ईयोब १८:१-२१

  • बिल्ददचं दुसरं भाषण (१-२१)

    • पापी लोकांसोबत काय होतं याचं वर्णन करतो (५-२०)

    • ईयोब देवाला ओळखत नाही असं सुचवतो (२१)

१८  मग बिल्दद+ शूही याने उत्तर दिलं:  २  “तुमची ही भाषणं कधी थांबणार? थोडा तरी समजूतदारपणा दाखवा, म्हणजे आपण बोलू.  ३  आम्हाला जनावरांसारखं;+मूर्ख* माणसांसारखं का समजता?  ४  तुम्ही जरी रागाने स्वतःचे तुकडेतुकडे केले,तरी तुमच्यासाठी पृथ्वी ओसाड पडेल का? आणि खडक आपल्या जागेवरून हलेल का?  ५  दुष्ट माणसाचा प्रकाश विझून जाईल,त्याच्या ज्वालेचं तेज नाहीसं होईल.+  ६  त्याच्या तंबूतला प्रकाश अंधूक होईल,त्याचा दिवा विझून जाईल.  ७  त्याला भरभर पावलं टाकता येणार नाहीत,तो स्वतःच्याच योजनांमुळे अडखळून पडेल.+  ८  कारण त्याची पावलं त्याला जाळ्याकडे नेतील,आणि चालता-चालता त्याचा पाय अडकेल.  ९  त्याची टाच सापळ्यात अडकेल;आणि तो पाशात पकडला जाईल.+ १०  त्याच्यासाठी जमिनीवर दोरी लपवलेली असते;त्याच्या वाटेवर सापळा रचून ठेवलेला असतो. ११  भय त्याला सर्व बाजूंनी घेरतं;+भीती त्याचा पाठलाग करते. १२  त्याची ताकद नाहीशी होते,संकटामुळे+ त्याचे पाय लटपटतात.* १३  त्याची त्वचा सडून जाते;त्याच्या हातापायांना अतिशय भयानक रोग* जडतो. १४  त्याला त्याच्या सुरक्षित तंबूमधून बाहेर काढून,+भयांच्या राजाकडे* नेलं जातं. १५  त्याच्या तंबूत परके लोक* राहतील;त्याच्या घरावर गंधक विखरला जाईल.+ १६  त्याची मुळं सुकून जातील,त्याच्या फांद्या कोमेजून जातील. १७  पृथ्वीवर त्याची आठवण राहणार नाही,कोणालाही त्याचं नाव लक्षात राहणार नाही.* १८  त्याला उजेडातून अंधारात हाकलून दिलं जाईलसुपीक देशातून त्याला घालवून दिलं जाईल. १९  त्याला मुलंबाळं किंवा वंशज नसतील,त्याच्या देशात* त्याचा कोणीही वारस उरणार नाही. २०  त्याच्या संकटाच्या दिवशी पश्‍चिमेकडचे लोक सुन्‍न होतीलआणि पूर्वेकडचे लोक भीतीने थरथर कापतील. २१  देवाला न ओळखणाऱ्‍या माणसाच्या ठिकाणाचीआणि दुष्टाच्या तंबूंची हीच दशा होईल.”

तळटीपा

किंवा कदाचित, “अशुद्ध.”
किंवा “तो लंगडत चालतो.”
शब्दशः “मृत्यूचा प्रथम जन्मलेला.”
किंवा “भयानक मृत्यूकडे.”
शब्दशः “जे त्याचं नाही.”
शब्दशः “त्याला नाव नसेल.”
किंवा “तात्पुरत्या राहण्याच्या ठिकाणी.”