गणना २६:१-६५

  • इस्राएलच्या वंशांची दुसऱ्‍यांदा गणना (१-६५)

२६  पीडा येऊन गेल्यावर,+ यहोवा मोशेला आणि अहरोन याजकाचा मुलगा एलाजार याला म्हणाला: २  “सर्व इस्राएली लोकांपैकी, सैन्यात भरती होऊ शकतील अशा २० वर्षं आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या सगळ्या पुरुषांची त्यांच्या कुळांप्रमाणे मोजणी कर.”+ ३  तेव्हा मोशे आणि एलाजार+ याजक, यार्देनच्या काठावर यरीहो+ इथे मवाबच्या मैदानांत+ इस्राएली लोकांना म्हणाले: ४  “यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे, २० वर्षं आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व पुरुषांची मोजणी करा.”+ इजिप्तमधून बाहेर आलेल्या इस्राएलच्या मुलांची नावं अशी: ५  इस्राएलचा पहिला मुलगा रऊबेन;+ रऊबेनची मुलं+ ही होती: हनोखपासून हनोखचं घराणं; पल्लूपासून पल्लूचं घराणं; ६  हेस्रोनपासून हेस्रोनचं घराणं; कर्मीपासून कर्मीचं घराणं. ७  ही सर्व रऊबेनपासून आलेली घराणी होती आणि त्यांच्यातल्या नोंदणी झालेल्यांची एकूण संख्या ४३,७३० इतकी होती.+ ८  पल्लूचा मुलगा अलीयाब होता. ९  अलीयाबच्या मुलांची नावं नमुवेल, दाथान आणि अबीराम होती. दाथान आणि अबीराम हे इस्राएली लोकांपैकी निवडलेले होते. कोरह आणि त्याच्या साथीदारांनी+ जेव्हा यहोवाविरुद्ध बंड केलं, तेव्हा या दोघांनीही मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध बंड केलं.+ १०  मग पृथ्वीने आपलं तोंड उघडून त्यांना गिळून टाकलं. तसंच, कोरह आपल्या २५० साथीदारांसोबत आगीत भस्म झाला.+ ते इतरांसाठी इशारा देणारं उदाहरण ठरलं.+ ११  पण कोरहची मुलं मेली नाहीत.+ १२  शिमोनच्या मुलांची+ त्यांच्या घराण्यांप्रमाणे नावं अशी: नमुवेलपासून नमुवेलचं घराणं; यामीनपासून यामीनचं घराणं; याखीनपासून याखीनचं घराणं; १३  जेरहपासून जेरहचं घराणं; शौलपासून शौलचं घराणं. १४  शिमोनच्या घराण्यांतल्या नोंदणी झालेल्यांची एकूण संख्या २२,२०० इतकी होती.+ १५  गादच्या मुलांची+ त्यांच्या घराण्यांप्रमाणे नावं अशी: सफोनपासून सफोनचं घराणं; हग्गीपासून हग्गीचं घराणं; शूनीपासून शूनीचं घराणं; १६  आजनीपासून आजनीचं घराणं; एरीपासून एरीचं घराणं; १७  अरोदपासून अरोदचं घराणं, अरेलीपासून अरेलीचं घराणं. १८  ही सर्व गादच्या मुलांची घराणी होती आणि त्यांच्यातल्या नोंदणी झालेल्यांची संख्या ४०,५०० इतकी होती.+ १९  यहूदाच्या मुलांची+ नावं एर आणि ओनान+ होती. पण त्या दोघांचाही कनान देशात मृत्यू झाला.+ २०  यहूदाच्या मुलांची त्यांच्या घराण्यांप्रमाणे नावं अशी: शेलापासून+ शेलाचं घराणं; पेरेसपासून+ पेरेसचं घराणं; जेरहपासून+ जेरहचं घराणं. २१  पेरेसच्या मुलांची नावं अशी: हेस्रोनपासून+ हेस्रोनचं घराणं; हामूलपासून+ हामूलचं घराणं. २२  ही सर्व यहूदाची घराणी होती आणि त्यांच्यातल्या नोंदणी झालेल्यांची संख्या ७६,५०० इतकी होती.+ २३  इस्साखारच्या मुलांची+ त्यांच्या घराण्यांप्रमाणे नावं अशी: तोलापासून+ तोलाचं घराणं; पूवापासून पूवाचं घराणं; २४  याशूबपासून याशूबचं घराणं; शिम्रोनपासून शिम्रोनचं घराणं. २५  ही सर्व इस्साखारची घराणी होती आणि त्यांच्यातल्या नोंदणी झालेल्यांची संख्या ६४,३०० इतकी होती.+ २६  जबुलूनच्या मुलांची+ त्यांच्या घराण्यांप्रमाणे नावं अशी: सेरेदपासून सेरेदचं घराणं; एलोनपासून एलोनचं घराणं; याहलेलपासून याहलेलचं घराणं. २७  ही सर्व जबुलूनची घराणी होती आणि त्यांच्यातल्या नोंदणी झालेल्यांची संख्या ६०,५०० इतकी होती.+ २८  योसेफच्या मुलांची+ त्यांच्या घराण्यांप्रमाणे नावं अशी: मनश्‍शे आणि एफ्राईम.+ २९  मनश्‍शेच्या मुलांची+ नावं अशी: माखीरपासून+ माखीरचं घराणं; माखीरच्या मुलाचं नाव गिलाद+ होतं आणि गिलादपासून गिलादचं घराणं आलं. ३०  गिलादच्या मुलांची नावं अशी: इयेजेरपासून इयेजेरचं घराणं; हेलेकपासून हेलेकचं घराणं; ३१  अस्रीयेलपासून अस्रीयेलचं घराणं, शखेमपासून शखेमचं घराणं; ३२  शमीदापासून शमीदाचं घराणं; हेफेरपासून हेफेरचं घराणं. ३३  हेफेरचा मुलगा सलाफहाद+ याला मुलं नव्हती, फक्‍त मुलीच होत्या.+ त्यांची नावं महला, नोआ, होग्ला, मिल्का आणि तिरसा अशी होती. ३४  ही सर्व मनश्‍शेची घराणी होती आणि त्यांच्यातल्या नोंदणी झालेल्यांची संख्या ५२,७०० इतकी होती.+ ३५  एफ्राईमच्या मुलांची+ त्यांच्या घराण्यांप्रमाणे नावं अशी: शुथेलहपासून+ शुथेलहचं घराणं; बेकेरपासून बेकेरचं घराणं; तहनपासून तहनचं घराणं. ३६  शुथेलहच्या मुलांची नावं अशी: एरानपासून एरानचं घराणं. ३७  ही सर्व एफ्राईमच्या मुलांपासून आलेली त्यांची घराणी होती. त्यांच्यातल्या नोंदणी झालेल्यांची संख्या ३२,५०० इतकी होती.+ ही सर्व योसेफच्या मुलांची त्यांच्या घराण्यांप्रमाणे नावं होती. ३८  बन्यामीनच्या मुलांची+ त्यांच्या घराण्यांप्रमाणे नावं अशी: बेलापासून+ बेलाचं घराणं; अशबेलपासून अशबेलचं घराणं; अहीरामपासून अहीरामचं घराणं; ३९  शफूफामपासून शफूफामचं घराणं; हूफामपासून हूफामचं घराणं. ४०  बेलाच्या मुलांची नावं अर्द आणि नामान+ अशी होती. अर्दपासून अर्दचं घराणं; नामानपासून नामानचं घराणं. ४१  ही बन्यामीनच्या मुलांची त्यांच्या घराण्यांप्रमाणे नावं होती. त्यांच्यातल्या नोंदणी झालेल्यांची संख्या ४५,६०० इतकी होती.+ ४२  दानच्या मुलांची+ त्यांच्या घराण्यांप्रमाणे नावं अशी: शूहामपासून शूहामचं घराणं. ही दानच्या मुलांची त्यांच्या घराण्यांप्रमाणे नावं होती. ४३  शूहामच्या सर्व घराण्यांतल्या नोंदणी झालेल्यांची संख्या ६४,४०० इतकी होती.+ ४४  आशेरच्या मुलांची+ त्यांच्या घराण्यांप्रमाणे नावं अशी: इम्नाहपासून इम्नाहचं घराणं; इश्‍वीपासून इश्‍वीचं घराणं; बरीयापासून बरीयाचं घराणं; ४५  बरीयाच्या मुलांची नावं अशी: हेबेरपासून हेबेरचं घराणं; मालकीएलपासून मालकीएलचं घराणं. ४६  आशेरच्या मुलीचं नाव सेराह होतं. ४७  ही सर्व आशेरच्या मुलांची त्यांच्या घराण्यांप्रमाणे नावं होती आणि त्यांच्यातल्या नोंदणी झालेल्यांची संख्या ५३,४०० इतकी होती.+ ४८  नफतालीच्या मुलांची+ त्यांच्या घराण्यांप्रमाणे नावं अशी: यहसेलपासून यहसेलचं घराणं; गूनीपासून गूनीचं घराणं; ४९  येसेरपासून येसेरचं घराणं; शिल्लेमपासून शिल्लेमचं घराणं. ५०  ही सर्व नफतालीच्या घराण्यांप्रमाणे त्यांच्या घराण्यांची नावं होती आणि त्यांच्यातल्या नोंदणी झालेल्यांची संख्या ४५,४०० इतकी होती.+ ५१  इस्राएली लोकांपैकी नोंदणी झालेल्यांची एकूण संख्या ६,०१,७३० इतकी होती.+ ५२  मग यहोवा मोशेला म्हणाला: ५३  “या नावांच्या यादीप्रमाणे,* यांच्यात वारसा म्हणून जमिनीचे भाग केले जावेत.+ ५४  मोठ्या घराण्यांसाठी मोठा वाटा आणि लहान घराण्यांसाठी लहान वाटा, वारसा म्हणून दिला जावा.+ प्रत्येक घराण्याला, नोंदणी झालेल्यांच्या संख्येप्रमाणे वाटा दिला जावा. ५५  पण, जमिनीचे वाटे चिठ्ठ्या टाकून केले जावेत.+ प्रत्येक घराण्याला आपल्या वडिलांच्या वंशाच्या नावाप्रमाणे वारसा दिला जावा. ५६  प्रत्येक वारसा चिठ्ठ्या टाकून ठरवला जाईल आणि त्याप्रमाणे मोठ्या आणि लहान घराण्यांमध्ये वाटणी केली जाईल.” ५७  लेव्यांच्या घराण्यांपैकी नोंदणी झालेल्यांची नावं अशी:+ गेर्षोनपासून गेर्षोनचं घराणं; कहाथपासून+ कहाथचं घराणं; मरारीपासून मरारीचं घराणं. ५८  ही लेव्यांची घराणी होती: लिब्नीचं घराणं,+ हेब्रोनचं घराणं,+ महलीचं घराणं,+ मूशीचं घराणं+ आणि कोरहचं घराणं.+ कहाथच्या मुलाचं नाव अम्राम+ होतं. ५९  अम्रामची बायको योखबेद होती.+ ती लेवीची मुलगी होती आणि तिचा जन्म इजिप्तमध्ये झाला होता. तिला अम्रामपासून अहरोन, मोशे आणि त्यांची बहीण मिर्याम झाली.+ ६०  मग अहरोनला नादाब, अबीहू, एलाजार आणि इथामार ही मुलं झाली.+ ६१  पण नादाब आणि अबीहू यांनी नियमाविरुद्ध असलेला अग्नी यहोवापुढे नेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.+ ६२  लेव्यांपैकी, एक महिन्याच्या मुलापासून त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्या पुरुषांची नोंदणी झाली, त्यांची संख्या २३,००० इतकी होती.+ त्यांची नोंदणी इस्राएली लोकांसोबत झाली नव्हती,+ कारण त्यांना इस्राएली लोकांमध्ये वारसा दिला जाणार नव्हता.+ ६३  मोशे आणि एलाजार याजक यांनी, यार्देनच्या काठावर यरीहो इथे मवाबच्या मैदानांत या सर्व इस्राएली लोकांची नोंदणी केली. ६४  पण, सीनायच्या ओसाड रानात मोशे आणि अहरोन याजक यांनी ज्यांची नोंदणी केली होती, त्यांपैकी कोणीही आता उरलं नव्हतं.+ ६५  कारण यहोवा त्यांच्याबद्दल म्हणाला होता: “ते ओसाड रानातच मरतील.”+ त्यामुळे यफुन्‍नेचा मुलगा कालेब आणि नूनचा मुलगा यहोशवा यांच्याशिवाय त्या लोकांपैकी एकही माणूस आता उरला नव्हता.+

तळटीपा

किंवा “यादीतल्या नावांच्या संख्येप्रमाणे.”