ईयोब १७:१-१६

  • ईयोबचं उत्तर पुढे सुरू (१-१६)

    • “थट्टा करणाऱ्‍यांनी मला घेरलंय” ()

    • “त्याने मला लोकांमध्ये थट्टेचा विषय बनवलंय” ()

    • “कबर माझं घर होईल” (१३)

१७  माझी शक्‍ती नाहीशी झाली आहे, माझे दिवस संपले आहेत;कबर माझी वाट पाहत आहे.+  २  थट्टा करणाऱ्‍यांनी मला घेरलंय.+ माझ्या डोळ्यांना त्यांचा बंडखोरपणा पाहावा लागतोय.*  ३  कृपा करून, माझ्यासाठी जामीन राहा. कारण दुसरा कोण माझ्याशी हात मिळवून माझ्यासाठी जामीन राहील?+  ४  तू त्यांच्या हृदयापासून समंजसपणा लपवून ठेवला आहेस;+म्हणून तू त्यांना वरचढ होऊ देत नाहीस.  ५  असे लोक आपली संपत्ती मित्रांमध्ये वाटत फिरतात,पण त्यांच्या मुलांची नजर अंधूक होते.  ६  त्याने मला लोकांमध्ये थट्टेचा विषय* बनवलंय,+म्हणून ते लोक माझ्या तोंडावर थुंकतात.+  ७  चिंतेमुळे माझे डोळे कमजोर झाले आहेत,+माझं शरीर हाडांचा सापळा झालंय.  ८  हे पाहून प्रामाणिक लोकांना आश्‍चर्य वाटतं,निर्दोष माणसाला दुष्टामुळे* राग येतो.  ९  नीतिमान आपल्या मार्गाला धरून राहतो,+ज्याचे हात निर्दोष आहेत, तो ताकदवान होत जातो.+ १०  तुम्ही सगळे या आणि तुमचा वादविवाद पुन्हा सुरू करा,मला तर तुमच्यापैकी कोणीही बुद्धिमान वाटत नाही.+ ११  माझे दिवस संपले आहेत;+माझ्या योजना, मनातल्या इच्छा धुळीला मिळाल्या आहेत.+ १२  ‘काळोख आहे तर लवकरच दिवस उजाडेल,’ असं म्हणून,ते रात्रीला दिवस म्हणत राहतात. १३  मी आणखी थोडा वेळ थांबलो, तर कबर* माझं घर होईल;+मी माझा बिछाना अंधारात पसरीन.+ १४  मी खड्ड्याला*+ म्हणीन, ‘तू माझा बाप आहेस!’ मी अळीला म्हणीन, ‘तू माझी आई आणि बहीण आहेस!’ १५  मग माझ्यासाठी आशाच कुठे आहे?+ कोणाला माझ्यासाठी काही आशा दिसते का? १६  ती* खाली, कबरेच्या* फाटकांपलीकडे जाईलमीही तिच्यासोबत धुळीला मिळेन.”+

तळटीपा

किंवा “लक्ष द्यावं लागतंय.”
शब्दशः “म्हण; वाक्प्रचार.”
किंवा “देवाला सोडून देणाऱ्‍यामुळे.”
हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.
किंवा “कबरेला.”
म्हणजे, माझी आशा.
हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.