उत्पत्ती ३६:१-४३

  • एसावचे वंशज (१-३०)

  • अदोमचे राजे आणि शेख (३१-४३)

३६  एसाव म्हणजेच अदोम+ याचा हा वृत्तान्त आहे. २  एसावने कनान देशातल्या या मुलींशी लग्न केलं: हित्ती एलोन+ याची मुलगी आदा,+ आणि अनाची मुलगी, म्हणजे हिव्वी सिबोन याची नात अहलीबामा;+ ३  आणि इश्‍माएलची मुलगी, म्हणजे नबायोथची+ बहीण बासमथ.+ ४  एसाव याला आदापासून अलीफज आणि बासमथपासून रगुवेल ही मुलं झाली. ५  तसंच, त्याला अहलीबामापासून यऊश, यालाम, आणि कोरह+ ही मुलं झाली. एसावला ही मुलं कनान देशात झाली. ६  त्यानंतर एसाव आपल्या बायका, मुलं, मुली, आपल्या घराण्यातले सर्व लोक,* आपले कळप आणि इतर सर्व जनावरं, तसंच, कनान देशात त्याने जमवलेली सगळी संपत्ती+ घेऊन आपला भाऊ याकोब याच्यापासून दूर, दुसऱ्‍या देशात राहायला गेला.+ ७  कारण त्यांची मालमत्ता खूप वाढल्यामुळे त्यांना एकत्र राहणं शक्य नव्हतं आणि ज्या देशात ते राहत होते* तिथली जमीन त्यांच्या कळपांना कमी पडू लागली. ८  म्हणून, एसाव सेईरच्या+ डोंगराळ प्रदेशात राहू लागला. एसाव म्हणजे अदोम.+ ९  सेईरच्या+ डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्‍या अदोमी लोकांचा मूळपुरुष एसाव, याचा हा वृत्तान्त आहे. १०  एसावच्या मुलांची नावं: आदापासून झालेला अलीफज आणि बासमथपासून झालेला रगुवेल.+ ११  अलीफजला तेमान,+ ओमार, सपो, गाताम आणि कनाज ही मुलं झाली.+ १२  एसावचा मुलगा अलीफज याच्या उपपत्नीचं नाव तिम्ना होतं. पुढे अलीफजला तिच्यापासून अमालेक+ झाला. ही एसावची बायको आदा हिची मुलं आहेत. १३  रगुवेलच्या मुलांची नावं: नहाथ, जेरह, शाम्मा, आणि मिज्जा. ही एसावची बायको, बासमथ+ हिची मुलं होती. १४  एसावची बायको अहलीबामा, जी अनाची मुलगी म्हणजे सिबोनची नात होती, तिच्यापासून एसावला झालेल्या मुलांची नावं: यऊश, यालाम, आणि कोरह. १५  एसावच्या मुलांपासून आलेले शेख* हे होते:+ एसावचा पहिला मुलगा अलीफज याची मुलं: शेख तेमान, शेख ओमार, शेख सपो, शेख कनाज,+ १६  शेख कोरह, शेख गाताम, आणि शेख अमालेक. अदोमच्या देशात अलीफजपासून+ आलेले हे शेख आहेत. ही आदापासून झालेली मुलं आहेत. १७  एसावचा मुलगा रगुवेल याच्या मुलांची नावं: शेख नहाथ, शेख जेरह, शेख शाम्मा, आणि शेख मिज्जा. अदोम+ देशात रगुवेलपासून आलेले हे शेख आहेत. ही एसावची बायको बासमथ हिच्यापासून झालेली मुलं आहेत. १८  एसावची बायको अहलीबामा हिच्या मुलांची नावं: शेख यऊश, शेख यालाम, आणि शेख कोरह. हे एसावची बायको, म्हणजे अनाची मुलगी अहलीबामा हिच्यापासून आलेले शेख आहेत. १९  ही एसाव म्हणजे अदोम+ याची मुलं आणि त्यांच्यापासून आलेले शेख आहेत. २०  त्या देशात राहणाऱ्‍या लोकांची, म्हणजे होरी सेईर याच्या मुलांची नावं:+ लोटान, शोबाल, सिबोन, अना,+ २१  दिशोन, एजेर, आणि दिशान.+ हे अदोम देशात राहणाऱ्‍या होरी लोकांचे शेख, म्हणजे सेईरची मुलं आहेत. २२  होरी आणि हेमाम ही लोटानची मुलं होती आणि लोटानच्या बहिणीचं नाव तिम्ना+ होतं. २३  शोबालच्या मुलांची नावं: अलवान, मानाहथ, एबाल, शपो, आणि ओनाम. २४  सिबोनच्या+ मुलांची नावं: अय्या आणि अना. अना हा आपला पिता सिबोन याच्या गाढवांची राखण करत असताना, त्याला रानात गरम पाण्याचे झरे सापडले होते. २५  अनाच्या मुलांची नावं: दिशोन आणि अनाची मुलगी अहलीबामा. २६  दिशोनच्या मुलांची नावं: हेमदान, एश्‍बान, इथ्रान, आणि करान.+ २७  एजेरच्या मुलांची नावं: बिल्हान, जावान, आणि अकान. २८  दिशानच्या मुलांची नावं: ऊस आणि अरान.+ २९  होरी लोकांचे शेख: शेख लोटान, शेख शोबाल, शेख सिबोन, शेख अना, ३०  शेख दिशोन, शेख एजेर, आणि शेख दिशान.+ सेईर देशात राहणारे हे होरी लोकांचे शेख आहेत. ३१  इस्राएली* लोकांवर कोणत्याही राजाने राज्य करण्याआधी,+ अदोम+ देशात या राजांनी राज्य केलं. ३२  बौरचा मुलगा बेला याने अदोमवर राज्य केलं आणि त्याच्या शहराचं नाव दिन्हाबा होतं. ३३  बेला मरण पावल्यावर, बस्रा इथल्या जेरहचा मुलगा योबाब त्याच्या जागी राज्य करू लागला. ३४  योबाब मरण पावल्यावर, तेमानी लोकांच्या देशातला हूशाम त्याच्या जागी राज्य करू लागला. ३५  हूशाम मरण पावल्यावर, बदादचा मुलगा हदाद त्याच्या जागी राज्य करू लागला. हदादने मवाबच्या प्रदेशात* मिद्यानी+ लोकांना हरवलं होतं आणि त्याच्या शहराचं नाव अवीत होतं. ३६  हदाद मरण पावल्यावर, मास्रेका इथला साम्ला त्याच्या जागी राज्य करू लागला. ३७  साम्ला मरण पावल्यावर, नदीच्या जवळ असलेल्या रहोबोथचा शौल त्याच्या जागी राज्य करू लागला. ३८  शौल मरण पावल्यावर, अखबोरचा मुलगा बाल-हनान त्याच्या जागी राज्य करू लागला. ३९  अखबोरचा मुलगा बाल-हनान मरण पावल्यावर, हदार त्याच्या जागी राज्य करू लागला. त्याच्या शहराचं नाव पाऊ होतं. त्याच्या बायकोचं नाव महेटाबेल होतं. ती मात्रेदची मुलगी आणि मेजाहाबची नात होती. ४०  एसावपासून आलेले शेख, त्यांची घराणी, त्यांची राहण्याची ठिकाणं आणि त्यांची नावं अशी आहेत: शेख तिम्ना, शेख आल्वा, शेख यतेथ,+ ४१  शेख अहलीबामा, शेख एलाह, शेख पीनोन, ४२  शेख कनाज, शेख तेमान, शेख मिब्सार, ४३  शेख माग्दीएल, आणि शेख ईराम. देशातल्या वेगळ्यावेगळ्या भागात आपापल्या वस्त्यांमध्ये राहणारे हे अदोमचे शेख आहेत.+ एसाव हा अदोमी लोकांचा मूळपुरुष आहे.+

तळटीपा

किंवा “जीव.”
किंवा “विदेशी म्हणून राहत होते.”
किंवा “लोकांचा सरदार, अधिपती.” हा शब्द “हजार” या अर्थाच्या मूळ हिब्रू शब्दावरून आला आहे आणि त्याचा अर्थ “हजार लोकांचा सरदार” असा होतो.
शब्दशः “इस्राएलची मुलं.”
शब्दशः “मैदानात.”