ईयोब ८:१-२२

  • बिल्ददचं पहिलं भाषण (१-२२)

    • ईयोबच्या मुलांनी पाप केलं असं सुचवतो ()

    • जर तू शुद्ध असतास, तर देवाने तुला वाचवलं असतं ()

    • ईयोब दुष्ट आहे असं सुचवतो (१३)

 मग बिल्दद+ शूही+ म्हणाला:  २  “कधीपर्यंत तू असाच बोलत राहणार?+ तुझे शब्द सोसाट्याच्या वाऱ्‍यासारखे आहेत!  ३  देव अन्याय करेल का? किंवा सर्वशक्‍तिमान देव अनीतीने वागेल का?  ४  तुझ्या मुलांनी त्याच्याविरुद्ध पाप केलं असेल,आणि त्यांच्या बंडामुळे त्याने त्यांना शिक्षा दिली असेल;  ५  पण तरीही जर तू देवाकडे मदत मागितलीस+आणि सर्वशक्‍तिमान देवाकडे कृपेसाठी याचना केलीस,  ६  आणि जर तू खरोखर शुद्ध आणि प्रामाणिक असशील,+तर तो नक्की तुझ्याकडे लक्ष देईलआणि तुझ्या हक्काचं स्थान तुला परत मिळवून देईल.  ७  आणि जरी तुझी सुरुवात लहान असली,तरी तुझं भविष्य महान असेल.+  ८  तुझ्या आधीच्या पिढीच्या लोकांना विचार,त्यांच्या वाडवडिलांनी ज्या गोष्टी शोधून काढल्या, त्यांकडे लक्ष दे.+  ९  कारण आपला जन्म तर काल-परवाचा आहे, आणि आपल्याला काहीच माहीत नाही,पृथ्वीवरचं आपलं आयुष्य सावलीसारखं आहे. १०  ते तुला शिकवणार नाहीत का? त्यांना माहीत असलेल्या गोष्टी ते तुला सांगणार नाहीत का?* ११  दलदल नसेल तर लव्हाळं* उंच वाढेल का? पाण्याशिवाय गवत उंच वाढेल का? १२  जरी त्यांना कळ्या आल्या असल्या,तरी ते इतर झाडांच्या आधी सुकून जातील. १३  देवाला विसरणाऱ्‍या सर्वांची अशीच परिस्थिती होईल,*कारण दुष्टाची* आशा नष्ट होईल. १४  तो व्यर्थ गोष्टींवर भरवसा ठेवतोत्याचा भरवसा कोळ्याच्या जाळ्यासारखा* नाजूक आहे. १५  तो त्याच्या घराला टेकेल, पण ते तुटून जाईल;तो त्याला पकडण्याचा प्रयत्न करेल, पण ते टिकणार नाही. १६  तो सूर्यप्रकाशातल्या एखाद्या कोवळ्या झाडासारखा आहे,त्याच्या फांद्या बागेत सगळीकडे पसरतात.+ १७  त्याची मुळं दगडाच्या ढिगाऱ्‍यांमध्ये गुंततात;तो आपलं घर दगडांमध्ये शोधतो. १८  पण जेव्हा त्याला त्याच्या ठिकाणावरून उपटलं जाईल,तेव्हा ते ठिकाण त्याला नाकारून म्हणेल, ‘मी तुला कधीच पाहिलं नाही.’+ १९  हो, तो अशाच प्रकारे नाहीसा होईल;+मग त्याच्या जागी मातीतून इतर झाडं उगवतील. २०  जे खरेपणाने वागतात, त्यांना* देव कधीच नाकारणार नाही;आणि तो दुष्टांना कधीच मदत करणार नाही.* २१  तो तुला पुन्हा हसवेलआणि तू पुन्हा आनंदाने जयजयकार करशील. २२  तुझा द्वेष करणारे लज्जित होतील,दुष्टांच्या तंबूचा नाश केला जाईल.”

तळटीपा

शब्दशः “त्यांच्या हृदयातून शब्द बाहेर काढणार नाहीत का?”
किंवा “पपायरस गवत.” शब्दार्थसूचीत “पपायरस गवत” पाहा.
शब्दशः “मार्ग असे असतात.”
किंवा “देवाला सोडून जाणाऱ्‍यांची.”
शब्दशः “घरासारखा.”
किंवा “निर्दोष असलेल्यांना.”
शब्दशः “त्यांचा हात धरणार नाही.”