ईयोब २७:१-२३

  • खरेपणा टिकवून ठेवायचा ईयोबचा निश्‍चय (१-२३)

    • “मरेपर्यंत मी माझा खरेपणा सोडणार नाही!” ()

    • दुष्टांना आशा नाही ()

    • “तुमची भाषणं इतकी अर्थहीन का वाटतात?” (१२)

    • दुष्टाकडे काहीच उरत नाही (१३-२३)

२७  ईयोब आपला वाद पुढे चालवून म्हणाला:  २  “मला न्याय नाकारणाऱ्‍या जिवंत देवाची शपथ,+मला* दुःख देणाऱ्‍या सर्वशक्‍तिमान देवाची शपथ,+  ३  जोपर्यंत माझ्यात श्‍वास आहेआणि देवाने घातलेला श्‍वास माझ्या नाकपुड्यांत आहे,+  ४  तोपर्यंत माझ्या ओठांवर वाईट बोल येणार नाहीत;आणि माझी जीभ खोटं बोलणार नाही.  ५  तुम्हाला नीतिमान म्हणण्याचा मी विचारही करू शकत नाही! मरेपर्यंत मी माझा खरेपणा सोडणार नाही!*+  ६  मी नेहमी नीतीने चालीन, मी नीती सोडणार नाही;+मी जिवंत असेपर्यंत, माझं मन मला दोषी ठरवणार नाही.*  ७  माझ्या शत्रूची स्थिती दुष्टासारखी,आणि माझ्यावर हल्ला करणाऱ्‍याची स्थिती, अनीतीने वागणाऱ्‍यांसारखी होऊ दे!  ८  दुष्टाचा* नाश होतो आणि देव त्याच्या जीवनाचा* अंत करतो,तेव्हा त्या दुष्टासाठी कोणती आशा उरते?+  ९  त्याच्यावर संकट येईल,तेव्हा देव त्याचा आक्रोश ऐकेल का?+ १०  किंवा दुष्टाला सर्वशक्‍तिमान देवामुळे आनंद होईल का? आणि तो नेहमी देवाला प्रार्थना करेल का? ११  देवाच्या सामर्थ्याबद्दल* मी तुम्हाला शिकवीन;सर्वशक्‍तिमान देवाबद्दल कोणतीही गोष्ट मी लपवून ठेवणार नाही. १२  जर तुम्ही सगळ्यांनी दृष्टान्त पाहिले आहेत,तर मग तुमची भाषणं इतकी अर्थहीन का वाटतात? १३  दुष्टाला देवाकडून हाच वाटा मिळेल,+अत्याचार करणाऱ्‍यांना सर्वशक्‍तिमान देवाकडून हाच वारसा मिळेल. १४  त्याला खूप मुलं झाली, तर ती तलवारीने मरतील,+त्याच्या वंशजांना खायला पुरेसं अन्‍न मिळणार नाही. १५  त्याच्यामागे जे उरतील त्यांना महामारीमुळे पुरलं जाईल,त्यांच्या विधवा त्यांच्यासाठी अश्रू गाळणार नाहीत. १६  त्याने जरी धुळीसारखी चांदीची रास रचलीआणि मातीच्या ढिगाऱ्‍याप्रमाणे उत्तम वस्त्रं साठवून ठेवली, १७  तरी त्याने जमवलेली ती वस्त्रं,नीतिमान माणूस घालेल,+आणि निर्दोष माणसं त्याची चांदी आपसात वाटून घेतील. १८  त्याने बांधलेलं घर किड्याच्या कोशासारखं;* आणि पहारेकऱ्‍याने बनवलेल्या झोपडीसारखं+ नाजूक असतं. १९  तो झोपताना श्रीमंत असेल, पण त्याच्या हाती काहीच लागणार नाही;तो डोळे उघडेल, तेव्हा त्याच्याजवळ काहीच नसेल. २०  संकटं त्याला पुरासारखी गाठतील;रात्री त्याला वादळ उडवून नेईल.+ २१  पूर्वेकडचा वारा त्याला उचलून नेईल आणि तो नाहीसा होईल;तो वारा त्याला त्याच्या ठिकाणाहून वाहून नेईल.+ २२  त्या जोरदार वाऱ्‍यापासून वाचण्याचा तो खूप प्रयत्न करेल,+पण वारा दयामाया न दाखवता त्याला झोडपून काढेल.+ २३  तो त्याला पाहून टाळ्या वाजवतो आणि आपल्या ठिकाणाहून शिट्ट्या मारून+ त्याची थट्टा करतो.*

तळटीपा

किंवा “माझ्या जिवाला.”
किंवा “टिकवून ठेवीन.”
किंवा “टोमणे मारणार नाही.”
किंवा “देवाला सोडून देणाऱ्‍याचा.”
किंवा “जिवाचा.”
किंवा कदाचित, “हाताने.”
किंवा “घरासारखं.”
किंवा कदाचित, “ते त्याला पाहून टाळ्या वाजवतात आणि आपल्या ठिकाणाहून शिट्ट्या मारून त्याची थट्टा करतात.”