एस्तेर १०:१-३

  • मर्दखयला मिळालेली प्रतिष्ठा (१-३)

१०  अहश्‍वेरोश राजाने आपल्या संपूर्ण देशात आणि समुद्रातल्या बेटांवर राहणाऱ्‍या लोकांवर सक्‍तीची मजुरी लादली. २  अहश्‍वेरोश राजाने केलेल्या पराक्रमांचा आणि त्याच्या महान कार्यांचा; तसंच त्याने मर्दखयला+ मोठं पद कसं दिलं+ या सर्व गोष्टींचा तपशीलवार अहवाल, मेद आणि पारस यांच्या राजांच्या+ काळातल्या इतिहासाच्या ग्रंथात लिहिलेला आहे.+ ३  संपूर्ण साम्राज्यात अहश्‍वेरोश राजाच्या खालोखाल कोणी असेल तर तो यहुदी मर्दखयच होता. यहुद्यांमध्ये त्याचं मोठं नाव होतं आणि त्याचे यहुदी बांधव त्याचा खूप आदर करायचे. मर्दखय आपल्या लोकांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या मुलाबाळांच्या भल्यासाठी काम करत राहिला.*

तळटीपा

शब्दशः “शांतीच्या गोष्टी बोलत राहिला.”