ईयोब ३०:१-३१

  • ईयोब आपल्या बदललेल्या परिस्थितीचं वर्णन करतो (१-३१)

    • मूर्ख लोक टिंगल करतात (१-१५)

    • देवाकडून काहीच मदत नाही असं वाटतं (२०, २१)

    • माझी कातडी काळवंडली आहे (३०)

३०  पण ज्यांच्या वडिलांना, माझे कळप राखणाऱ्‍या कुत्र्यांसोबतही ठेवण्याचामी कधी विचार केला नसता,असे तरुण आता मला हसतात;+  २  त्यांच्या हातांचं बळ माझ्या काय कामाचं? त्यांची ताकद संपली आहे.  ३  गरिबीने आणि उपासमारीने ते खंगले आहेत;* आधीच उद्ध्‌वस्त झालेल्या आणि ओसाड पडलेल्याकोरड्या जमिनीवरून, मिळेल ते खाऊन ते पोट भरतात.  ४  ते झाडाझुडपांतून खारट पानं गोळा करतात;झाडांची कडवट मुळं त्यांचं अन्‍न आहे.  ५  त्यांना त्यांच्या वस्तीतून हाकलून लावण्यात आलंय;+चोराच्या मागून ओरडावं तसं लोक त्यांच्यावर ओरडतात.  ६  ते दऱ्‍याखोऱ्‍यांत; जमिनीतल्या खड्ड्यांतआणि कडेकपारींत राहतात.  ७  ते झुडपांमधून ओरडत राहतात;खाजकुइलीच्या झुडपांत ते घोळक्याने बसलेले असतात.  ८  मूर्ख आणि नालायक माणसांच्या मुलांसारखं,त्यांना देशातून हुसकावून लावण्यात* आलंय.  ९  पण आता त्यांच्या गाण्यांतूनही ते माझी टर उडवतात;+मी त्यांच्या हसण्याचा विषय* बनलोय.+ १०  ते माझ्यापासून चार हात लांब राहतात;+त्यांना माझी घृणा वाटते;माझ्या तोंडावर थुंकायलाही ते कमी करत नाहीत.+ ११  देवाने मला कमजोर* आणि असाहाय्य करून टाकलंय,म्हणूनच ते माझ्यासमोर बेलगामपणे* वागतात. १२  उजवीकडून ते टोळीने माझ्यावर उठतात;ते मला सळो की पळो करून सोडतात,आणि माझ्या मार्गावर विनाशाचे अडसर उभे करतात. १३  ते माझे रस्ते उद्ध्‌वस्त करतातआणि माझ्या संकटांत भर घालतात;+त्यांना अडवणारा* कोणी नाही. १४  भिंतीतल्या मोठ्या फटीतून* आत यावं, तसे ते येतात;माझ्या संकटांत ते माझ्यावर तुटून पडतात. १५  मला दहशत बसली आहे;माझी प्रतिष्ठा वाऱ्‍यासारखी उडून गेली आहे,माझी सुटकेची आशा ढगासारखी विरून गेली आहे. १६  माझा जीवनप्रवाह आटत चालला आहे;+दुःखाच्या दिवसांनी+ मला घेरलंय. १७  रात्री माझ्या हाडांत असह्‍य कळा उठतात;*+माझ्या तीव्र वेदना थांबतच नाहीत.+ १८  माझ्या रोगामुळे माझी वस्त्रं* विस्कटली आहेत,*ती माझा गळा इतका आवळतात, की माझा जीव गुदमरतो. १९  देवाने मला चिखलात फेकून दिलंय;धुळीसारखी आणि राखेसारखी माझी अवस्था झाली आहे. २०  मी मदतीची याचना करतो, पण तू माझं ऐकत नाहीस;+मी उभा राहतो, पण तू माझ्याकडे नुसताच पाहत राहतोस. २१  तू निर्दयीपणे माझ्याविरुद्ध उठला आहेस;+तुझ्या हाताच्या पूर्ण शक्‍तीने तू माझ्यावर प्रहार करतोस. २२  तू मला उचलून वाऱ्‍याने उडवून लावतोस आणि मग वादळात इकडेतिकडे भिरकावतोस.* २३  मला माहीत आहे, की तू मला मृत्यूच्या दारात नेशील;जिवंत असलेल्या सगळ्यांचीच त्या घरात भेट होणार आहे. २४  पण संकटात मदतीसाठी आक्रोश करणाऱ्‍या,असाहाय्य माणसावर* कोणी हल्ला करेल का?+ २५  ज्यांचे वाईट दिवस आले, त्यांच्यासाठी मी रडलो नाही का? मी गरिबांसाठी हळहळलो नाही का?+ २६  मी चांगल्याची अपेक्षा केली, पण माझ्यासोबत वाईट घडलं;मी उजेडाची वाट पाहत होतो, पण माझ्या वाट्याला अंधारच आला. २७  माझी घालमेल संपतच नाही;दुःखाचे दिवस माझ्यापुढे उभे आहेत. २८  मी निराशेच्या अंधारात फिरतो;+ कुठेही प्रकाश दिसत नाही. मी मंडळीत उठून मदतीसाठी विनवणी करतो. २९  कोल्हे जणू माझे भाऊबंद;आणि शहामृग माझे सोबती झाले आहेत.+ ३०  माझी काळवंडलेली कातडी गळून गेली आहे;+उष्णतेने* माझी हाडं तापली आहेत. ३१  माझ्या वीणेतून* फक्‍त शोकाचे स्वर येतात;माझ्या बासरीतून फक्‍त दुःखाचेच सूर निघतात.

तळटीपा

किंवा “अशक्‍त झाले आहेत.”
शब्दशः “फटके मारणं.”
शब्दशः “म्हण; वाक्प्रचार.”
शब्दशः “माझ्या धनुष्याची दोरी सैल केली.”
किंवा “मर्यादा सोडून.”
किंवा कदाचित, “मदत करणारा.”
किंवा “खिंडारातून.”
शब्दशः “माझ्या हाडांना छिद्रं पडली आहेत.”
हे कदाचित त्याच्या त्वचेला सूचित करत असावं.
किंवा कदाचित, “तीव्र वेदनांमुळे मी विद्रूप झालोय.”
किंवा कदाचित, “आपटून चुराडा करतोस.”
शब्दशः “दगडमातीच्या ढिगाऱ्‍यावर.”
किंवा कदाचित, “तापाने.”