गणना २९:१-४०

  • वेगवेगळी अर्पणं देण्याबद्दल नियम (१-४०)

    • कर्णे वाजवण्याच्या दिवशी करायची अर्पणं (१-६)

    • प्रायश्‍चित्ताच्या दिवशी करायची अर्पणं (७-११)

    • मंडपांच्या सणाची अर्पणं (१२-३८)

२९  सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, तुम्ही एक पवित्र मेळावा ठेवा. त्या दिवशी तुम्ही कोणतंही मेहनतीचं काम करू नका.+ हा तुमच्यासाठी कर्णा फुंकण्याचा दिवस असेल.+ २  तुम्ही होमार्पण म्हणून एक गोऱ्‍हा,* एक मेंढा आणि एकेका वर्षाची सात कोकरं अर्पण करा. हे कोणताही दोष नसलेले प्राणी असावेत. या अर्पणाच्या सुवासाने यहोवाला आनंद होईल.* ३  त्यांसोबत अन्‍नार्पण म्हणून, तुम्ही गोऱ्ह्यासाठी तीन दशांश एफा* चांगलं पीठ तेलात मिसळून द्या. तसंच, मेंढ्यासाठी दोन दशांश एफा चांगलं पीठ, ४  आणि सात कोकरांपैकी प्रत्येकासाठी एक दशांश एफा चांगलं पीठ तेलात मिसळून द्या. ५  यासोबतच तुमच्यासाठी प्रायश्‍चित्त म्हणून एक बकराही पापार्पण म्हणून द्या. ६  तुम्ही ही अर्पणं, दर महिन्यात दिलं जाणारं होमार्पण व त्याचं अन्‍नार्पण,+ तसंच, नियमितपणे दिलं जाणारं होमार्पण व त्याचं अन्‍नार्पण+ आणि त्यांची पेयार्पणं+ या सर्वांसोबत त्यांच्या नेहमीच्या ठरलेल्या पद्धतीप्रमाणे द्यावीत. ही यहोवासाठी अग्नीत जाळून केलेली अर्पणं आहेत आणि त्यांच्या सुवासाने त्याला आनंद होईल.* ७  या सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी तुम्ही एक पवित्र मेळावा ठेवा+ आणि आपल्या पापांबद्दल शोक करा.* त्या दिवशी तुम्ही कोणतंही काम करू नका.+ ८  तुम्ही होमार्पण म्हणून एक गोऱ्‍हा, एक मेंढा आणि एकेका वर्षाची सात कोकरं अर्पण करा. या सर्व प्राण्यांमध्ये कोणताही दोष नसावा.+ या अर्पणाच्या सुवासाने यहोवाला आनंद होईल.* ९  त्यांसोबतच अन्‍नार्पण म्हणून गोऱ्ह्यासाठी तेलात मिसळलेलं तीन दशांश एफा चांगलं पीठ द्या. तसंच, मेंढ्यासाठी दोन दशांश एफा चांगलं पीठ, १०  आणि सात कोकरांपैकी प्रत्येकासाठी एक दशांश एफा चांगलं पीठ तेलात मिसळून द्या. ११  तुम्ही प्रायश्‍चित्तासाठी देत असलेलं पापार्पण,+ तसंच नियमितपणे दिलं जाणारं होमार्पण, त्याचं अन्‍नार्पण व त्यांसोबतची पेयार्पणं, यांशिवाय पापार्पण म्हणून एक बकराही द्या. १२  सातव्या महिन्याच्या १५ व्या दिवशी तुम्ही एक पवित्र मेळावा ठेवा. त्या दिवशी तुम्ही कोणतंही मेहनतीचं काम करू नका आणि सात दिवसांपर्यंत यहोवासाठी सण साजरा करा.+ १३  तुम्ही होमार्पण+ म्हणून १३ गोऱ्‍हे, २ मेंढे आणि एकेका वर्षाची १४ कोकरं अर्पण करा. या सर्व प्राण्यांमध्ये कोणताही दोष नसावा.+ या अर्पणाच्या सुवासाने यहोवाला आनंद होईल.* १४  त्यांसोबतच अन्‍नार्पण म्हणून १३ गोऱ्ह्यांपैकी प्रत्येकासाठी तेलात मिसळलेलं तीन दशांश एफा चांगलं पीठ द्या. तसंच, २ मेंढ्यांपैकी प्रत्येकासाठी दोन दशांश एफा चांगलं पीठ, १५  आणि १४ कोकरांपैकी प्रत्येकासाठी एक दशांश एफा चांगलं पीठ तेलात मिसळून द्या. १६  तसंच नियमितपणे दिलं जाणारं होमार्पण, त्याचं अन्‍नार्पण व त्यासोबतचं पेयार्पण,+ यांशिवाय पापार्पण म्हणून एक बकराही द्या. १७  दुसऱ्‍या दिवशी, तुम्ही १२ गोऱ्‍हे, २ मेंढे आणि एकेका वर्षाची १४ कोकरं अर्पण करा. या सर्व प्राण्यांमध्ये कोणताही दोष नसावा.+ १८  तसंच, नेहमीच्या पद्धतीप्रमाणे गोऱ्‍हे, मेंढे आणि कोकरं यांच्या संख्येनुसार त्यांसोबतचं अन्‍नार्पण आणि त्यांची पेयार्पणंही द्यावीत. १९  नियमितपणे दिलं जाणारं होमार्पण, त्याचं अन्‍नार्पण व त्यांसोबतची पेयार्पणं,+ यांशिवाय पापार्पण म्हणून एक बकराही द्या. २०  तिसऱ्‍या दिवशी, तुम्ही ११ गोऱ्‍हे, २ मेंढे आणि एकेका वर्षाची १४ कोकरं अर्पण करा. या सर्व प्राण्यांमध्ये कोणताही दोष नसावा.+ २१  तसंच, नेहमीच्या पद्धतीप्रमाणे गोऱ्‍हे, मेंढे आणि कोकरं यांच्या संख्येनुसार त्यांसोबतचं अन्‍नार्पण आणि त्यांची पेयार्पणंही द्यावीत. २२  नियमितपणे दिलं जाणारं होमार्पण, त्याचं अन्‍नार्पण व त्यासोबतचं पेयार्पण,+ यांशिवाय पापार्पण म्हणून एक बकराही द्या. २३  चौथ्या दिवशी, तुम्ही १० गोऱ्‍हे, २ मेंढे आणि एकेका वर्षाची १४ कोकरं अर्पण करा. या सर्व प्राण्यांमध्ये कोणताही दोष नसावा.+ २४  तसंच, नेहमीच्या पद्धतीप्रमाणे गोऱ्‍हे, मेंढे आणि कोकरं यांच्या संख्येनुसार त्यांसोबतचं अन्‍नार्पण आणि त्यांची पेयार्पणंही द्यावीत. २५  नियमितपणे दिलं जाणारं होमार्पण, त्याचं अन्‍नार्पण व त्यासोबतचं पेयार्पण,+ यांशिवाय पापार्पण म्हणून एक बकराही द्या. २६  पाचव्या दिवशी, तुम्ही ९ गोऱ्‍हे, २ मेंढे आणि एकेका वर्षाची १४ कोकरं अर्पण करा. या सर्व प्राण्यांमध्ये कोणताही दोष नसावा.+ २७  तसंच, नेहमीच्या पद्धतीप्रमाणे गोऱ्‍हे, मेंढे आणि कोकरं यांच्या संख्येनुसार त्यांसोबतचं अन्‍नार्पण आणि त्यांची पेयार्पणंही द्यावीत. २८  नियमितपणे दिलं जाणारं होमार्पण, त्याचं अन्‍नार्पण व त्यासोबतचं पेयार्पण,+ यांशिवाय पापार्पण म्हणून एक बकराही द्या. २९  सहाव्या दिवशी, तुम्ही ८ गोऱ्‍हे, २ मेंढे आणि एकेका वर्षाची १४ कोकरं अर्पण करा. या सर्व प्राण्यांमध्ये कोणताही दोष नसावा.+ ३०  तसंच, नेहमीच्या पद्धतीप्रमाणे गोऱ्‍हे, मेंढे आणि कोकरं यांच्या संख्येनुसार त्यांसोबतचं अन्‍नार्पण आणि त्यांची पेयार्पणंही द्यावीत. ३१  नियमितपणे दिलं जाणारं होमार्पण, त्याचं अन्‍नार्पण व त्यासोबतची पेयार्पणं,+ यांशिवाय पापार्पण म्हणून एक बकराही द्या. ३२  सातव्या दिवशी, तुम्ही ७ गोऱ्‍हे, २ मेंढे आणि एकेका वर्षाची १४ कोकरं अर्पण करा. या सर्व प्राण्यांमध्ये कोणताही दोष नसावा.+ ३३  तसंच, नेहमीच्या पद्धतीप्रमाणे गोऱ्‍हे, मेंढे आणि कोकरं यांच्या संख्येनुसार त्यांसोबतचं अन्‍नार्पण आणि त्यांची पेयार्पणंही द्यावीत. ३४  नियमितपणे दिलं जाणारं होमार्पण, त्याचं अन्‍नार्पण व त्यासोबतचं पेयार्पण,+ यांशिवाय पापार्पण म्हणून एक बकराही द्या. ३५  आठव्या दिवशी तुम्ही पवित्र मेळावा ठेवा. त्या दिवशी तुम्ही कोणतंही मेहनतीचं काम करू नका.+ ३६  तुम्ही होमार्पण म्हणून एक गोऱ्‍हा, एक मेंढा आणि एकेका वर्षाची सात कोकरं अर्पण करा. या सर्व प्राण्यांमध्ये कोणताही दोष नसावा.+ या अर्पणाच्या सुवासाने यहोवाला आनंद होईल.* ३७  तसंच, नेहमीच्या पद्धतीप्रमाणे गोऱ्‍हे, मेंढे आणि कोकरं यांच्या संख्येनुसार त्यांसोबतचं अन्‍नार्पण व त्यांची पेयार्पणंही द्यावीत. ३८  नियमितपणे दिलं जाणारं होमार्पण, त्याचं अन्‍नार्पण आणि त्यासोबतचं पेयार्पण,+ यांशिवाय पापार्पण म्हणून एक बकराही द्या. ३९  तुम्ही नवसाची अर्पणं+ आणि स्वेच्छेने दिलेली अर्पणं+ म्हणून जी होमार्पणं+ देता, तसंच जी अन्‍नार्पणं,+ पेयार्पणं+ आणि शांती-अर्पणं+ देता, त्यांसोबतच तुमच्या नेमलेल्या सणांच्या वेळी+ ही अर्पणंही यहोवाला द्या.’” ४०  यहोवाने आज्ञा दिलेल्या सर्व गोष्टी मोशेने इस्राएली लोकांना सांगितल्या.

तळटीपा

किंवा “तरणा बैल.”
किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”
किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”
हा शोक उपास करून किंवा अशाच प्रकारची इतर बंधनं स्वतःवर लादून केला जात असावा.
किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”
किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”
किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”