ईयोब २५:१-६

  • बिल्ददचं तिसरं भाषण (१-६)

    • माणूस देवासमोर निर्दोष कसा असू शकतो ()

    • ईयोबचा खरेपणा व्यर्थ आहे असा दावा करतो (५, ६)

२५  बिल्दद+ शूही याने उत्तर दिलं:  २  “राज्य देवाचं आहे, तो शक्‍तिशाली आणि भीतिदायक आहे;तोच स्वर्गात* शांती स्थापन करतो.  ३  त्याचं सैन्य कोणी मोजू शकतं का? त्याचा प्रकाश कोणावर चमकत नाही?  ४  मग नाशवंत माणूस देवासमोर नीतिमान कसा असू शकतो?+ स्त्रीपासून जन्मलेला निर्दोष* कसा असू शकतो?+  ५  त्याच्या दृष्टीने तर चंद्रालाही तेज नाहीआणि त्याला तारेही अशुद्ध वाटतात.  ६  मग किड्यासारख्या माणसाबद्दल;कीटकासारख्या मानवाबद्दल काय बोलायचं!”

तळटीपा

शब्दशः “आपल्या उंच स्थानांवर.”
किंवा “शुद्ध.”