ईयोब ३५:१-१६

  • ईयोबच्या चुकीच्या तर्कांकडे अलीहू लक्ष वेधतो (१-१६)

    • ईयोब स्वतःला देवापेक्षा जास्त नीतिमान म्हणतो ()

    • देव इतक्या उंचावर, की पापामुळे त्याचं नुकसान होत नाही (५, ६)

    • ईयोबने देवाची वाट पाहावी (१४)

३५  अलीहू पुढे म्हणाला:  २  “‘मी देवापेक्षा जास्त नीतिमान आहे,’ हे तुझं म्हणणं योग्य असल्याची तुला खातरी आहे का?+  ३  कारण तू म्हणतोस, ‘तुला* काय फरक पडतो? मी पाप केलं नाही, तरी मला काय फायदा झाला?’+  ४  मी तुला उत्तर देईन,आणि तुझ्या सोबत्यांनाही.+  ५  वर आकाशाकडे पाहा! तुझ्यापेक्षा फार उंचावर असलेले ढग निरखून पाहा.+  ६  तू पाप केलंस, तरी देवाचं काय नुकसान होईल?+ तू कितीही अपराध केलेस, तरी त्याचं काय बिघडवशील?+  ७  तू नीतीने वागल्यामुळे त्याला काय मिळेल? तुझ्याकडून त्याला काय फायदा होईल?+  ८  तुझ्या दुष्टतेमुळे फक्‍त तुझ्यासारख्या मानवाचं नुकसान होतं आणि तू नीतीने वागल्यामुळे एखाद्या माणसाचाच फायदा होऊ शकतो.  ९  अत्याचार वाढला, की लोक आरडाओरड करतात;बलवानांच्या जुलमापासून* सुटकेसाठी ते आक्रोश करतात.+ १०  पण ‘ज्याच्यासाठी रात्रीही स्तुतिगीतं गायली जातात,+तो माझा देव, माझा महान निर्माणकर्ता कुठे आहे?’ असं कोणीच म्हणत नाही.+ ११  पृथ्वीवरच्या पशूंपेक्षा+ तो आपल्याला जास्त शिकवतो,+आणि आकाशातल्या पक्ष्यांपेक्षा तो आपल्याला जास्त बुद्धिमान बनवतो. १२  लोक आक्रोश करतात, पण ते गर्विष्ठ आणि दुष्ट असल्यामुळे+तो त्यांना उत्तर देत नाही.+ १३  कपटी मनाने केलेली प्रार्थना देव नक्कीच ऐकत नाही;*+सर्वशक्‍तिमान देव अशा प्रार्थनेकडे लक्ष देत नाही. १४  मग, तू त्याला पाहू शकत नाही, या तुझ्या तक्रारीकडे तो लक्ष देईल का?+ तुझा खटला त्याच्यासमोर आहे, तेव्हा तू त्याची भीतभीत वाट पाहा.+ १५  कारण त्याने रागाच्या भरात तुझ्याकडून हिशोब मागितला नाही;आणि तुझ्या अहंकाराकडे लक्ष दिलं नाही.+ १६  ईयोब विनाकारण बडबड करतो;आणि ज्ञान नसताना बोलत सुटतो.”+

तळटीपा

हे कदाचित देवाला सूचित करत असावं.
शब्दशः “हातापासून.”
किंवा “देव लबाडी नक्कीच ऐकत नाही.”