर्ख माणसाला शहाणपण येईल. १३  पण जर तू योग्य मनोवृत्ती दाखवलीसआणि देवापुढे हात पसरलेस, तर बरं होईल. १४  जर तू काही चुकीचं करत असशील, तर ते सोडून दे,तुझ्या तंबूंमध्ये अनीती राहू देऊ नकोस. १५  तेव्हा तू लाज न बाळगता आपली मान वर करू शकशील;आणि न घाबरता, स्थिर उभा राहू शकशील. १६  तेव्हा तू आपली दुःखं विसरशील;वाहून गेलेल्या पाण्यासारखा तुला त्यांचा विसर पडेल. १७  तुझं आयुष्य दुपारच्या उन्हापेक्षा प्रकाशमान होईल;तुझ्या जीवनातला अंधारही सकाळसारखा असेल. १८  आशेमुळे तू भरवसा ठेवशील,तू आपल्या सगळ्या संपत्तीवर नजर फिरवशील आणि निर्धास्तपणे आराम करशील. १९  तू निश्‍चिंत झोपशील आणि तुला कोणीही घाबरवणार नाही,बरेच लोक तुझी कृपा मिळवण्याचा प्रयत्न करतील. २०  पण दुष्टांची नजर कमजोर होईल;सुटकेसाठी त्यांना कोणतंही ठिकाण सापडणार नाही,मृत्यूच त्यांची शेवटची आशा असेल.”+

तळटीपा

किंवा “बढाई मारणारा खरा ठरेल का?”
किंवा “सीमा.”
हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.