गणना १७:१-१३

  • अहरोनच्या काठीला कळ्या, एक चिन्ह (१-१३)

१७  मग यहोवा मोशेला म्हणाला: २  “इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांच्या प्रत्येक कुळासाठी, त्या त्या कुळाच्या प्रधानाकडून+ एकेक काठी, म्हणजे एकूण १२ काठ्या घे. प्रत्येक प्रधानाचं नाव त्याच्या काठीवर लिही. ३  लेवीच्या काठीवर अहरोनचं नाव लिही, कारण प्रत्येक कुळाच्या प्रमुखासाठी एक काठी आहे. ४  या काठ्या भेटमंडपात साक्षपेटीपुढे,+ जिथे मी नेहमी तुमच्यासमोर प्रकट होतो+ तिथे ठेव. ५  ज्या माणसाला मी निवडीन+ त्याच्या काठीला कळ्या येतील. अशा प्रकारे, ते माझ्याविरुद्ध+ आणि तुमच्याविरुद्ध जी कुरकुर करतात ती मी बंद करीन.”+ ६  तेव्हा मोशे इस्राएली लोकांशी बोलला आणि त्यांच्या सर्व प्रधानांनी आपापल्या कुळाप्रमाणे प्रत्येक प्रधानासाठी एक, अशा १२ काठ्या त्याला दिल्या. अहरोनची काठीही त्यांत होती. ७  मग मोशेने या सर्व काठ्या साक्षपेटीच्या मंडपात यहोवासमोर ठेवल्या. ८  दुसऱ्‍या दिवशी जेव्हा मोशे साक्षपेटीच्या मंडपात गेला, तेव्हा त्याला दिसलं, की लेवी वंशासाठी असलेल्या अहरोनच्या काठीला कळ्या आल्या आहेत. तिला कळ्यांसोबतच, फुलं आणि पिकलेले बदामही आले होते. ९  मग मोशे त्या सर्व काठ्या यहोवासमोरून इस्राएली लोकांकडे घेऊन आला. त्यांनी त्या पाहिल्या आणि प्रत्येकाने आपापली काठी घेतली. १०  तेव्हा यहोवा मोशेला म्हणाला: “अहरोनची काठी+ पुन्हा साक्षपेटीसमोर ठेव, म्हणजे बंडखोरांसाठी+ ती काठी एक चिन्ह असेल.+ यामुळे ते माझ्याविरुद्ध कुरकुर करणं बंद करतील आणि मरणार नाहीत.” ११  मोशेने लगेच यहोवाच्या आज्ञेप्रमाणे केलं. त्याने अगदी तसंच केलं. १२  मग इस्राएली लोक मोशेला म्हणाले: “आता आम्ही मरणार, आमचा नक्कीच नाश होणार, आम्ही सर्वच मरू! १३  यहोवाच्या उपासना मंडपाजवळ कोणीही गेला तरी तो मरेल.+ आम्ही सगळे असेच मरणार की काय?”+

तळटीपा